मेल मर्ज काय आहे ?
रेखा आणि सुरेखा दोघी शाळेत शिक्षिका आहेत. शाळेत आता सर्वंकष मूल्यमापन पद्धती आल्यामुळे शिक्षकांना संगणकाचा वापर करणे अनिवार्य होत चालल आहे. अर्थात शिक्षण संगणकाचा वापर देखील करत आहेत. रेखा व सुरेखा दोघी मैत्रिणी एकाच वेळी शाळेत रुजू झाल्या आणि आपली सेवा बजावू लागल्या. शाळेतील मुलांच्या सर्वात जास्त आवडत्या शिक्षिका बनल्या आहेत. यामध्ये त्यांचे शैक्षणिक योगदान मोलाचे आहेच पण दोघीही प्रात्यक्षिक केंद्रित प्रशिक्षण देण्यामध्ये विश्वास ठेवतात त्यामुळे सादरीकरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांध्ये लोकप्रिय झाल्या आहेत. शाळेत पुढील महिन्यात एक कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम विद्यार्थी व पालक दोघांसाठी आहे. नुकतीच मुख्याध्यापकानी सर्व शिक्षकांना माहिती दिली व कामास सुरुवात करा, जास्तीत जास्त विद्यार्थी व पालक कार्यक्रमास कसे उपस्थित राहतील याकडे जातीने लक्ष द्या अशा सूचना केल्या. त्याचवेळी सुरेखा ने पुढे होत, आपण सर्व विद्यार्थ्यांच्या घरी आमंत्रण पत्र पाठवावीत असे सुचविले. “पण एकाच वेळी एवढी पत्र लिहून आणि पोस्ट करून होतील?” , मुख्याध्यापकांनी सुरेखाला विचारल. य