पोस्ट्स

2018 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फॉलोअर

गुगल डुडल !!

इमेज
गुगल आज (२७/०९/२०२३) २५ वर्षाचं होत आहे. आजचे डूडल गुगलचा लोगो चा प्रवास दाखवीत आहे. १९९८ ला सुरु झालेला “वेब वर माहिती हुडकण्याचा” प्रवास निरंतर सुरु आहे. १९९८ ला सगळ्याना भीती होती ती Y2K ची, काय होईल २००० साली? काही कॉम्प्युटर प्रोग्राम मध्ये कोडींग ज्या प्रकारे केलेले होते त्याप्रमाणे वर्ष बदलेल का कॉम्प्युटर साल १९०० दाखवेल. या भितीने त्यावेळी गुगल ला सर्वात जास्त विझिट्स झाल्या असाव्यात. याहू मेल जास्त वापरलं जायचं त्याचवेळी हॉट मेल हि वापरात होतं पण जिथे कनेक्टीव्हिटी चाच विषय होता तिथे हे सगळं आता सारखं लगेच उपलब्ध होत नव्हतं. सोलापुरात (किंबहुना सगळीकडेच) ९७-९८ दरम्यान इंटरनेट जोडणीला बराच वेळ लागायचा, तेंव्हा डायल-अप कनेक्शन्स असायचे. कधी कधी लागलीच जोडणी व्हायची नाहीतर बराच वेळ कनेक्टीव्हिटी मिळतच नव्हती. मग अशा परिस्थितीत कुठलं "गुगल" आणि काय ? त्यावेळी कॉलेज युवक-युवतींना लायब्ररी शिवाय पर्याय नसायचा, अभ्यासा विषयी काही हवं असल्यास हि मुलं लायब्ररी मध्ये जायची. (आज मुलं जात नाहीत अस मला अजिबात सुचवायचं नाही). आज काहीहि माहिती हवी असली कि ठरलेलं असतं “गुगल करा

तुमचा आवाज बनू शकतो तुमची लेखणी

इमेज
तुमचा आवाज बनू शकतो तुमची लेखणी आश्चर्य वाटलं असेल शीर्षक वाचून पण आता आय.टी. च्या जमान्यात तुम्हास वाचता येते का आणि स्पष्ट उच्चार आहेत का ? हे दोन प्रश्न महत्वाचे असणार आहेत. तसे पहिले तर  संगणक युजरला टाईप करण्याचे कौशल्य आत्मसात असणे आवश्यक आहे, त्याशिवाय तो संगणकाचा वापरच करू शकत नाही मग हे कौशल्य आत्मसात करण्यासाठी युजर टाईपिंग वर प्रभुत्व मिळवितो. एखादा लेखक जेंव्हा लेखन करतो तेंव्हा त्याची लेखणी त्यास मदत करते. मला वाटतं लेखकास महत्वाच्या असणाऱ्या गोष्टींमध्ये त्याचे विचार आणि ते कागदावर उतरविण्यासाठी आवश्यक असणारी त्याची लेखणी.. मग हि लेखणी नव्या जमान्यातील का असेना, कारण नव्या जमान्यात लेखणी ने देखील बरेच बदल स्वीकारले आहेत अस म्हणालो तर वावगं होणार नाही. हे बदल भौतिक असतील, त्याच्या स्वरूपात झालेले असतील वा तंत्रज्ञाना मुळे झालेले असतील. आता पहा ना, सुरुवातीला टाईप रायटर होते, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक टाईप रायटर आले मग संगणक कि-बोर्ड आला आणि जसा स्मार्ट फोन चा वापर वाढला तसा आपण सर्वजण स्मार्ट फोन चा कि-बोर्ड वापरू लागलो, आता हा कि-बोर्ड म्हणजे “लेखणीच” म्हणावी लागेल, नव्या जमा

गुगल होम – तुमचा वैयक्तिक सहाय्यक

इमेज
गुगल विविध सेवांसाठी सर्वश्रुत आहे ! इंटरनेट वर काहीहि काम असल कि युजर गुगल ला पहिली पसंती देतो. गुगलवर सर्च करायचं आणि पुढे जायचं अस साधारण इंटरनेट वापरणाऱ्याचे असत अस सर्वेक्षण सांगत. गुगल च्या विविध सेवांबद्दल मी या अगोदर लिहिले आहे पण आज तुम्हाला गुगल ने देवू केलेल्या नवीन सेवे बद्दल माहिती सांगणार आहे. गुगल नित्य नवीन नवकल्पना घेवून आपल्या भेटीला येते, मग त्या मध्ये विविध अॅप्लीकेश्न्स असतील अथवा गुगल सूट असेल वा इंटरनेट ऑफ थिंग्ज या तंत्रज्ञानावर आधारित गुगल ग्लास असेल, गुगल सदैव भविष्यातील तंत्रज्ञानासह आपल्याला आजच अचंभित करते हे खरे, अशीच एक नवीन संकल्पना घेवून गुगल यावेळी आल आहे, “गुगल होम” ला घेवून, गुगल होम हा तुमचा तुमच्या घरातील सहाय्यक असेल जो तुमच्यासाठी तुमच्या सांगण्यावर, तुमच्या आवाजाच्या आदेशानुसार गाणी लावेल, तुमची शॉपिंग लिस्ट तयार करेल, तुमच्या ऑफिस च्या प्रवासात वाहतुकीचा मार्ग मोकळा आहे कि वाहतुकीचा खोळंबा झालेला आहे या बद्दल तुम्ही विचारताच माहिती मिळेल. तुमची उद्याची कार्यालयातील नियोजित भेट किती वाजता आहे या बद्दल हि गुगल होम मदत करेल, आहे ना नवकल्पना

सर्व्हेक्षण करा गुगल फॉर्म्स सोबत

इंटरनेट मुळे जग बोटांवर स्थिरावत चालल आहे, हे तुम्हालाही जाणवत असावं. तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची अडचण आली कि नकळतपणे आपण गुगल कडे त्याच उत्तर शोधायला सुरु करतो, आता याची काही मंडळीना तर सवय झाली आहे. काही माहितीची गरज भासली कि आहेच, गुगुल !! अर्थात गुगुल ने देखील वापरकर्त्याच्या (तुमच्या, आमच्या) गरजेप्रमाणे सेवा पुरवायला सुरुवात केल्याने गुगल ची लोकप्रियता वाढली आहे आणि ती अशीच वाढत जाईल यात कोणताही किंतु मला वाटत नाही. गुगल ने “गुगल सूट” या नावाने त्यांच्या विविध सेवा पुरविल्या आहेत. मग त्यात ई-मेल, कॅलेंडर, गुगल मॅप, गुगल डॉक्युमेंट   असेल, व्हॉइस टायपिंग अथवा फॉर्म्स असेल सगळ्या सेवा एकाच नावाने अर्थातच “गुगल”. ४ सप्टेंबर १९९८ साली सुरुवात झालेल्या या कंपनीने लक्षणीय यश कमविले आहे. इंटरनेटचा वापर करीत असताना आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न हि कंपनी सदैव करीत आहे, हे विशेष !! व्यवसाय करीत असताना ज्या ऑनलाईन गरजा असतात त्या जवळपास सगळ्या गुगल पूर्ण करीत आहे असे म्हणाल्यास वावगे होणार नाही. मग तुम्ही वापरत असलेलें ई-मेल असो, एखादे डॉक्युमेंट असो अथवा एखादी स्प्