फॉलोअर

शापित

 

आयुष्यात अग्रेसर रहावं असे सगळ्यांना वाटतं. आयुष्यात सर्जनशील असणं खूप महत्वाचं असतं , ते एक उत्तम कौशल्य आहे, सगळ्यांकडे ते असावं पण असेलचं असे नाही. शिक्षण घेत असताना, नोकरी करीत असताना थोडा वेगळा विचार केल्यास त्यास “सर्जनशील” असे नामकरण केले जाते, किंबहुना सर्जनशील लोक विविध भूमिकां मध्ये त्याचां योग्य वापर करू शकतात. सर्जनशीलता म्हणजे केवळ कलात्मकता असणे नाही, या क्षमतेचा वापर करून समस्यांचे निराकरण करण्यासाठी विविध नावीन्यपूर्ण मार्ग विकसित करणं. ही “सर्जनशीलता”असावी का? तर त्याचे उत्तर होकारार्थी आहे, हो ती असावी !! पण किती असावी ? कोणत्या विषयात असावी? कुठे असावी? याची उत्तरं तुम्हालाच शोधावी लागतात. ही उत्तरं शोधत असताना तुम्हाला काही नवीन चेहरे पहाण्यास, अनुभवण्यास मिळतात, नवा “तगडा” अनुभव मिळतो आणि हो सर्वात महत्वाचं , एक नवा प्रश्न तुम्हास पडतो की तुम्ही “सर्जनशील” का आहात? हे सगळं अॅट वॉट कॉस्ट ?? कॉस्ट फॉर ऑपर्चुनिटी की ऑपर्चुनिटी कॉस्ट? मिळविलेल्या, निर्माण केलेल्या संधीसाठी खर्ची घातलेला वेळ, श्रम, पैसा सारं सारं व्यर्थ होतं.. आपण काहीच करू शकत नाही. काही करू शकत असू तर  “पुनश्च हरी ओम !!!!”, फक्त तो करायचा की नाही हा चॉइस तुमचा. असा “पुनश्च ....”    किती वेळा करावं यासाठी उत्तर नाही. शास्त्रज्ञ ज्याप्रकारे शोध लावताना प्रयत्न करीत राहतात अगदी तसचं !! वैयक्तिक कपॅसिटी किती यावर हे गणित बांधता येऊ शकेल.   

प्रस्थापित वाटेवर चालत ध्येय पूर्ती करण्यासाठी , यशस्वी होण्यासाठी कष्ट उपसण्याची तयारी पहायला मिळते पण नवीन वाट चोखाळण्यासाठी तयारी कुणाचीच नसते (काही अपवाद वगळता), अर्थात हे एवढं धाडसाचं स्टेटमेंट मी स्वानुभवावरून करीत आहे, तुमचा अनुभव वेगळा असू शकेल ! डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री मध्ये लिडर्सना फॉलो करणारे लोक यशस्वी होतात असा अनुभव (इंडस्ट्री सांगते असे) आहे, तिथे स्वत:च डोकं लावलं, सर्जनशीलता दाखविली की तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. म्हणजे या ठिकाणी सर्जनशीलता दाखविणारे लोक नकोच आहेत, असा अर्थ निघतो पण फक्त येथेच नाहीतर इतर ठिकाणी सुद्धा .. छे, एखाद्या भौगोलिक ठिकाणी वेळेच्या आधी तुम्ही काही करू इच्छित असाल तर तुम्हाला असाच अनुभव येऊ शकतो, नव्हे येतोच. “वेळे सोबत चाला म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल, वेगळं काही करू नका” असा नियम असतो अशा ठिकाणी, सामान्य आणि असामान्य कर्तुत्व असे आपण म्हणतो पण या दोन्ही भूमिका अशा ठिकाणी “फेल” होतात.  

“समय के साथ चलने वाले भुखे , समय के बाद चलने वाले भी भुखे” असा एक संवाद “क्रांतिवीर” चित्रपटात आहे, त्याची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. सर्जनशीलतेच्या यशस्वीतेचे प्रमाण तुम्ही कोणत्या भौगोलिक ठिकाणी आहात यावर नक्की अवलंबून असतं असे आता ठामपणे सांगता येईल. नापीक जमिनीची तुम्ही कितीही मशागत करा त्यावर पीक येणारचं नाही, आलंच काही उगवून तर पार्थेनियम – गाजर गवत !! अनावश्यक वाढणारं, जनावरं देखील न खाणारं गवत !!! १९५० च्या दुष्काळात अमेरिकेतून पी. एल.480 जातीचा गहू आयात केला गेला आणि हे बीज भारतात आलं तेंव्हापासून तुम्ही किती वेळा देखील याची काढणी करा ते उगवतचं.. प्रस्थापित वाट यालाच म्हणाव, नाही का?

 

अमित बाळकृष्ण कामतकर

ब्लॉगर, सल्लागार, लेखक, सॉफ्ट स्किल ट्रेनर, व्याख्याता

YouTube: Amit Kamatkar


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ChatGPT कृत्रिम बुद्धिमत्तेचा अविष्कार- तारक की मारक ?

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?