फॉलोअर

यशोगाथा - फ्लिपकार्ट



मागील २ दशकांमध्ये इंटरनेट व त्या माध्यमातून खरेदी करणे याची व्याप्ती सर्व ठिकाणी पहावयास व अनुभवास येते. ई-कॉमर्स ची पाळ-मूळ आता खूप खोलवर रुजून प्रत्येक भारतीयाच्या रोजच्या जीवनाचा हिस्सा बनु पहात आहेत. ऑनलाईन खरेदी-विक्री करणे म्हणजेच ई-कॉमर्स आणि त्यात होणारी उलाढाल उल्लेखनीय आहे. भारतात ई-कॉमर्स सर्वांपर्यंत आज पोहोचले आहे असे नाही म्हणता येणार पण वापर करण्याऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे हे नक्की !!!

            फ्लिपकार्ट हे नाव बऱ्याच मंडीळीना चांगलच परिचयाच आहे. ज्या मंडळींनी ऑनलाइन (इंटरनेट च्या माध्यमातून) खरेदी केली आहे त्यांना फ्लिपकार्ट चा उत्तम परिचय आहे. त्यातच वर्तमानपत्र आणि टेली-व्हिजनवर जाहिराती च्या माध्यमातून या कंपनीचा परिचय झालेला असेलच ! फ्लिपकार्ट चा जन्म २००७ मध्ये अवघ्या ४ लाख भांडवलावर झाला.ते भांडवल देखील वेबसाईट तयार करणे आणि त्याची जाहिरात करणे यासाठी वापरण्यात आलं होत. फ्लिपकार्ट ची सुरुवात सचिन व बिन्नी बन्सल या आय आय टी दिल्ली च्या युवकांनी फ्लिपकार्ट ऑनलाइन सर्व्हिसेस प्रा.ली. या नावाने केली. या दोघांकडे amazon या कंपनीत काम करण्याचा अनुभव होता आणि त्याच जोरावर त्यांनी फ्लिपकार्ट ची सुरुवात जोमात केली. सुरुवातीच्या काळात कंपनी फक्त पुस्तके विकत असे, आणि आज आपल्याला लागण्याऱ्या जवळपास सगळ्या वस्तू फ्लिपकार्ट ऑनलाइन विकतं. सुरुवातीच्या काळात अडचणींचा डोंगर फ्लिपकार्ट च्या समोर होता त्यात सगळ्यात महत्वाची अडचण असेल तर ती म्हणजे “पेमेंट”, खरेदीदार डेबिट/क्रेडीट/कार्ड यांचा वापर फार कमी प्रमाणात करीत असत, इंटरनेट बँकिंग करणारे देखील फार कमी लोक असतं. मग खरेदीचे पेमेंट मिळवायचे कसे? यावर फ्लिपकार्ट ने तोडगा काढला आणि त्यास उदंड प्रतिसाद भारतीयांनी दिला. तो म्हणजे कॅश ऑन डीलीव्हेरी , COD !! आणि या मुळेच फार कमी वेळेत फ्लिपकार्ट सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचलं. याची नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध गुंतवणूक कंपन्यांनी घेतली व २००९ मध्ये १ दशलक्ष यु.एस.डॉलर एवढी गुंतवणूक मिळविण्यात कंपनी यशस्वी झाली. पुढे २०१० मध्ये १० दशलक्ष आणि २० दशलक्ष यु.एस.डॉलर एवढी गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार देखील कंपनीस मिळाले.यातील न्युयोर्क स्थित टायगर ग्लोबल मॅनेजमेंट या कंपनीने आज पर्यंत २.७ अब्ज डॉलर एवढी गुंतवणूक फ्लिपकार्ट मध्ये केली आहे. या सर्व बाबी कंपनीच्या विविध योजना, देण्यात येणारी सेवा आणि सोबतच खरेदीदारांकडून मिळणारा अभिप्राय या जोरावर कंपनीने मिळविला आहे.
            २०११ मध्ये फ्लिपकार्ट ने वि-रीड,mime360, chakpak.com या कंपन्यांना ताब्यात घेतलं आणि नंतर २०१४ मध्ये भारतातील सर्वात मोठे ऑनलाइन कपड्यांचे दालन अशी ओळख असलेल्या mymyntra.com ला ताब्यात घेतलं. आश्चर्याची बाब म्हणजे २०१४ साली कंपनीने त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांची संख्या १५००० आहे असे सांगितले आहे. भारतातील सर्व शहरात, खेड्यात पोहोचण्यासाठी आवश्यक वाहतुकीची व्यवस्था निर्माण करणे हे अजूनही मोठे आव्हान फ्लिपकार्ट समोर आहे त्यावर तोडगा काढण्यासाठी सप्लाय-चैन कार्यक्षमता वाढविणे, तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे आणि वापरण्यामध्ये सहजता आणणे आदी बाबींवर कंपनी सतत काम करीत आहे.

फ्लिपकार्ट च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा  !!

अमित बाळकृष्ण  कामतकर
सोलापूर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ChatGPT कृत्रिम बुद्धिमत्तेचा अविष्कार- तारक की मारक ?

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?