फॉलोअर

परदेशी भाषा शिकणे अगदी सोपे



          माणूस जन्मास आला आणि जसं त्याला बोलता येवू लागत तस तो त्याची मातृभाषा शिकत जातो त्यास खास परिश्रम घेवून शिकण्याची गरज भासत नाही पण उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं म्हंटल कि विविध भाषा लिहिता, बोलता यायला हव्या यास आपण लाईफ स्कील म्हणूयात कारण आयुष्यात गरजेप्रमाणे आपणांस हे आत्मसात करावे लागते. हे लाईफ स्कील शिकण्यासाठी / आत्मसात करण्यासाठी विविध तंत्रज्ञान आज उपलब्ध आहेत पण तुमच्या मोबईल मध्ये एका अॅप द्वारे अथवा तुमच्या पर्सनल कॉम्प्युटर वर इंटरनेट द्वारे परदेशात बोलल्या जाणाऱ्या भाषा शिकण्यास मिळालं तर आणि तेही अगदी मोफत !! तुम्हाला नक्कीच आवडेल, हो ना ?


          तर मग duolingo हि एक अशीच वेबसाईट आहे ज्यावर तुम्ही स्पॅनिश,जर्मन,फ्रेंच,इटालियन, डच,इरीश आणखी भरपूर काही भाषा अगदी मोफत शिकू शकता. या शिकण्याच्या पध्दती मध्ये एकदम साधा सोपी संकल्पना वापरली आहे. एखाद्या (कॉम्प्युटर) एज्युकेशन गेम मध्ये ज्याप्रमाणे एखाद कौशल्य तुम्हाला जमल तर पॉईन्ट मिळतात अथवा ते नाही जमलं तर एखादी लाईफ कमी होते, अगदी तस्स !! आहे ना इंटरेस्टिंग ? duolingo तुम्ही निवड्ताल ती भाषा लिहायला, वाचायला आणि ऐकायला शिकण्यास मदत करते/ शिकविते. अजून एक महत्वाचा भाग म्हणजे duolingo मध्ये तुम्ही दिलेले ३४ तास म्हणजे विद्यापीठाच्या एका सेमिस्टर एवढे मोजले जातात. तुम्ही शिकण्यास सुरुवात केली कि प्रत्येक पाठानंतर प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांची अचूक उत्तरे दिली तर त्याची दखल घेतली जाते, आणि तुमच उत्तर चुकल्यास त्यात सुधारणा कशी करायची याची देखील सूचना केली जाते. भाषा शिकत असताना सलग किती दिवस तुम्ही शिकत आहात यासाठी वेगळे ट्रॅक रेकॉर्ड ठेवण्यात येते ज्यामुळे पुढे शिकण्यास प्रेरणा मिळते. हि सुविधा मोबईल वर देखील अॅप माध्यमा द्वारे उपलब्ध असल्याने तुम्ही तुमच्या सोईने कधीही भाषा शिकू शकता. 


हॅप्पी लर्निंग !!

अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर 

अधिक माहितीसाठी विद्या कॉम्प्युटर्सला भेट द्यावी किंवा VIDYA COMPUTERS भेट द्या "गेट कोटवर
क्लिक करावं. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ChatGPT कृत्रिम बुद्धिमत्तेचा अविष्कार- तारक की मारक ?

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?