फॉलोअर

स्टार्टअप- संकल्पनेची उपयोगिता प्रमाणित करून घ्यावी


 

मागील भागात (ब्लॉग:-स्टार्टअपची कल्पना)आपण कल्पना कशी शोधावी याविषयी माहिती घेतली आणि स्वत:च स्टार्टअप कसे सुरू होईल या दिशेने पहिले पाऊल टाकले. एखादी कल्पना सुचणे म्हणजे झालं असे नाही होत, त्यास प्रमाणित करावं लागतं, तुमचे उत्पादन बाजारात कसे परफॉर्म करेल हे तुम्हाला निश्चित करणे क्रमप्राप्त आहे. विविध कसौटयांवर तुमची कल्पना कितपत यशस्वी होऊ शकते हे पाहणं देखील तितकच महत्वाचं वाटतं मला. हे करायचं कसं हे जाणून घेण्या अगोदर स्वत:स विचारा की जे तुम्ही करत आहात त्यामध्ये तुम्ही आनंदी आहात काय? बाजारात तुमच्या सेवा घेणारा / उत्पादन खरेदी करणारा ग्राहक वर्ग आहे का? तुमची कुणाशी स्पर्धा होऊ शकते त्याच्याकडे कोणती वैशिष्ट्ये आहेत याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. उदा. तुम्ही एखादे व्हिडिओ डावूनलोड करणारं अॅ प इनस्टाग्राम साठि तयार करीत आहात पण लक्षात घ्या तेच अॅप तुम्ही फेसबुक, यू-ट्यूब, यांच्यासाठी देखील वापरू शकता. बाजारात या प्रकारचे अनेक अॅप आहेत त्या अॅप पेक्षा तुमच्या अॅपमध्ये तुम्ही काही खास वैशिष्ट्ये देऊ केली तर सामान्य ग्राहक वर्ग देखील तुमच्या अॅप कडे आकर्षित होऊ शकतो.

१.                  मार्केट रिसर्च : -कल्पना (वॅलीडेट) प्रमाणित करणे म्हणजे काय तर बाजारपेठेचा अभ्यास. बाजारपेठेत जी उत्पादन उपलब्ध आहेत त्यानुसार तुमच्या उत्पादनाची माहिती देणारे पत्रक, त्याची वैशिष्ट्ये, उपयोग इ. विषयी माहिती उपलब्ध करून देणे. वेब वर उपलब्ध असणारे उत्पादन त्याची माहितीही सोबत ठेवणे ही आजच्या इंटरनेट युगात महत्वाची बाब आहे. नाही का? तुमच्या उत्पादनासारखे उत्पादन सापडले तर तुमच्या मध्ये आणि त्यामध्ये काय फरक आहे? याचे पूर्ण आकलन करा. “ग्राहक अभिप्राय” तुम्हास यामध्ये उत्तम मदत करू शकतात. एखाद्या उत्पादनात काय कमतरता आहे या विषयी ग्राहक राजा जरूर व्यक्त होतो त्यास उत्तम इनपुट म्हणून वापरा.

२.                  ग्राहक संवाद: - खूप महत्वाची स्टेप म्हणू आपण यास, “ऑनलाइन फोरम” यामध्ये खूप छान मदत करू शकतात. ऑनलाइन सर्वेद्वारे ग्राहक मागणी, हवी असलेली सेवा, या विषयी माहिती गोळा करणे सहज साध्य आहे. गुगल ट्रेंडस, की सर्वे , टाइप फॉर्म या वेब साइट तुम्हास मदत करू शकतात. तुमची कल्पना बाजारात कशी कामगिरी करेल हे जाणून घेण्यासाठी कोणतीही परिपूर्ण युक्ती नाही. तुम्ही फक्त चाचणी करू शकता आणि ती कार्य करते का ते तपासू शकता. हे ध्यानात घ्या, नवोदित उद्योजकांना आजच्या टप्प्यावर येण्यापूर्वी अनेक अपयशांना सामोरे जावे लागले आहे. “आयडिया चल पडी तो अपनी भी निकल पडी !!”

          तुमचे सोशल नेटवर्क आणि सोशल मीडिया याचे सामर्थ्य ओळखा, त्याचा योग्य वापर करा. तुमच्या ओळखीच्या लोकांशी तुमच्या कल्पनेची चर्चा करा, आणि त्यांना उत्पादन कसे हवे आहे ते जाणून घ्या. बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की चर्चा कुणाशी करावी? ती अनुभवी, त्या विषयातील तज्ञ मंडळीं सोबत करावी. सोलापुरात थिंक ट्रान्स फाऊंडेशन पुणे यांच्या दोन शाखा (एम्प्लॉयमेंट चौकात- कामतकर अकॅडेमी, आणि जुळे सोलापूर - विद्या कॉम्प्युटर्स )आहेत. या आणि आमच्याकडे मांडा तुमच्या कल्पना, आम्ही तुम्हास ऐकण्यास उत्सुक आहोत.

 

अमित बाळकृष्ण कामतकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ChatGPT कृत्रिम बुद्धिमत्तेचा अविष्कार- तारक की मारक ?

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?