तुमचे डिव्हाइस सुरक्षित कसे ठेवाल ?
तुमचे डिव्हाइस सुरक्षित कसे ठेवाल ?
आजचे युग हे डिजिटल युग आहे. स्मार्ट
फोन, टॅब, लॅपटॉप या नित्याच्या आणि वापरात येणाऱ्या गोष्टी झाल्या आहेत. अन्न, वस्त्र,
निवारा सोबत हे डिव्हायसेस देखील
अत्यावश्यक गरज म्हणाल्यास अतिशयोक्ती होणार नाही.पण बऱ्याच वेळा विविध अॅप्स अथवा
मालवेअर्स (एक असा प्रोग्राम जो खास करून काही नुकसान करणे हेतू अथवा काही माहिती
घेणे हेतू तयार केलेला असतो.) डिव्हायसेस वर डाऊनलोड होतात आणि मग सुरु होते डिव्हाइस
सुरक्षित करण्यासाठी धडपड !!!! पण काय करावे हे माहिती नसल्याने किंबहुना माहिती
असणे म्हणजे खुप काही शिकावं लागेल असे नाही. मी खाली दिलेल्या जुजबी माहिती देखील
तुम्हास डिव्हाइस सुरक्षित ठेवण्यास मदत करेल.
१.
तुमचे डिव्हाइस क्लीन ठेवा : क्लीन ठेवा याचा अर्थ फक्त बाहेरून स्वच्छ असा होत नाही तर आपण काही अॅप्स
डाऊनलोड करतो ते डाऊनलोड केल्यावर फार वेळा वापर करीत नाही (एकदा अथवा दोन वेळा
वापरतो) पण परत त्याचा वापर करीत नाही असे अॅप्स तुमच्या डिव्हाइस वरून अन-इंस्टॉल
करून टाका यामुळे डिव्हाइस वर रिकामी जागा तयार होईल आणि तुमचा डिव्हाइस जलद गतीने
काम करताना तुम्हाला दिसेल.
२.
अप-टू-डेट ठेवा : तुमच्या डिव्हाइसची ऑपेरेटिंग सिस्टम अप-टू-डेट ठेवा. बऱ्याच वेळा अशी अपडेट्स
डिव्हाइस कडून लक्षात आणून दिली जातात पण युजर त्याकडे दुर्लक्ष करतात तसे करू
नये. कारण या अपडेट्स मुळे तुमचा डिव्हाइस जास्त सुरक्षित होण्यास मदत मिळते.
३.
पासवर्ड चा वापर : तुमचे डिव्हाइस कुणी इतर व्यक्तीने वापरू नये यासाठी त्यास
पासवर्ड द्या. हा पासवर्ड देताना तुमचा वाढदिवस, तुमच्या नातेवाईकांचे नांव अथवा
मोबईल क्रमांक असे सहज अंदाज बांधता येणारे पासवर्ड ठेवू नयेत.
४.
ई-मेल सूचना : आपण
इंटरनेट वर ई-मेल वापरीत असताना ऑफर मेल येतात ते न वाचताच युजर “यस”या बटनावर
क्लिक करून रिप्लाय देतात, असे करू नका. असा कोणताही ऑफर ई-मेल आल्यास त्याची
विश्वासार्हता तपासा मगच त्यास जरुरी असल्यास उत्तर द्या, अथवा फोरवर्ड करा.अन्यथा
नको.
५.
वाय-फाय चा वापर : वाय-फाय चा वापर करीत असताना तो काळजीपूर्वक करा.तुमच्या कडे वाय-फाय सुविधा
असल्यास त्याचा पासवर्ड बदलत रहा. जिथे वाय-फाय पासवर्ड नाही तेथील सेवा मोफत आहे
म्हणून वापर करणे टाळा.
वरील बाबी तुम्हाला तुमचे डिव्हाइस सुरक्षित ठेवण्यास मदत करतील. सुरक्षित
रहा !!!
अमित कामतकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा