सॉफ्ट स्किल्सचे महत्व
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला सॉफ्ट स्किल्स आवश्यक आहेत. ही कौशल्यं अचानक महत्वाची झाली का? पूर्वी ही कौशल्यं लागत नव्हती आणि अचानक यांची मागणी वाढली ? असं काही नाही, तर याची गरज पूर्वीही होतीच फक्त त्याचे महत्व मागील पाच-दहा वर्षात वाढलेलं आपल्याला दिसतं आहे. करिअरची निवड करताना यास अनन्य साधारण असे महत्व आहे आणि ते यापुढेही राहील. विद्यार्थ्यानी या गोष्टीस प्राधान्याने आत्मसात करणे गरजेचे बनले आहे. असे कुठलेच क्षेत्र नाही जिथे सॉफ्ट स्किलची गरज तुम्हास भासणार नाही. शैक्षणिक आणि व्यावसायिक यशासाठी सॉफ्ट स्किल्स महत्वाची भूमिका पार पाडतात. सॉफ्ट स्किल्स तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हास उत्कृष्ट मदत करतात. प्रत्येक व्यक्तीचे स्वत:चे असे जग असते, या जगात त्यास सांभाळून घेणारी मंडळी आजूबाजूस असतात पण जेंव्हा करिअरचा प्रश्न येतो अथवा जॉबला जाण्याचा प्रश्न येतो तेंव्हा सॉफ्ट स्किल्स बाहेरील जगास सामोरे जाण्यासाठी आणि सहकारी मंडळीं सोबत सहयोगी पद्धतीने कार्य करण्यासाठी आवश्यक ठरतात. सॉफ्ट स्किल्स ज्यास आपण सामाजिक कौशल्य असेही म्हणूयात, खरे तर ही गैर-तांत्रिक कौशल्ये