चॅट बॉट – मनोरंजक पण तितकच उपयोगी
चॅट बॉट एक नव कोर तंत्रज्ञान जे तुम्हाला इंटरनेट च्या सहाय्याने संवाद साधण्यासाठी तयार केलेले आहे. हा संगणक प्रोग्राम आहे. एका सर्व्हे द्वारे अस समोर आल आहे कि इंटरनेट युजर्स हे सोशल मेडिया साईटस् पेक्षा मेसेंजर चा वापर जास्त करतात. अगदी हाच धागा पकडून चॅट बॉट ची निर्मिती केली जात आहे. काही नियम व कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा वापर करून चॅट बॉट ची निर्मिती होत आहे. हि सेवा कोणत्याही सेवेशी जोडता येवू शकते जसे कि काही ठराविक टास्क पासून गमतीसाठी चॅट बॉट वापरता येवू शकतो. चॅट बॉट हे तंत्रज्ञान आता इंटरनेट वरील जवळपास सर्वच ठिकाणी वापरलं जातं. युजर्स सध्या विविध खरेदी ऑनलाईन करीत आहेत हि खरेदी करताना शक्यतो खरेदी करायची बाब ऑनलाईन सर्च केली जाते, त्या वेबसाईटवर ब्राउज केली जाते. साधारण पणे ती गोष्ट सापडत नाही तोपर्यंत ती सर्च केली जाते, इथेच चॅट बॉट चा वापर करता येतो, एखाद्या ऑनलाईन स्टोअर ने जर चॅट बॉट तयार केली तर दुकानामध्ये ज्याप्रकारे सेल्समन सोबत बोलणे होते अगदी त्याचप्रमाणे चॅट बॉट वर संवाद होवू शकतो यामुळे खरेदी करण अधिक सोप होवू शकत. चॅट बॉट ची काही उदाहरणे पाहूय