कष्टाची शिदोरी आणि आशीर्वादाची किमया
आज फोटो अल्बम मध्ये डोकावताना “विद्या कॉम्प्युटर्सचा तिसरा वर्धापन दिन” पुन्हा एकदा अनुभवला !! विद्या कॉम्प्युटर्सचा तिसरा वर्धापन दिन अर्थात ०९ फेब्रुवारी २००३, सेलिब्रेशन करण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, या मध्ये प्रामुख्याने “जिल्हास्तरीय डान्स कॉम्पिटिशन” चे आयोजन आणि तेही “सुशील रसिक” सभागृहात !! सोलापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता, “सुशील रसिक” गच्च भरलं होतं, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक , कवी स्व. व्यंकटेश कामतकर उपस्थित होते. इंस्टिट्यूट मध्ये रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती, त्यात विद्यार्थीनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता, इंस्टिट्यूट येथील समोरच्या जागेत रांगोळी काढण्यात आल्या, यासाठी परीक्षक म्हणून येथील महिला मंडळातील पदाधिकारी पुढे आले आणि त्यांनी ही महत्वपूर्ण भूमिका पार पाडली. हे सारं घडत होतं, गीतकार गुलशन बावरा यांच्या शब्दांत सांगायचं झालं तर “मिले जो कडी कडी एक जंजीर बने, प्यार के रंग भरो, जिंदा तस्वीर बने”, आज या गोष्टीस २1 वर्ष लोटली, विद्या कॉम्प्युटर्स वर विश्वास ठेवून पालकांनी त्यांच्या पाल्यास आम