इकिगाई- १०० वर्ष जगण्याचा मंत्र !!

Ikigai- इकिगाई –हा शुद्ध मराठी अनुवाद करण्याचा प्रयत्न आहे , या शब्दाचे उच्चारण “अ-की-गे-आय” या प्रकारे चार भागात करता येते. डॅन ब्युएटनर या लेखकाने मनुष्याचे जगातील सर्वात जास्त आयुष्मान असणाऱ्या देशाचं भ्रमण केले आणि तेथील मंडळी एवढी वर्ष कशी जगू शकतात? त्याचा त्यांच्याकडे काही फॉर्म्युला आहे काय? या विषयी त्यास कुतूहल निर्माण झाल्याने त्याने हा प्रवास केला. त्याने त्याच्या पुस्तकात याचा सखोल अभ्यास मांडलेला आहे. पुस्तकाचे नाव आहे “ब्ल्यू झोन्स किचन्स”, १०० रेसिपीज १०० वर्ष जगण्यासाठी !!! मागील वर्षी जपान मध्ये एकूण लोकसंख्ये पैकी आयुष्याची शंभरी पार केलेले ७९,००० माणसं आहेत. जपान फक्त यासाठी प्रसिद्ध आहे असे नाही तर “करोशी” या संज्ञे साठी देखील ओळखला जातो. या संज्ञेचे उगम स्थान १९७० मध्ये दडलं आहे, त्यावेळी जपान मध्ये सर्वात जास्त मृत्यू होण्याचे मुख्य कारण जास्त काम आणि प्रचंड ताण-तणाव असे संशोधनात आढळले होते. आयुष्य खूप सुंदर आहे ते जगताना ही रेसिपी अंमलात आणल्यास यशस्वी जीवन जगता येऊ शकतं. अर्थात हीच रेसिपी व्यवसाय आणि मनुष्याची ध्येयपूर्ती यांच्यासोबत जोड...