ads

फॉलोअर

आज वाचा

प्रगल्भतेचे वरदान- समाधानाची लेखणी

इमेज
  मानवी मनाचे अंतरंग हे अनाकलनीय आणि अथांग सागराप्रमाणे असते. या सागरात सतत विचारांचे , भावनांचे तरंग उमटत असतात. कधी आनंदाची भरती , तर कधी दुःखाची ओहोटी. या तरल , गुंतागुंतीच्या भाव-भावनांना मुक्त वावर देताना स्वतःला पाहण्याची , अनुभवण्याची आणि त्यातून एक प्रकारची आत्मिक शांतता मिळवण्याची किमया केवळ पुस्तकेच साधू शकतात. पुस्तके म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नसतात , तर ते लेखकाच्या अंतरीचा प्रवास असतो. लेखक आपल्या लेखणीतून विविध सफरींचे दर्शन घडवतो. हे दाखले , हे अनुभव केवळ कथा किंवा वर्णन नसतात , तर ते थेट आपल्या जगण्याशी , आपल्या अस्तित्वाच्या धाग्यांशी जोडणारे आरसे असतात. लेखकाने प्रामाणिकपणे मांडलेले सुख-दुःख , त्याचे यश-अपयश , त्याचे चिंतन आणि त्याचे अनुभव वाचकाच्या हृदयाला स्पर्शून जातात. अशावेळी , वाचक एका अद्भुत समाधानाचा अनुभव घेतो. त्याला हे जाणवते की , ज्या तीव्र भावनांचा अनुभव तो घेत आहे – मग ते उत्कट प्रेम असो , पराकोटीचे दुःख असो , जीवनातील संघर्ष असो किंवा अगदी साधा आनंद असो – त्या अनुभवात तो एकटा नाही. ' माझ्यासारखं अजूनही कुणी सुखी , दुखी या जगतात आहे ,' या जाणि...

उबंटू – ओपनसोर्स ऑपरेटिंग सिस्टीम

उबंटू (दक्षिण आफ्रिकेतील एका तत्वज्ञानावर आधारित शब्द आहे-ज्याचा अर्थ मानवाच्या कल्याणासाठी / माणुसकीच्या दृष्टीने केलेले काम) हि एक डेबियन या प्रकारातील मोफत उपलब्ध होणारी ऑपरेटिंग सिस्टम आहे. डेबियन हि एक मोफत ऑपरेटिंग सिस्टीम तयार करण्यास योगदान देणाऱ्या डेव्हलपर्सची असोसिएशन आहे त्यांनी तयार केलेल्या ऑपरेटिंग सिस्टिमला डेबियन असे म्हणतात. उबंटू वापरकर्ते पर्सनल कॉम्प्युटर, स्मार्ट फोन वर वापरू शकतात. या ऑपरेटिंग सिस्टीम सोबत इतरही कांही प्रोग्राम्स उपलब्ध होतात, ज्यामध्ये लिबर ऑफिस रायटर, कॅल्क, इम्प्रेस हे मायक्रोसॉफ्ट ऑफिस सारखे प्रोग्राम्स मोफत उपलब्ध होतात. या सर्वांसोबत मॉझिला फायरफॉक्स, सुडोकू, बुद्धिबळ सारखे गेम्स देण्यात आलेले आहेत.उबंटू वापरीत असताना आपण काहीतरी वेगळेच वापरत आहोत असा अनुभव येत नाही उलट ग्राफिकल युजर इंटरफेस हुबेहूब विंडोज सारखाच देण्यात आलेला आहे. शैक्षणिक क्षेत्रात या ऑपरेटिंग सिस्टमचा वापर छान करता येवू शकतो कारण शैक्षणिक संस्थांना सॉफ्टवेअर / ऑपरेटिंग सिस्टम वापरण्यासाठी लायसेन्सची आवश्यकता नाही. त्याचा वापर लागलीच त्यांच्या गरजेप्रमाणे संस्था करू शकतात. या मध्ये भारतातील सर्वात जुने विद्यापीठ म्हणून नाव लौकिक असलेले दिल्ली विद्यापीठ उबंटू या ऑपरेटिंग सिस्टीमचा वापर करतं. 

शैक्षणिक संस्था मध्ये कौशल्य विकास वाढीसाठी जिंकप्रेस सारखे टूल वापरता येवू शकते त्यासोबत आभासी अनुभव घेण्यासाठी मार्बल या टूलचा वापर करता येवू शकतो. शिक्षकांना शाळेतील प्रत्येक नेटवर्क मधील संगणक हाताळण्याचे एक टूल वापरता येते,त्यास आय-टॅल्क असे म्हणतात. अशी विविध टूल्स या ऑपरेटिंग सिस्टीम सोबत चक्क पूर्णपणे मोफत उपलब्ध आहेत. आता गरज आहे ती फक्त आपला दृष्टीकोन बदलण्याची!!

          जर आपण हि टूल्स वापरायची ठरवलं तर त्याचे फायदे काय मिळतील. १.मुक्त स्त्रोत: open source – लायसन्सची गरज नाही. कुणीही मोफत वापर करू शकतो. २. मायक्रोसॉफ्टशी सुसंगत / अनुरूप सॉफ्टवेअर असल्याने वापरताना अडचण येत नाही. ३. ४० भाषांमध्ये भाषांतराची सोय महत्वाचे म्हणजे हिंदी व मराठी भाषा वापरण्याची सोय सुद्धा यात आहे. ४. तांत्रिक अडचणीसाठी ऑनलाइन व ऑन साईट सपोर्ट देण्यात येतो ५. उपलब्ध प्रोग्राम्स हे व्हायरस फ्री असतात ६. तुमच्या नवीन व जुन्या हार्डवेअरवर देखील या ऑपरेटिंग सिस्टिमला वापरता येते. ७. विद्यार्थी व शिक्षक दोघांसाठी विविध शैक्षणिक अॅप देखील उपलब्ध आहेत.

          चला तर मग या ऑपरेटिंग सिस्टमचा वापर करूयात आणि नव-नवीन तंत्रज्ञान आत्मसात करूयात. तुम्ही हि ऑपरेटिंग सिस्टीम ऑनलाइन डाऊनलोड देखील करू शकता आणि तुमच्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमवर ड्युअल बूट या पर्यायाचा वापर करून तुम्ही उबंटू ऑपरेटिंग सिस्टम वापरू देखील शकता.

अमित बाळकृष्ण कामतकर

सोलापूर        

इतर विषयांवरील लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करावं   


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छावा

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

एआय शिक्षकांची जागा घेईल ?