ads

फॉलोअर

आज वाचा

प्रगल्भतेचे वरदान- समाधानाची लेखणी

इमेज
  मानवी मनाचे अंतरंग हे अनाकलनीय आणि अथांग सागराप्रमाणे असते. या सागरात सतत विचारांचे , भावनांचे तरंग उमटत असतात. कधी आनंदाची भरती , तर कधी दुःखाची ओहोटी. या तरल , गुंतागुंतीच्या भाव-भावनांना मुक्त वावर देताना स्वतःला पाहण्याची , अनुभवण्याची आणि त्यातून एक प्रकारची आत्मिक शांतता मिळवण्याची किमया केवळ पुस्तकेच साधू शकतात. पुस्तके म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नसतात , तर ते लेखकाच्या अंतरीचा प्रवास असतो. लेखक आपल्या लेखणीतून विविध सफरींचे दर्शन घडवतो. हे दाखले , हे अनुभव केवळ कथा किंवा वर्णन नसतात , तर ते थेट आपल्या जगण्याशी , आपल्या अस्तित्वाच्या धाग्यांशी जोडणारे आरसे असतात. लेखकाने प्रामाणिकपणे मांडलेले सुख-दुःख , त्याचे यश-अपयश , त्याचे चिंतन आणि त्याचे अनुभव वाचकाच्या हृदयाला स्पर्शून जातात. अशावेळी , वाचक एका अद्भुत समाधानाचा अनुभव घेतो. त्याला हे जाणवते की , ज्या तीव्र भावनांचा अनुभव तो घेत आहे – मग ते उत्कट प्रेम असो , पराकोटीचे दुःख असो , जीवनातील संघर्ष असो किंवा अगदी साधा आनंद असो – त्या अनुभवात तो एकटा नाही. ' माझ्यासारखं अजूनही कुणी सुखी , दुखी या जगतात आहे ,' या जाणि...

कोडिंग म्हणजे काय ?

 


कोडिंग, आजकाल यश संपादन करण्यासाठी परवलीचा शब्द ! अर्थात यशाची व्याख्या ज्याची त्याची वेगळी असू शकते, आणि ती वेगळी असावीच, नाही का? संगणक वापरकर्ते (एंड युजर) आपण सगळेच असतो पण जर तुम्हाला तुमचा हा रोल बदलायचा असेल तर कोडिंग हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. संगणकास सांगता यायला हवं की तुम्हाला काय आउटपूट त्याच्याकडून हवय, मग हे सांगणार कसं? तर त्यासाठी आपण ज्या प्रकारे विविध भाषा मध्ये संवाद साधतो अगदी तसचं संगणका सोबत संवाद साधून त्यास आदेश देता येणं, आणि हवं ते आउटपूट मिळवणं हे कौशल्य आत्मसात करणं म्हणजे कोडिंग.. एखादा प्रोग्राम म्हणजे तर काय हो ? तर्कशुद्ध (लॉजीकल) सूचनांचा सेट , मग ह्या तर्कशुद्ध सूचना द्यायच्या कशा ? त्यासाठी कोणता फॉरमॅट असतो ? तर्कशुद्ध सूचना देता येणं हे एक कसबं आहे, हे शाळेतच मुलं शिकू शकतं असतील, तशी मुलांनी तयारी केली तर त्यांच्या शाळेच्या अभ्यासक्रमात देखील याचा फायदा ते मिळवू शकतात. तर्कशुद्ध सूचना द्यायच्या असतील तर तसा विचार करावा लागेल, एंड युजरची गरज काय आहे? याचा विचार करावा लागेल, एकदा आउटपूट काय हवं आहे हे ठरलं की मग इनपुट काय आणि कसं स्विकारायचं ? याचा विचार , ही विचारांची साखळी आहे, विद्यार्थ्यास ही साखळी एकमेकांस जोडता आली की एक उत्तम असा प्रोग्राम तयार होण्यास याची मदत मिळू शकते. सोबतच विद्यार्थी तांत्रिक दृष्ट्या सक्षम होतो, आपणां सर्वाना ज्ञात असलेली गुगल आणि गॅलुप या अमेरिका स्थित कंपन्यांनी केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की कोडिंग शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदतच मिळते आहे आणि त्यांची तंत्रज्ञानातील आवड जोपासली जात आहे.

कोडिंग विद्यार्थ्यास समस्या निराकरण कसे करावे ?, संघटनात्मक मांडणी कशी असावी?, गणिती प्रक्रिया कशा असाव्यात?, स्टोरी टेलिंग, डिझाईन कसे असावे ? इ. बाबी शिकविते. विद्या कॉम्प्युटर्स विद्यार्थ्यांस कोडिंग पाथवर घेऊन जाते आणि त्यांना कोडिंग कसे करायचे हे शिकविले जाते, ज्यामुळे विद्यार्थी त्यांचा स्वत:चा कोड लिहण्यास प्रवृत्त होतात आणि नव नवीन कोडिंग करू लागतात. पुढे जाऊन हीच विद्यार्थी मंडळी उत्तम कथानक रचणं, विविध गेम्स तयार करण्याच कौशल्यही आत्मसात करतात. कोडिंग करण्याची क्षमता विद्यार्थ्यांस एक नव निर्माता बनण्यास सक्षम करते, समोर येणारी विविध आव्हाने त्यावर तोडगा शोधण्याचे काम विद्यार्थी करू लागतो आणि यातूनच एका संधीचे रूपांतर उत्तम अशा करियर मध्ये होवू शकते, असा ठाम विश्वास आम्हास वाटतो. नव निर्माता बनणं स्वप्न असू शकतं पण ते सत्यात उतरणं शक्य आहे, गरज आहे ती फक्त मुलांना कोडिंग शिकण्याची आणि नवोन्मेष सादर करण्यास पहिलं पाऊल उचलण्याची.

कोडिंग करताना आपण शिकणार आहोत, HTML, एम्बेडेड प्रोग्रामिंग, सी, सी प्लस प्लस, ऑब्जेक्ट ओरीएनटेड प्रोग्रामिंग, जावा, पायथन आणखी भरपूर काही, चला मिळून एक्सप्लोअर करूयात ……………..

Best Wishes!!

अमित बाळकृष्ण कामतकर

 

ता . क. : कोडिंग शिकण्यास प्रारंभ करण्यासाठी - विद्या कॉम्प्युटर्स, प्लॉट नं २ श्रीकांत नगर, फार्मसी कॉलेज रोड, जुळे सोलापूर येथे संपर्क साधावा. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छावा

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

एआय शिक्षकांची जागा घेईल ?