फॉलोअर

आज वाचा

मनातलं

इमेज
            एखादा विषय विचारात रुंजी घालू लागला की जो पर्यन्त तो कागदावर उतरवित नाही तो पर्यन्त चैन पडत नाही. कधी कधी अगदी नवा विषय , नवं तंत्रज्ञान, नवी कल्पना डोक्यात येते तर कधी चालू घडा मोडींवर भाष्य करावं , आपल्याकडील ज्ञान शेअर असा विचार येतो. अशा वेळी पूर्वी अगदी वही पेन घेऊन ते सारे विचार समर्पक , योग्य, सोप्या भाषेत मांडले की आनंद मिळायचा, तोच आनंद आता संगणकावर हे सारं सेव्ह केलं की मिळतो ही गोष्ट स्वाभाविक आहे. इतरां प्रमाणेच सुरुवात फक्त स्वत:च्या आनंदासाठी लिहिणे येथूनच झाली पण जस जसे नवे तंत्रज्ञान शिकू लागलो तस तसे याचे ज्ञान सर्व सामान्यां पर्यन्त पोहोचू शकेल का ? तेही मराठीत त्यांना समजेल अशा भाषेत यावर विचार केला आणि तसे लिहिण्यास सुरुवात केली. कधी एखाद्या तंत्रज्ञानाच्या माहिती साठी विशेष मागणी यायची तर कधी मीच नव्या तंत्रज्ञानाच्या सागरातून निवडक मोती शोधायचो आणि त्याची विशेषत: विषद करायचो. संगणकावर युनिकोड सुरू झाल्यानंतर स्वत:चा ब्लॉग असावा असे विचार येऊ लागले, तसे पाहिले तर युनिकोड मध्ये भारताचा सहभाग हा २००० साली झाला, पण त्याचा प्...

कष्टाची शिदोरी आणि आशीर्वादाची किमया

 




आज फोटो अल्बम मध्ये डोकावताना “विद्या कॉम्प्युटर्सचा तिसरा वर्धापन दिन” पुन्हा एकदा अनुभवला !!  विद्या कॉम्प्युटर्सचा तिसरा वर्धापन दिन अर्थात ०९ फेब्रुवारी २००३, सेलिब्रेशन करण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, या मध्ये प्रामुख्याने “जिल्हास्तरीय डान्स कॉम्पिटिशन” चे आयोजन आणि तेही “सुशील रसिक” सभागृहात !! सोलापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता, “सुशील रसिक” गच्च भरलं होतं, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक , कवी स्व. व्यंकटेश कामतकर उपस्थित होते.

इंस्टिट्यूट मध्ये रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती, त्यात विद्यार्थीनींनी  उत्स्फूर्त सहभाग घेतला होता, इंस्टिट्यूट येथील समोरच्या जागेत रांगोळी काढण्यात आल्या, यासाठी परीक्षक म्हणून येथील महिला मंडळातील पदाधिकारी पुढे आले आणि त्यांनी ही महत्वपूर्ण भूमिका पार पाडली. हे सारं घडत होतं, गीतकार गुलशन बावरा यांच्या शब्दांत सांगायचं झालं तर “मिले जो कडी कडी एक जंजीर बने, प्यार के रंग भरो, जिंदा तस्वीर बने”, आज या गोष्टीस २1  वर्ष लोटली, विद्या कॉम्प्युटर्स वर विश्वास ठेवून पालकांनी त्यांच्या पाल्यास आमच्याकडे संगणक शिकण्यास पाठविले आणि आम्हास जुळे सोलापुरातील सर्वात मोठी, अनुभवी आणि मान्यताप्राप्त संगणक संस्था असा नाव लौकिक मिळवून दिला, शतश: धन्यवाद !!     

        


२००३ मध्ये , मला वाटतं, सोनी टी. व्ही. वर “बुगी-वुगी” नावाने डान्सचा कार्यक्रम असायचा, त्यातील “बू......”  हा शब्द आम्ही निवडला आणि वृत्तपत्रात जाहिरात दिली (सोबत जाहिरात आहे), मग साहजिकच स्पर्धकांची चाचणी, गाण्याची निवड, त्यांचा डान्स , त्यात काही आवश्यक सूचना (गरजेचे असल्यास), अगदी त्यातील ज्ञान असल्या सारखं हे सारं सारं करण्यात एक वेगळीच मजा होती, उत्साह होता, सोबत करण्यास माझे विद्यार्थी होतेच त्यांच्या शिवाय कोणताच वर्धापन दिन कार्यक्रम आम्ही साजरा केला नाही, करू शकत नाही. डान्स स्पर्धे साठी “परीक्षक” म्हणून मा. श्री. महेश निकम्बे सर आले होते, त्यांनी अगदी प्रेमाने, आपुलकीने आमच्याशी आणि स्पर्धकांशी साधलेला संवाद मला आजही जशाच तसा डोळ्या समोर तरळतो. कार्यक्रमात आम्ही सत्कार केला, तर सर म्हणाले “मी घरचा माणूस”, तसे पाहिले तर माझी आणि त्यांची कार्यक्रमा पूर्वीच ओळख झालेली पण तरी देखील संस्था वर्धापन दिन आणि डान्स स्पर्धाचे आयोजन त्यांना भावलं होतं, त्यांच्या डान्स वरील प्रेमा पोटी आणि आशीर्वाद देण्यासाठी महेश सर आले होते. माणसं कर्तृत्वाने मोठी असतात म्हणजे काय याची प्रचिती त्या दिवशी आली.

          सुशील रसिक सभागृहात तर जल्लोष !! आनंदास उधाण आलं होतं , अख्खं सभागृह विद्यार्थी आणि स्पर्धकांनी डोक्यावर घेतलं होतं, हे सर्व लांबून पाहणारे आणि लक्ष ठेवणारे आमचे “विद्याचे” स्वयं-सेवक होतेच तिथे !! नियोजन आणि सादरीकरण एवढं उत्तम होतं की प्रमुख पाहुणे व्यंकटेश कामतकर यांना हे सारं सारं भावलं ! त्यांनी विद्यार्थी आणि उपस्थित सोलापूरकरांना मार्गदर्शन करताना विद्या कॉम्प्युटर्सच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले, त्याच  शिदोरीवर आम्ही आज पर्यन्त मार्गक्रमण करीत आहोत आणि करीत राहू.

          फोटो अल्बम मध्ये सामावलेलं विद्या कॉम्प्युटर्सचं छोटसं जग, आमचं “आनंदाच पान” आज या निमित्ताने तुमच्यासोबत शेअर करताना अभिमानाने उर भरून आला आहे.  


ता. क.: या वर्षी विद्या कॉम्प्युटर्स रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. 

 

अमित बाळकृष्ण कामतकर

संचालक- विद्या कॉम्प्युटर्स          




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छावा

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

एआय शिक्षकांची जागा घेईल ?