आनंदचा ‘मुरारीलाल’

“मुरारीलाल”, हे नाव कानावर पडताच डोळ्यासमोर कोण येतं? तुम्ही म्हणाल “आनंद” चित्रपटातील जॉनी वॉकर, खरं ही आहे ते वॉकर यांनी ती भूमिका बजावली नव्हती तर ते ती भूमिका जगले होते. पण राजेश खन्नास प्रतिसाद देणारे इसाभाई सुरतवाला हे पात्र त्यांनी निभावलं होतं. मुरारीलाल पात्र आपल्या समोर उभं करण्यात जॉनी वॉकर यशस्वी झाले, असेच मी म्हणेन. साद असेल तर प्रतिसाद हा प्रकृतीचा नियम पण तो सर्वानाच माहिती असतोच असे नाही. चित्रपटात एखादा दुर्धर आजार सोबत घेऊन फिरणारा, केवळ सहा महिने आयुष्य असणारा आनंद ! अनेकांना साद घालत फिरतो पण कुणीतरी एकच त्यास प्रतिसाद देतो. असेच साद घालत फिरणारा आनंद तर आपल्या अवती भवती सुद्धा तुम्हाला भेटत असतील. दिलखुलास आयुष्य जगणारे आनंद, दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद मानणारे, आयुष्य नितांत सुंदर आहे आणि ते भर भरून जगायला हवं म्हणून कृतीतून शिकविणारे आनंद ! एक नाव पण अनेक रूपं धारण करणारे आनंद ! तुम्हाला असा एखादा आनंद भेटला आहे का ? माझी रोज सकाळी अशाच एका “आनंदची” भेट होते. एक मित्र म्हणून नक्कीच रोज भेटावा असाच हा आनंद ! मॉर्निंग वॉक दरम्यान, प्रचंड ऊर्...