फॉलोअर

इकिगाई- १०० वर्ष जगण्याचा मंत्र !!

 

Ikigai- इकिगाई –हा शुद्ध मराठी अनुवाद करण्याचा प्रयत्न आहे, या शब्दाचे उच्चारण “अ-की-गे-आय” या प्रकारे चार भागात करता येते. डॅन ब्युएटनर या लेखकाने मनुष्याचे जगातील सर्वात जास्त आयुष्मान असणाऱ्या देशाचं भ्रमण केले आणि तेथील मंडळी एवढी वर्ष कशी जगू शकतात? त्याचा त्यांच्याकडे काही फॉर्म्युला आहे काय? या विषयी त्यास कुतूहल निर्माण झाल्याने त्याने हा प्रवास केला. त्याने त्याच्या पुस्तकात याचा सखोल अभ्यास मांडलेला आहे. पुस्तकाचे नाव आहे “ब्ल्यू झोन्स किचन्स”, १०० रेसिपीज १०० वर्ष जगण्यासाठी !!! मागील वर्षी जपान मध्ये एकूण लोकसंख्ये पैकी आयुष्याची शंभरी पार केलेले ७९,००० माणसं आहेत. 

जपान फक्त यासाठी प्रसिद्ध आहे असे नाही तर “करोशी” या संज्ञे  साठी देखील ओळखला जातो. या संज्ञेचे उगम स्थान १९७० मध्ये दडलं आहे, त्यावेळी जपान मध्ये सर्वात जास्त मृत्यू होण्याचे मुख्य कारण जास्त काम आणि प्रचंड ताण-तणाव असे संशोधनात आढळले होते.  आयुष्य खूप सुंदर आहे ते जगताना ही रेसिपी अंमलात आणल्यास यशस्वी जीवन जगता येऊ शकतं. अर्थात हीच रेसिपी व्यवसाय आणि मनुष्याची ध्येयपूर्ती यांच्यासोबत जोडल्यास योग्य मार्गक्रमण करता येऊ शकतं असे मी मानतो. डॅन ब्युएटनर सुचवितो आपली जीवन मूल्यं, रोज आपल्याला करायला आवडणाऱ्या गोष्टी, आणि ज्या क्षेत्रात तुम्ही निपूण आहात ते क्षेत्र यांचा प्रातिनिधिक नमूना (क्रॉस सेक्शन) म्हणजे इकगाई !! व्यावसायिक क्षेत्रात आपण हाच नियम लावू शकतं तिथे फक्त , तुमची व्यावसायिक मूल्य, तुम्ही ज्या क्षेत्रात निपुण आहात त्याच क्षेत्रात योगदान देत आहात का ते तपासा, समाजास त्याची गरज आहे का ? हे साध्य करताना तुम्ही जे काही प्रयत्न करीत आहात त्यासाठी तुम्हास पैसे मिळत आहेत का ? हा झाला तुमचा व्यावसायिक इकिगाई !! ही जपानी संकल्पना आपल्या आयुष्यात वेग-वेगळ्या वेळी मोलाची मदत करू शकते म्हणू आजचा हा लेख.

रोजच्या आयुष्यात इकिगाई :

·        काळजी न करणे

·        उत्तम पोषण सोबत उत्तम सवयी यांचा उत्तम मिलाप वाढविणे

·        मित्र वाढविणे आणि मैत्री जोपासणे

·        धावपळीचे, धकाधकीचे जीवन टाळता येऊ शकतं आणि हो, रोज व्यायाम करणं

·        हसत रहा, आशावादी रहा

·        देवाचे आणि प्रत्येकाचे धन्यवाद माना

·        निसर्गाशी नाते जोडा

·        नो वन इज परफेक्ट , आपली अपूर्णता कमीपणाची समजू नका

·        आज , आता उपलब्ध क्षण दिलखुलास जगा – जिंदगी ना मिलेगी दोबारा..   

इकिगाई म्हणजे रोजच्या जीवनात आनंद, परिपूर्णता आणि संतुलन शोधणे.

तुम्ही तुमची इकीगाई शोधा आणि सापडली तर मला कमेन्ट मध्ये सांगा.

 

अमित बाळकृष्ण कामतकर

सोलापूर

 

सोबत जरूर पहा :

नव्या करिअर मार्गदर्शन सिरिज विषयी माहिती देणारा व्हिडिओ:

करिअर गुरु


इतर विषयांवरील लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करावं

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ChatGPT कृत्रिम बुद्धिमत्तेचा अविष्कार- तारक की मारक ?

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?