पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
ज़िन्दगी और मौत ऊपरवाले के हाथ है जहाँपनाह उसे न तोह आप बदल सकते हैं न मैं , हम सब तो रंगमंच की कठपुतलियाँ हैं जिनकी डोर ऊपरवाले की उंगलियों में बंधी हैं , कब , कौन , कैसे उठेगा यह कोई नहीं बता सकता है ! “आनंद” चित्रपटातील गुलजार यांनी लिहिलेला हा प्रसिद्ध डायलॉग, खूप वाह वाही मिळवली, चित्रपट पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात नक्कीच घर करून असेल हा डायलॉग, पण मागील वर्षी कोरोना नामक विषाणू आला आणि काहींच्या आयुष्यात सगळं होत्याच नव्हतं करू लागला. आता चालता बोलता पाहिलेला माणूस आप्त स्वकीयांना सोडून देवाघरी जाऊ लागला. मृत्यूवर कोणालाच विजय मिळविता आला नाही हे खरं आहे, मागील काही महिन्यात हे आपण सर्वजण पाहत आलो आहोत. जीव वाचावा म्हणून देवाकडे केलेल्या प्रार्थना, घातलेले साकडे याचा काहीच उपयोग होत नाही, मित्र-मंडळी, परिचित चेहरे काळाच्या पडद्याआड गेले, मृत्यू येतो म्हणजे काय तर तो त्याची वेळ पाळतो असचं म्हणावं लागेल, त्यामध्ये तो कोणतीही कसूर करत नाही, कोणत्याच प्रकारच्या भावनांचा, व्यक्तीच्या भूतकाळ आणि भविष्यकाळाशी त्याचा काही संबंध नसतो , तो पाहतो फक्त वर्तमानकाळ.