गुगल होम – तुमचा वैयक्तिक सहाय्यक
गुगल
विविध सेवांसाठी सर्वश्रुत आहे ! इंटरनेट वर काहीहि काम असल कि युजर गुगल ला पहिली
पसंती देतो. गुगलवर सर्च करायचं आणि पुढे जायचं अस साधारण इंटरनेट वापरणाऱ्याचे
असत अस सर्वेक्षण सांगत. गुगल च्या विविध सेवांबद्दल मी या अगोदर लिहिले आहे पण आज
तुम्हाला गुगल ने देवू केलेल्या नवीन सेवे बद्दल माहिती सांगणार आहे. गुगल नित्य
नवीन नवकल्पना घेवून आपल्या भेटीला येते, मग त्या मध्ये विविध अॅप्लीकेश्न्स असतील
अथवा गुगल सूट असेल वा इंटरनेट ऑफ थिंग्ज या तंत्रज्ञानावर आधारित गुगल ग्लास
असेल, गुगल सदैव भविष्यातील तंत्रज्ञानासह आपल्याला आजच अचंभित करते हे खरे, अशीच
एक नवीन संकल्पना घेवून गुगल यावेळी आल आहे, “गुगल होम” ला घेवून, गुगल होम हा
तुमचा तुमच्या घरातील सहाय्यक असेल जो तुमच्यासाठी तुमच्या सांगण्यावर, तुमच्या
आवाजाच्या आदेशानुसार गाणी लावेल, तुमची शॉपिंग लिस्ट तयार करेल, तुमच्या ऑफिस
च्या प्रवासात वाहतुकीचा मार्ग मोकळा आहे कि वाहतुकीचा खोळंबा झालेला आहे या बद्दल
तुम्ही विचारताच माहिती मिळेल. तुमची उद्याची कार्यालयातील नियोजित भेट किती वाजता
आहे या बद्दल हि गुगल होम मदत करेल, आहे ना नवकल्पना !! यासाठी तुमच्या कडे हवे
गुगल होम आणि काही स्मार्ट उपकरण !!
हे उपकरण चालेल कसं? यासाठी
तुमच्याकडे लागेल वाय-फाय सेवा. हि सेवा तुमच्याकडे कोणत्याही इंटरनेट सर्विस
प्रोव्हायडर ची असली तरी चालेल. त्यासाठी कोणताही नियम नाही. या सोबतच लागेल एक
इलेक्ट्रिक सॉकेट, तुम्हाला जर घरातील लाईट आणि इतर वस्तू गुगल होम ने नियंत्रित
करायच्या असल्यास त्या सर्व वस्तू स्मार्ट असायला हव्यात. आता विविध कंपन्या अशा
वस्तू बाजारात उपलब्ध करून देत आहेत. ज्याचा वापर तुम्ही तुमच्या घरात करू शकता आणि
त्याची जोडणी तुमच्या गुगल होम शी करू शकता. गुगल होम चा वापर घरातील जास्तीत
जास्त सहा व्यक्ती करू शकतात. सहा जणांचे आवाज गुगल ओळखु शकतो. फक्त काळजी एवढीच
घ्यायची कि आपला आवाज व्यवस्थित रेकॉर्ड करायचा !!
हे उपकरण तुम्हाला खरेदी करावं लागेल
आणि मग त्याचा वापर करता येईल. सध्यातरी तुम्ही हे उपकरण मनोरंजन या एका हेतूने
वापरू शकता. याच प्रकारात अमेझ्ॉन वर अॅलेक्सा उपलब्ध आहे.
महत्वाचे : तुमचे आवाज रेकॉर्ड करताना उच्चारण उत्तम आणि योग्य हवं याची काळजी घ्यावी.
अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर
तळटीप : गुगल होम, अॅलेक्सा ही रजिस्टर नावं आहेत, एक उदाहरण म्हणून आणि माहिती देणे हेतु त्याचा वापर इथे केला आहे. स्वामित्व अधिकार गुगल आणि अमेझोन कडे राखीव.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा