फॉलोअर

समांतर

 

            शीर्षक वाचून आश्चर्य वाटलं असेल ना? पण या लेखाचा आणि वेब सिरीजचा काहीही संबंध नाही, पार दूरवर संबंध नाही. विचारांची दिशा, इतिहासाची पुनरावृत्ती म्हणू फार तर आपल्याच सोबत होताना आपण पाहू शकतो त्यास कोणताही कुमार महाजन किंवा सुदर्शन चक्रपाणी व्हायची गरज नाही. संगीत आपल्या सर्वांच्या जीवनातील अविभाज्य घटक, फक्त काळानुरूप ते बदलत गेलं तसं ते उपलब्ध होण्याची सिस्टम देखील बदलत गेली आणि अजून खूप प्रकारची स्थित्यंतर घडतील आणि नवीनच चांगल काहीतरी पहायला, ऐकायला मिळेल. वेगवेगळ्या प्रकारचे प्रात्याक्षिक करण्याचे कसब संगीतकारांकडे आपण पाहतो. पंचमदा अशा संगीतकारांपैकी एक, मग ते कंगवा फिरवून निर्माण होणारं संगीत, काचेचे ग्लास वाजवून तयार होणारं संगीत असेल अथवा आणखी कोणता प्रकार , सगळी जादूच !! रमेश सिप्पींच्या शोले या चित्रपटाचा रिमेक “आग” या नावाने राम गोपाल वर्मा ने तयार केला (जो बॉक्स ऑफिसवर जबरदस्त आपटला) त्यास गणेश हेगडे, प्रसन्न शेखर या जोडीने संगीत दिले होते आणि बॅकग्राउंड स्कोर अमर मोहिले याच होतं, त्यांना जुन्या शोले मध्ये जे काही बॅकग्राउंड स्कोर पंचम दा ने दिलेला होता त्याचं काही केल्या रिमेक करणं जमलं नाही, तस त्यांनी एका मुलाखतीत कबूल देखील केलं आहे. असो, हा आजचा विषय नाही पण ८०, ९० च दशक ज्यामध्ये एकापेक्षा एक अशी सरस गाणी माझ्या पिढीनी अनुभवली ती मजा काही औरच !!

            तरुणाईचं भावविश्व समृद्ध होणं म्हणजे काय? ते या काळात नक्कीच अनुभवलं आहे, मुलं मोठी होत असताना घरात आई- वडिलांकडून ज्याप्रकारे संगीत श्रवण होतं त्याप्रमाणे मुलांची आवड-निवड ठरवण्यास मदत होते, अर्थात मुलांना त्यांचं स्वत:च असं मत असतच आणि ते असावं देखील. माझा लहानपणापासून किशोर आवडता गायक, अगदी क्रेझी वगैरे म्हणतात ना अगदी तसचं पण किशोर सोबतच मोहम्मद रफी, मुकेश, सुरेश वाडकर, लता मंगेशकर, आशा भोसले यांनी गायलेली गीतं देखील आवडायची, आजही आवडतात पण किशोर इज किशोर !! तो सदैव नंबर वन ची पसंती राहिला आणि राहील. नंतरच्या काळात अमित कुमार, कुमार सानू, उदित नारायण, अभिजित, सोनू निगम यांनी देखील पसंतीच्या क्रमवारीत स्थान मिळविलं पण “किशोरच” क्रमांक एकच स्थान अबाधित राहिलं. ध्वनीमुद्रण करण्यास साधारण १८७७ मध्ये सुरुवात झाली, थॉमस एडिसनला याचं प्रात्याक्षिक दाखवायला व्हाईट हाउस मध्ये आमंत्रण देण्यात आलं होतं म्हणे, १९६३ साली फिलिप्स कंपनीने पहिली स्टिरीओ कॅसेट टेप बनवली. हा इतिहास यासाठी इथे नमूद केला कारण चित्रपटाच गाणं रिलीज होण्याची प्रथा जुनीच, प्रथम गाणं रिलीज व्हायचं ते रेडीओ वर बिनाका गीतमाला यासाठी खास प्रसिद्ध, नंतर

दुसऱ्या कॅसेटच्या शेवटच्या टेप मध्ये, चित्रपटाच्या मध्यंतरात, आणि आज इंटरनेटवर. एखाद्या चित्रपटाची गाणी आवडली आणि त्याचे कॅसेट टेप विकत घ्यायची म्हंटल कि झुंबड उडायची, ऑडीओ कॅसेट दुकानात गर्दी पहायला मिळायची, कॅसेट सहज उपलब्ध झाली तर ज्यांच्याकडे रेकॉर्डिंग सुविधा असणारे टेप्स असायचे (ज्यांच्याकडे नाही त्यांच्यासाठी सोलापुरात कस्तुरबा मार्केट जवळ एक दुकान होतं तिथे हि सुविधा मिळायची, त्याच्याकडे वेटिंग असायचं) तिथे त्याच्या कॉपीज तयार व्हायच्या !!! रीरेकॉर्डिंग झालं कि घरातील टेपवर गाणी प्ले केली कि भरून पावलं म्हणायचं. हे सगळं आनंद देणारं, जीवनातील अमुल्य क्षणच !! ज्यांनी अनुभवले आहेत त्यांना याची मजा नक्कीच लक्षात येईल. इंटरनेट मुळे हि मजा आताची पिढी अनुभवू शकत नाही, सगळचं लागलीच उपलब्ध होतं,अगदी चुटकीसरशी ......

            बाबा सहगल, रेमो, देवांग पटेल, अलिशा चिनॉय हि काही मोजकीच रॅप स्टाईल, आणि पाश्चिमात्य शैलीत गाणारी मंडळी, अजूनही काही मंडळी असावीत पण मी यांची गीतं ऐकलेली आणि घरात यांची गाणी आई-बाबांना ऐकायला लावली म्हणून इथे खास नमूद केली. यांची गीतं आई-बाबांना काही फार आवडायची नाहीत पण मुला खातर सहन करायचे दोघे, मला आवडतं म्हणून स्पिकरच्या मोठ्या आवाजास देखील निमूटपणे सहन करायचे !! नंतरच्या काळात युफोरिया, आर्यनस्, केके, शंकर-एहसान-लॉय हि मंडळी देखील कॅसेट टेप्स स्वरूपात लिस्ट मध्ये अॅड झाली.

            आज एकाहून एक सरस गायक-गायिका आहेत, त्यांची गाणी (काही अपवाद वगळता) हि सुंदर आहेत, ते गातातही सुंदर पण माझ्या पसंतीची तालिका काही केल्या बदलत नाही. म्हणतात बदल हा स्विकारला पाहिजे आणि त्याची सुरुवात आपल्यापासूनच केली पाहिजे हे खरं आहे पण ..... हा “पण” खूप काही सुचवितो , नाही का? माझा मुलगा आदित्य, भाची सृष्टी यांच्या पसंतीच्या क्रमवारीत अरिजित सिंग प्रथम स्थानी आहे, त्यांना किशोरदा आवडतात पण अरिजित सिंग प्रथम स्थानी !!! आदित्यने अरिजितची गाणी लावली कि मग मी हि त्यांच्या सोबत अरिजितला ऐकतो !! हिस्ट्री रिपीट्स !!     

 

ता.क.: अरिजितच गायन कौशल्य अफाट आहे, आवाज हि सुंदर आहे पण..... “क्या करे दिल मानताही नही !!”

 

अमित बाळकृष्ण कामतकर

सोलापूर    


इतर विषयांवरील लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करावं

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ब्रॅंडींग लीडरशिप

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?