फॉलोअर

हॉस्पिटॅलिटी आणि इवेंट मॅनेजमेंट उद्योग- एक उत्तम स्टार्टअप

 

हॉस्पिटॅलिटी उद्योग हा एक मोठा उद्योग आहे ज्यामध्ये करिअर करण्यासारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जे फायदेशीर ठरू शकतात. तुम्हाला फूड अँड बेवरेज मॅनेजर व्हायचे असेल असेल तर अनेक करिअर मार्ग तुम्हाला यात मिळतील. अर्थात हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट हे विविध करिअर पर्याय उपलब्ध करून देणारे क्षेत्र आज अनेक युवक मंडळींना खुणावत आहे. युवक वर्गास समूहा (लोकां) सोबत काम करण्यास सोबतच नवीन आव्हाने पेलण्याची क्षमता आणि आवड असल्यास रोज विकसित होत असलेल्या हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात अद्भुत संधी दडलेल्या आहेत, त्या कुतुहलाने एक्सप्लोर करायची गरज आणि मानसिकता हवी एवढचं. एक ध्यानात ठेवावं लागेल जर तुम्ही व्यवस्थापक भूमिकेत असाल तर हा एक स्पर्धात्मक उद्योग आहे, अर्थात स्पर्धां आजकाल प्रत्येक क्षेत्रात आहे. रोज बदलणाऱ्या यां जगात नवं-नव्या आव्हानास सामोरे जावं लागेल. जिद्द, चिकाटी ही गुणं वैशिष्टं जोपासावी लागतील हे मात्र नक्की !       

हॉस्पिटॅलिटी अर्थात आदरातिथ्य – आतिथ्यशिलता हा उद्योग वैविध्यपूर्ण आहे यामध्ये विविध भूमिकांचा समावेश आहे. हे क्षेत्र सेवा क्षेत्रात मोडते, जसे की रेस्टॉरंट, हॉटेल उद्योग, कार्यक्रमाचे नियोजन, रेसॉर्टस, स्पा अँड वेलनेस इ. या साऱ्या गोष्टी एकमेकास पूरक आहेत. लोक जेंव्हा या स्थळांना भेटी देतात तेंव्हा त्यांना आवश्यक ते सारं मिळावं असे अपेक्षित असतं. ते जाणणं, ओळखणं आणि उपलब्ध करून देणं ही एक कला आहे असे माझे ठाम मत आहे. हा उद्योग नेहमीच वाढता आणि बदलत राहणारा आहे, रोज नव्या कल्पना सुचणे, नवे ट्रेंड समजून घेणे आणि अंमलात आणणे हे एक आव्हान असू शकते. अर्थात म्हणूनच मी या क्षेत्रात अपार करिअरच्या संधी आहेत असे म्हणतो आहे.

तुम्ही निवड करू शकता असे काही करिअर पर्याय-

१.      हॉटेल व्यवस्थापन : - यात हॉटेल मधील सर्व विभाग चालविणे समाविष्ट आहे, याचा अर्थ पूर्ण हॉटेल व्यवस्थापन – स्वागत कक्षा पासून लोकांचा वावर तुमच्या कामाच्या ठिकाणी कुठे कुठे होईल त्या सर्व ठिकाणचे व्यवस्थापन. हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट एकाच बास्केट मध्ये ठेवले जातात परंतु हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटमध्ये अधिक भूमिका असतात.

२. 


     अन्न आणि पेय व्यवस्थापन: - या मध्ये रेस्टॉरंट मॅनेजर होण्यापासून ते केटरींग कंपनी चालविण्यापर्यन्तच्या भूमिकांचा समावेश होतो. ज्या युवक वर्गास खाण्यात आणि तयार  करून खाऊ घालण्याची आवड आहे ही मंडळी एकत्रित येऊन व्यवस्थापन आणि आदरातिथ्य या कौशल्यांच्या जोरावर उत्तम करिअर करू शकतात.

३.      कार्यक्रमाचे नियोजन आणि व्यवस्थापन : उत्सव साजरा करता येणं महत्वाचं आहे. आजच्या युगात इवेंट साजरा करता येणं, एक कौशल्य आहे. आदरातिथ्याचा एक मोठा भाग इवेंट मध्ये दिसून येतो, समाविष्ट असतो मग ते कॉन्फरन्स , कॉर्पोरेट इवेंट, विवाह सोहळे, धर्मादाय कार्यक्रम किंवा उत्सव असोत. जर युवक वर्गास इवेंटचे नियोजन आणि आयोजन करण्यास आवडत असेल आणि सर्वात महत्वाचं त्यांच्याकडे क्रीएटिविटि असेल तर तुम्ही इवेंट मॅनेजर होऊ शकता. तुमचे कोणतेही दोन प्रोजेक्ट्स एक सारखे असू नयेत एवढी काळजी घ्या म्हणजे झालं !

४.     प्रवास आणि पर्यटन: - या प्रकारात विविध भूमिका निभावाव्या लागतात, ज्या मध्ये विमानसेवा, रेल्वे प्रवास आणि इतर भागांचा समावेश होतो. या सर्वांमध्ये सुरळीत कामकाज आणि दर्जेदार आदरातिथ्य सुनिश्चित करण्यासाठी व्यवस्थापन आणि नियोजन आवश्यक आहे.  

५.     इतर करिअर पर्याय: हॉस्पिटॅलिटी उद्योग क्षेत्रात आर्थिक आणि महसूल व्यवस्थापन हाताळण्यात युवक वर्गास संधी उपलब्ध आहेत.

हॉस्पिटॅलिटी उद्योगात सुरुवात कशी करावी?

ü  सतत शिकण्यावर आणि कौशल्य विकसित करण्यावर भर द्या

ü  नेटवर्क कनेक्ट वाढवा

ü  विषयातील प्रमाणपत्रे आणि प्रशिक्षण मिळवा

ü  इंटर्न शिप आणि मेंटोरशिप द्वारे अनुभव मिळवा. 

या उद्योगात स्टार्टअप करायचा असल्यास कोणती कौशल्यं आवश्यक आहेत?

§  प्रभावी संवाद कौशल्य

§  वेळेचे व प्रकल्प व्यवस्थापन

§  कुशल नेतृत्व

लिंक्डइन संशोधन आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (फ्यूचर ऑफ जॉब्स) एका अहवालानुसार २०२५ पर्यन्त, समस्या सोडविणे, क्रीटिकल थिंकिंग, सर्जनशीलता (creativity), लोकांचे व्यवस्थापन आणि भावनिक बुद्धिमत्ता ही कामाच्या ठिकाणी आवश्यक असलेली सर्वात महत्वाची कौशल्ये असतील.

 

अमित बाळकृष्ण कामतकर

ब्लॉगर, सल्लागार, लेखक, सॉफ्ट स्किल ट्रेनर, व्याख्याता

संचालक- विद्या कॉम्प्युटर्स, सोलापूर

संचालक- थिंकट्रान्स फाउंडेशन, पुणे 


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?

ChatGPT कृत्रिम बुद्धिमत्तेचा अविष्कार- तारक की मारक ?