फॉलोअर

स्टार्टअप सक्सेस मंत्र- टेक २

 

मला आशा आहे, की तुम्ही स्टार्टअप सक्सेस मंत्र भाग १ वाचला असावा. त्यामध्ये मी पंच सूत्री दिल्या आहेत आणि या भागात देखील पुढील पंच सूत्री विषयी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. हा “दस का दम”, दशसूत्री म्हणा फार तर तुम्हास तुमच्या स्टार्टअपला यशस्वी करण्यात मदतगार ठरतील हे नक्की. याचा अंमल करणं कठीण आहे मलाही माहिती आहे, मागील २१ वर्षांपासून मी ही व्यवसाय करीत आहे. त्यामुळे या सूत्रींच्या कसोटीची पारख मी केलेली आहे. त्याचा जवळून अनुभव घेतला आहे. अनुभवांचे बोल म्हणा फार तर पण ही उद्योग संस्कृती स्विकारायचं एकदा नक्की केलं की त्यावर ठाम रहा, चालत रहा. आपणा सर्वांचे अखंड प्रेरणास्त्रोत, वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे पहावं आणि शिकावं, स्वराज्य निर्माण करण्याचा संकल्प महाराजांनी असंख्य मावळ्यांच्या साथीने सिद्धीस नेला अगदी तसचं स्वत:चा स्टार्टअप एक यशस्वी उद्योग म्हणून नावारुपास आणायचा असल्यास परिश्रम आलेच. निश्चयाचा महामेरू | बहुत जनासी आधारू | अखंड स्थितीचा निर्धारु | श्रीमंतयोगी , तुमच्या स्टार्टअप प्रवासात हा मंत्र लक्षात ठेवावा असे मी सुचवेन. समर्थ रामदासस्वामींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी भावना व्यक्त करताना वरील पंक्ती लिहिल्या आहेत.   

एका प्रसिद्ध हिंदी चित्रपटात एक उत्तम डायलॉग आहे, “जिंदगी मे तुम्हे दो रास्ते मिलेंगे, एक पर काटे होंगे, और एक पर फूल, फूल वाला रस्ता तुम्हे लुभायेगा पर तुम काटे के रास्ते पे चलो, ये तुम्हे तुम्हारी मंजिल तक ले जायेगा.”, तंतोतंत लागू पडतं बरं का हे स्टार्टअपला, अंतिम लक्ष्य “यश” मिळविणे असेल तर “रुकना झुकना नही तेरा काम”. या दोन लेखांच्या मधील काळात काही महत्वाकांक्षी विद्यार्थी भेटले त्यांनी कल्पना मांडल्या पण त्यांचा एक मोठा प्रश्न होता, सर फायनान्स कोण करेल ? कुठून उपलब्ध होऊ शकेल ? याचं उत्तर शोधायचं काम महत्वाकांक्षी विद्यार्थी मित्रांनाच करावं लागेल पण मी आणि थिंक ट्रान्स फाउंडेशन, पुणे या प्रवासात त्यांच्या सोबत नक्की असू याची खात्री त्यांना दिली आणि काम सुरु करण्यास सांगितले. केंद्र सरकार, राज्य सरकार विविध योजना घेऊन पुढे येत आहे सोबतच एंजल इन्व्हेस्टर आणि काही संस्था आहेत ज्या स्टार्टअपला मदत करण्यास पुढे येत आहेत. समर्थ रामदास स्वामींनी बुद्धिवादनिरुपण करताना अगदी उत्तम असे सांगितले आहे जे कोणत्याही स्टार्टअपला लागू पडतं, समर्थ म्हणतात “उत्कट भव्य तेंचि घ्यावे | मळमळीत अवघेंची टाकावे |” अर्थात ह्या जगातील उत्कट व भव्य असेल तेच आदर्श म्हणून घ्यावे आणि जे हलके, दर्जाहीन असेल त्याचा त्याग करावा.

1.    जिंदगी के साथ : आयुष्यभर सेवा देता येऊ शकेल असा पर्याय देऊ करणं म्हणजे उत्तम कॅश फ्लो ची खात्री. असे सूत्रच आहे. तुम्ही जर कोणत्याही प्रकारचे सोल्युशन देऊ करत असाल तर किमान पुढील १० वर्षांचा विचार करा. साध्य करण्यासाठी मनुष्यबळ तयार करा, त्यांना कामाचे महत्व पटवून द्या आणि तुमच्या कंपनीसाठी काम करण्याची प्रेरणा द्या.

2.    मी शिल्पकार: व्यवसायातून स्वत:ला घडवा, सुरुवातीच्या काळात जेवढा जास्त वेळ तुम्ही तुमच्या कंपनीला देऊ शकाल तेवढे उत्तम, यासाठी तुमचे उत्तम नियोजन कामी येईल , ते करा , तुमच्याकडे काम करण्याची एक सिस्टीम हवी, त्याचं नियोजन आणि परिचालन सुरळीत सुरु करण्यात तुम्ही यशस्वी झालात कि तुम्ही पुढील आयुष्यात स्वत:स आणि तुमच्या परिवारास वेळ देऊ शकाल. समर्थ म्हणतात “आधी कष्ट मग फळ | कष्टची नाही ते निर्फळ |” अर्थात आधी कष्ट करावेत आणि मग फळाची अपेक्षा ठेवावी , कष्टच केले नाहीत तर कार्यसिद्धी होत नाही.

3.    मैलाचे दगड: तुमच्या स्टार्टअप ते यशस्वी उद्योजक या प्रवासात तुम्हास काय साध्य करायचे आहे याच्या नोंदी ठेवा, त्याचा प्लान तुमच्याकडे असावा, कोणत्या वर्षी तुम्हाला काय साध्य (अचीव) करायचे आहे ते ठरवा, त्याप्रमाणे कामास लागा, त्या ध्येयाचा पाठलाग करा पण एक गोष्ट लक्षात ठेवा जर काही कारणांमुळे तुम्ही एखादी अचीवमेंट करू शकला नाहीत तर नाराज होऊ नका, ध्येयपूर्ती कडे अखंड वाटचाल सुरु ठेवा. शाळेत वर्गात “अ” वर्ग श्रेणी मिळविणे आणि आयुष्यात ध्येय सिद्धी करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

4.    व्यावसायिक नेटवर्क: तुम्ही ज्या समाजात राहता आणि तुमचा व्यवसाय वाढविता तिथे तुमची स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करावी. स्वत:चा व्यावसायिक परिचय करून देताना काळजी घ्यावी सोबतच प्रोटोकॉल पाळावेत. तुम्ही वेब वर उपलब्ध असणारे व्यावसायिक ओळख देणारे प्लॅटफॉर्मचा वापर करण्यास प्राधान्य द्या. linkedIn सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करा. व्यावसायिक संदर्भ तुम्हाला तुमच्या प्रवासात मदतगार ठरू शकतात.

5.    “यश” संधीत दडलय: स्टार्टअप म्हणजे कल्पनांचा नवोन्मेष, कल्पना सुचते तिचे मूर्त स्वरूप देण्यासाठी धडपड म्हणजे स्टार्टअप, असे अनेक स्टार्टअप आहेत, जे सुरु झाले आणि बंद देखील झाले. मग ते कुठे कमी पडले, याची कारणं अनेक असू शकतात पण एक महत्वाचं कारण म्हणजे संधी ओळखण्यात हि मंडळी कमी पडली, संधी शोधा कारण संधीतच यश दडलं आहे. मिळालेलं यश मग ते छोटं कि मोठं हे पाहू नका ते सेलिब्रेट करा.

तुमच्याकडे स्टार्टअप कल्पना आहे, तर मग भेट द्या (https://amitkamatkar.in) , मेसेज करा व्यक्त व्हा. शक्य असल्यास प्रत्यक्ष भेटीत (कोरोना नियमांचे पालन करून) अथवा ऑनलाइन स्वरुपात भेटून यशस्वी उद्योजक प्रवासास सुरुवात करा.

 

अमित बाळकृष्ण कामतकर

सोलापूर      


इतर विषयांवरील लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करावं


                 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?

मेल मर्ज काय आहे ?