सर्व्हेक्षण करा गुगल फॉर्म्स सोबत
इंटरनेट मुळे जग बोटांवर स्थिरावत चालल आहे, हे तुम्हालाही जाणवत असावं.
तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची अडचण आली कि नकळतपणे आपण गुगल कडे त्याच उत्तर
शोधायला सुरु करतो, आता याची काही मंडळीना तर सवय झाली आहे. काही माहितीची गरज
भासली कि आहेच, गुगुल !! अर्थात गुगुल ने देखील वापरकर्त्याच्या (तुमच्या, आमच्या)
गरजेप्रमाणे सेवा पुरवायला सुरुवात केल्याने गुगल ची लोकप्रियता वाढली आहे आणि ती
अशीच वाढत जाईल यात कोणताही किंतु मला वाटत नाही. गुगल ने “गुगल सूट” या नावाने
त्यांच्या विविध सेवा पुरविल्या आहेत. मग त्यात ई-मेल, कॅलेंडर, गुगल मॅप, गुगल
डॉक्युमेंट असेल, व्हॉइस टायपिंग अथवा
फॉर्म्स असेल सगळ्या सेवा एकाच नावाने अर्थातच “गुगल”. ४ सप्टेंबर १९९८ साली
सुरुवात झालेल्या या कंपनीने लक्षणीय यश कमविले आहे. इंटरनेटचा वापर करीत असताना
आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न हि कंपनी सदैव करीत आहे, हे विशेष !!
व्यवसाय करीत असताना ज्या ऑनलाईन गरजा असतात त्या जवळपास सगळ्या गुगल पूर्ण
करीत आहे असे म्हणाल्यास वावगे होणार नाही. मग तुम्ही वापरत असलेलें ई-मेल असो,
एखादे डॉक्युमेंट असो अथवा एखादी स्प्रेडशीट व प्रेझेन्टेशन असो हे सर्व गुगल
पुरविते (ऑनलाईन), तुमच्या स्मार्ट फोनवर, डेस्कटॉपवर आणि लॅपटॉप वर देखील. डेटा
स्टोअर करणे हेतू तुम्ही विविध पर्याय निवडता जसे कि युएसबी ड्राइव्ह (पेन ड्राइव्ह),
सीडी, डीव्हीडी पण हे सर्व सोबत असणे जरुरीचे होते यावर पर्याय म्हणून गुगल ने
गुगल ड्राइव्ह हि सुविधा देवू केली आहे. यामध्ये तुम्हास हवी असणारी आवश्यक माहिती
स्टोअर करून ठेवता येईल आणि कुठूनही ती माहिती पाहता येवू शकेल आणि महत्वाच म्हणजे
एडीट (बदल) करता येवू शकतील.
अरविंद आणि प्रमोद एका कंपनीत सेल्स मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत, त्यांच्या
कंपनी चे विविध प्रॉडक्टस् मार्केट मध्ये विक्रीस उपलब्ध आहेत. त्यांच्या कंपनीने
बाजारात एक नवीन प्रॉडक्ट आणायचे ठरविले आहे. त्यासाठी साहेबांनी मिटिंग बोलीवली
आहे, या मिटिंग मध्ये साहेबांनी दोघांना प्रॉडक्ट सर्व्हे करावयास सांगितला आहे.
मिटिंग रूम मधून बाहेर येताच अरविंद म्हणाला, प्रमोद, “आता हा सर्व्हे करण्यास
आपल्याला मानवसंसाधनाची गरज भासेल आणि ती प्रथम उपलब्ध करून घेवूयात.” यावर प्रमोद
म्हणाला, “मानवसंसाधन ? कशाला हवयं?”, अरविंद म्हणाला, “अरे मग कसा करणार हा
सर्व्हे?” सर्व्हे करायला माणसं नकोत तर कुणाकडून सर्व्हे करणार ? प्रमोद ने
नुकताच एम.एस.सी.आय.टी. कोर्स केला आहे. त्याने कोर्स दरम्यान “अभ्यास कौशल्य” अंतगर्त
विविध कौशल्य आत्मसात केली आहेत. त्यापैकी एक स्कील म्हणजे एखाद्या विषयाबद्दल
मतप्रवाह जाणून घेणे हेतू, सर्व्हेक्षण करणे हेतू गुगल फॉर्म्स चा वापर करतात हे त्यास
चांगले माहिती आहे.
प्रमोद म्हणाला, “गुगल फॉर्म्स” आपल्याला मदत करेल. अरविंद म्हणाला, “कस काय?”
यावर प्रमोद म्हणाला सांगतो. गुगल फॉर्म्स आपल्याला वापरता येवू शकत जर आपल्याकडे
गुगल जी-मेल चा ई-मेल आय डी असेल तर, या ई-मेल ने गुगल फॉर्म्स वर लॉग इन करावे
आणि आपल्याला जसा हवा आहे तसा फॉर्म तयार करावा. या फॉर्म मध्ये आपल्याला जे
प्रश्न आपल्या सर्वेक्षणा साठी आवश्यक वाटतात ते आपण घेवू शकतो. फॉर्म्स मध्ये
एखादा फोटो हवा असल्यास तो देखील युजरला अपलोड करता येतो. त्यासाठी गुगल गुगल ड्राइव्ह
चा वापर करते. आपण यास जी-मेल च्या सहाय्याने मेल लॉग इन देखील देवू शकतो ज्यामुळे
आपल्याला हव्या असणाऱ्या व्यक्तींकडून सर्व्हेक्षण फॉर्म भरून घेता येवू शकेल. हे
सर्व ऐकताच अरविंद म्हणाला, “ठीक आहे बॉस !!” प्रमोद म्हणाला, “मित्रा, बॉस काय?”,
यावर अरविंद म्हणाला “अरे नव्या डिजिटल युगाची तुला बरीच माहिती आहे, मला नाही
माहिती एवढी !!” प्रमोद म्हणाला, “लागलीच एम.एस.सी.आय.टी. ला प्रवेश घे , आणि तू
हि डिजिटल सिटीझन हो.”
आपणही नजीकच्या अधिकृत एम.एस.सी.आय.टी. केंद्रास भेट द्या व विविध कौशल्या बद्द्ल
माहिती घ्या.
अमित
कामतकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा