दुसरं महायुद्ध, “चले जाव” आणि स्वातंत्र्य
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना , अनेक विचार मनात घोळत राहतात, आपल्याला खरे स्वातंत्र्य मिळाले का? आपण त्याचा योग्य वापर करीत आहोत का? खरी लोकशाही रुजविण्यात आपण भारतीय नागरिक म्हणून यशस्वी झालेलो आहोत काय? नैतिक मूल्य जोपासली जातात का? संविधानाने दिलेले अधिकार प्रत्येकवेळी सांगितले जातात पण कर्तव्यांची जाणीव झालेली आहे का? नसेल झालेली तर ती कधी होणार? अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत पण याची उत्तरं एक भारतीय म्हणून आपल्यालाच शोधावी लागतील, “मी भला आणि माझं घरं भलं” असे म्हणून चालणार नाही, आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो पर्यायाने देशाप्रती आपले कर्तव्य आहे ही भावना रुजवायची जास्त गरज वाटते मला. देशाचे रक्षण करणारे शूरवीर सैनिक कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी खंबीर आहेत, देशावर होणारा कोणत्याही प्रकारचा आघात ते परतवून लावू शकतात. पण देशांतर्गत उद्भविणाऱ्या संकटांना एक भारतीय म्हणून आपल्यालाच सामोरे जावे लागेल. २१ व्या शतकात डिजिटल युद्धास आपण नकळत सामोरे जात आहोत, वेळीच जागे होणे क्रमप्राप्त आहे. या युद्धात देशाची संपत्ती असलेल्या युवक वर्गास लक्ष्य केलं जात आहे. विवि