आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके – गीतकार समीर
बहुत खुबसुरुत गजल लिख रहा हुं, तुम्हे देखकर आजकल लिख रहा हुं|| गीतकार समीर अनजान (शीतला पांडे) यांना आपण “समीर” म्हणून ओळखतो. गीतकार अनजान यांचे चिरंजीव, एवढीच ओळख घेवून चित्रपट सृष्टीत आलेले बँक अधिकारी समीर यांनी स्वत:ची अशी वेगळी ओळख तयार केली. किंबहुना ते त्यात यशस्वी झाले असे म्हणाल्यास आतिशयोक्ती होणार नाही. सर्वात जास्त गाणे लिहिण्याचे गिनीज बुक ऑफ वल्ड रेकॉर्ड्स समीर यांच्या नावे आहे. १७ फेब्रुवारी २०१६ रोजी त्यांना गौरविण्यात आले. सुरुवातीच्या काळात गाणी वडिलांकडून लिहून घेतली जातात असा आरोप त्यांच्यावर व्हायचा पण जेंव्हा संगीतकारा समोर बसून गाणी लिहली तेंव्हा सर्वाना पटलं कि “बॉलीवूड ला एक नवा गीतकार समीर” मिळाला. मनाला सोन्याची (सोना कितना सोना है) उपमा देणारा हा गीतकार म्हणजे अगदी सहज यमक जोडणारा जादुगार म्हणावा, १९८३ मध्ये गीतकार म्हणून नवी सुरुवात करणारे समीर यांनी लवकरच आशिकी या चित्रपटासाठी फिल्म-फेअर पुरस्कारावर स्वत:चे नाव कोरले. समीर यांनी त्यांचे वडील गीतकार अनजान ,मजरूह सुलतानपुरी आणि उस्ताद आनंद बक्षी यांना गुरु स्थानी मानले. तुम दिल कि धडकन में अस म्हणत समीर