पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
ज़िन्दगी
और मौत ऊपरवाले के हाथ है जहाँपनाह उसे न तोह आप बदल सकते हैं न मैं,
हम सब तो रंगमंच
की कठपुतलियाँ हैं जिनकी डोर ऊपरवाले
की
उंगलियों में बंधी हैं,कब,
कौन, कैसे उठेगा यह कोई नहीं बता सकता है !
“आनंद” चित्रपटातील गुलजार यांनी लिहिलेला हा प्रसिद्ध डायलॉग, खूप वाह वाही मिळवली, चित्रपट पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात नक्कीच घर करून असेल हा डायलॉग, पण मागील वर्षी कोरोना नामक विषाणू आला आणि काहींच्या आयुष्यात सगळं होत्याच नव्हतं करू लागला. आता चालता बोलता पाहिलेला माणूस आप्त स्वकीयांना सोडून देवाघरी जाऊ लागला. मृत्यूवर कोणालाच विजय मिळविता आला नाही हे खरं आहे, मागील काही महिन्यात हे आपण सर्वजण पाहत आलो आहोत. जीव वाचावा म्हणून देवाकडे केलेल्या प्रार्थना, घातलेले साकडे याचा काहीच उपयोग होत नाही, मित्र-मंडळी, परिचित चेहरे काळाच्या पडद्याआड गेले, मृत्यू येतो म्हणजे काय तर तो त्याची वेळ पाळतो असचं म्हणावं लागेल, त्यामध्ये तो कोणतीही कसूर करत नाही, कोणत्याच प्रकारच्या भावनांचा, व्यक्तीच्या भूतकाळ आणि भविष्यकाळाशी त्याचा काही संबंध नसतो , तो पाहतो फक्त वर्तमानकाळ.
एखाद्या युद्धात एकाच वेळी अनेक लोक
मृत्युमुखी पडतात अगदी तसचं कोरोना रुपी असुराशी होणाऱ्या युद्धात लोक मृत्युमुखी
पडत आहेत, पण एक प्रश्न पडतो कि एवढ्या लोकांचे प्रारब्ध एकसारखेच कसे? या
सगळ्यांची आयुष्याची दोरी एकाच वेळी कशी तुटू शकते? व्यक्तीच्या जीवन कथेतून त्याची
भूमिका संपते म्हणूनच जीवनयात्रा संपते असंच म्हणायचं..... दुसरा कल्पनाविलास मनात
येत नाही. पण ज्याप्रकारे कोरोना औषधांविषयी सगळ्यांचेच ज्ञान अपुरे आहे, त्याचा
पूर्ण अभ्यास होण्यास काही काळ जावा लागेल असे दिसते पण तो पर्यंत स्वत:स सुरक्षित
ठेवणंच आपल्या हाती आहे. मागील वर्षी वयस्कर मंडळींना जास्त धोका आहे असा इशारा
देण्यात आला, या वर्षी आलेल्या लाटेत चाळीशीतील मंडळी कोरोनाचे शिकार झाल्याचे दिसून
येत आहेत. पोस्ट कोविड झालेले कॉम्प्लीकेशन्स हे चिंतेची बाब नक्कीच आहेत. वयाच्या
तिशी नंतर रेग्युलर मेडिकल चेक-अप गरजेचे आहे हेच अधोरेखित होते आहे. याची नोंद
सर्वांनी घ्यावी.
सर्वांचे पूर्ण लसीकरण हाच
प्राधान्यक्रम ठेवणं आवश्यक आहे, सरकारने या विषयी ठोस पावलं उचलून लसीकरण पूर्ण करणे
गरजेचे आहे. आजची स्थिती काही फारशी चांगली म्हणता येणार नाही एकूण लोकसंख्येच्या
फक्त ३% लसीकरण पूर्ण झाले आहे. सुशिक्षित तसेच अल्पशिक्षित लोकांनी जाणीवपूर्वक
काळजी घेणे खूप आवश्यक आहे पण तसे होताना दिसत नाही. आजही रस्त्यावरून जाताना
थुंकणे (चालत जाणारे अथवा गाडीवर जाणारे), मास्कचा वापर न करणे, (सरकारी आकडेवारी
दंड किती गोळा झाला हे सांगते पण नियम हे आपल्या साठीच आहेत ते पाळले पाहिजेत त्यातच
हित आहे, हि शिकवण आपण का समजावून घेऊ शकत नाही ? ) ‘मला काही होत नाही’ असा फाजील
आत्मविश्वास बाळगण खूप महागत पडतं .... आज या लेखाद्वारे एवढचं सुचविण्याचा
प्रयत्न आहे कि, कोरोनाशी लढताना शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करूया, मास्क
घालुयात, व्यायामासाठी खास वेळ देवूयात, लसीकरण करून घेउया आणि काळजी घेऊया ,
सुरक्षित राहूया. तुमच्या परिवारास पर्यायाने या देशास तुमची गरज आहे.
अमित बाळकृष्ण
कामतकर
सोलापूर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा