फॉलोअर

स्टार्टअप- उत्पादनाची व्यवहार्यता- समजण्यासाठी एम. व्ही. पी.


 

मला आशा आहे की आपण मागील दोन भाग वाचलेले असावेत. या भागात मी आपणास किमान व्यवहार्य उत्पादन विषयी मार्गदर्शन करणार आहे. Minimum Viable Product (MVP) ही तुमच्या उत्पादनाची अगदी मूलभूत आवृत्ती आहे जी त्वरित आणि स्वस्तात तयार करता येऊ शकते. याचा मूळ उद्देश लोकांचं उत्पादनात स्वारस्य आहे का? हे तपासणे आणि सत्यापित करणे हा आहे. कृपया “प्रोटो टाइप” आणि “MVP” मध्ये गोंधळ करून घेऊ नका. प्रोटोटाइप हा तुमच्या कल्पनेचा मसुदा आहे आणि MVP हे ग्राहक / परीक्षक यांच्या द्वारे वापरले जाणारे उत्पादन आहे. जो परीक्षक आहे तोच नंतर ग्राहक बनू शकतो.

MVP चे खालील प्रकारचे फायदे मला दिसतात:

१.      वेळ आणि पैसा वाचतो- MVP विकसित करणे सोपे आहे, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कमी भांडवली गुंतवणूक गरजेची आहे. उत्पादन तयार झाल्यावर जर तुम्हास आढळले की उत्पादनास बाजारातून उत्तम प्रतिसाद येत नाहीये तर तुम्ही त्वरित ते बंद करू शकता आणि दुसऱ्या उत्पादनाकडे लक्ष केंद्रित करू शकता. वेळ आणि पैसा वाचण्यास उत्तम मदत होते.

२.      ग्राहक अभिप्राय: MVP विकसित करण्याचा फायदा, ग्राहकास तुमच्या उत्पादना विषयी काय वाटतं? त्याची काय मतं आहेत? हे जाणून घेण्यास मदत मिळते. ग्राहक केंद्रित गरजा ओळखून त्याप्रमाणे बदल करणे सहज शक्य होते. फक्त तुम्हाला काय वाटतं हे महत्वाचं नाही हे लक्षात घ्या.

३.     व्यावसायिक लीडस् : MVP परीक्षकच तुमचे पहिले ग्राहक होऊ शकतात. एखादे उत्पादन विकसित करण्यात योगदान दिले आहे म्हणून ते तुमचे उत्पादन खरेदी करण्यास भावनिक दृष्ट्या जास्त संवेदनशील राहतील. त्यामुळे ते तुम्हास त्याचे पैसे देतील.

एक यशस्वी MVP केवळ उत्पादनाची व्यवहार्यता आणि फायदे सिद्ध करीत नाही तर ते भागधारकांना त्यांच्या गुंतवणुकीतील परताव्याची खात्रीशीर जाणीव करून देण्यासाठी आणि निधी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी मूर्त समाधान देखील देऊ करते.

          मला वाटतं या तीन भागात अत्यंत महत्वाचे असे मुद्दे मी आपणां समोर मांडू शकलो. स्टार्टअप विषयातील तज्ञ मंडळीं सोलापुरात थिंक ट्रान्स फाऊंडेशन पुणे यांच्या दोन शाखा (एम्प्लॉयमेंट चौकात- कामतकर अकॅडेमी, आणि जुळे सोलापूर - विद्या कॉम्प्युटर्स ) मार्फत कार्यरत आहेत. सोलापुरातील युवक मंडळींच्या कल्पनांना भरारी देऊ करण्यासाठी आणि सोलापुरातील युवक सोलापुरात राहूनच एक यशस्वी स्टार्टअप करावा यासाठी आवश्यक तो सारा सपोर्ट थिंक ट्रान्स फाऊंडेशन, पुणे देऊ करीत आहे त्याचा फायदा नक्कीच सोलापूरकरांना होईल असा विश्वास वाटतो.

 

अमित बाळकृष्ण कामतकर

सोलापूर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ChatGPT कृत्रिम बुद्धिमत्तेचा अविष्कार- तारक की मारक ?

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?