व्हाटसअॅप प्रायव्हसी पॉलिसी – काय करावं ?
नवीन पॉलिसी ८ फेब्रुवारी पर्यन्त स्विकार करावी असं व्हाट्सएपच म्हणणं आहे, त्यामुळे खूप गोंधळ उडाला आहे असं दिसतं, या गोंधळात दुसऱ्या अॅप वर जायचं की व्हाट्सएपच वापरत राहायचं याचा निर्णय घेण्यास सोईचे जावे म्हणून हा लेख.
सरळ मुद्यालाच सुरुवात करूया....
इतर अॅप वर जशा जाहिराती दिसतात तशाच
जाहिराती आता व्हाट्सएप वर दिसतील, फेसबुक वर
फेसबुक फॉर बिझनेस मधून तुम्ही व्हाट्सएपला जोडले जाऊ शकता, फेसबुक
वरील जाहिरात जशी timeline (sponsored) वर दिसते तशीच ती आता
व्हाट्सएप वर दिसेल, (एक शक्यता) राहिला विषय पेमेंट आणि इतर
बाबी त्या या पूर्वीच आपण सगळ्यांनी शेअर केलेल्या आहेत.
ज्यांनी फेसबुक वर जाहिराती केल्या आहेत, जरा आठवून बघा तुमचा cvv कोड स्टोअर करू का? असा प्रश्न विचारला जातो (हे ठीक आहे की तुमच्या लॉग इन मध्येच ते असतं, फास्ट पेमेंट करणे हेतु फेसबुक हे स्टोअर ठेवतं असं कंपनीच म्हणणं आहे), काहींनी त्यास केंव्हाच होकार दिलेला आहे, मग आता का म्हणून आपण गडबड, गोंधळ करतो आहोत,
शेवटी राहिला प्रश्न तुमचा डेटा,
कुणी काय शेअर करावं हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे, जे एवढे दिवस आपण स्टेटस ठेवत होतो, लोकांना सांगत
होतो इ. इ. ही सगळी माहिती देतच होतो ना ? आणि सुरुवातीस व्हाटसअॅप
ने वापरण्याच्या अटी आणि शर्ती “अॅग्रि” वरच डोळे बंद ठेवून क्लिक केलेच होते ना? मग
आता का पॅनिक सिचुएशन होते आहे ?
आता सर्वात महत्वाचं – पॉलिसी अपडेट वाचला
आहे का ? नसेल तर एकवेळ अवश्य वाचावा.
काही प्रश्न पाहुयात :
१. व्हाटसअॅप
तुमचं डेटा फेसबुक सोबत शेअर करेल का ?
उत्तर : नाही. एंड टू
एंड एंक्रिप्शन असल्याने तसे होऊ शकतं नाही.
२. कोणत्या
प्रकारचा डेटा व्हाटसअॅप फेसबुक सोबत शेअर करेल ?
उत्तर:
डेटा शेअरिंग या पूर्वीच होत आहे, फक्त युरोपियन रिजन मधील लोक हे अस्वीकार्य करू शकतात.
व्हाटसअॅप खालील माहिती इतर कंपन्या सोबत शेअर करेल –
तुमचा
अकाऊंट रजिस्टर केलेला फोन नंबर, केलेल्या व्यवहाराची माहिती (व्हाटसअॅप पेमेंट्स ची
सुरुवात भारतात होत आहे), सेवा विषयक माहिती, मोबाईल डिव्हाईस माहिती, तुम्ही इतरांशी
कसे बोलता ? आणि तुमच्या डिव्हाईस चे हार्डवेअर लेवल काय आहे.
३. फेसबुक
सोबत डेटा सामायिकीकरणं कसे होईल ?
उत्तर:
हे धोरण फेसबुकसह डेटा सामायिक करण्याचे कारण देते: चांगली सुरक्षा सुनिश्चित करणे
आणि स्पॅमशी लढा देणे पासून वापरकर्त्याचे अनुभव सुधारणेपर्यंत,
जे आधीच्या धोरणात देखील होते.
४. व्हाटसअॅप
जाहिराती दाखवेल ?
उत्तर:
आता पर्यन्त तरी व्हाटसअॅप ने जाहिराती दाखवलेल्या नाहीत, पण युजर एक्सपिरीयन्स वाढविणे
हेतु फेसबुक च्या विविध कंपन्यांच्या ठिकाणी हे होऊ शकेल. तुमच्या मेसेजेस मध्ये जाहिराती
येणार नाहीत कारण एंड टू एंड एंक्रिप्शन सुविधा देण्यात आली आहे.
५. व्हाटसअॅप
तुमचे मेसेजेस स्टोअर करेल ?
उत्तर:
नाही. मेसेज डिलिव्हर झाला की तो व्हाटसअॅप सर्वर वरून डिलिट होईल. असे व्हाटसअॅप सांगतं.
६. तुम्ही
ही पॉलिसी स्वीकारावी का ?
उत्तर:
होय, कारण ही कोणत्याही सॉफ्टवेअर कंपन्यांच मानक आहे. अर्थात हे तुम्ही नाकारू शकता
आणि व्हाटसअॅप डिलिट देखील करू शकता.
संदर्भ: व्हाटसअॅप
प्रायव्हसी पॉलिसी आणि इंडियन एक्सप्रेस वरील लेख.
संकलन:
अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर
Clear all doubts thank you
उत्तर द्याहटवाThank you.
हटवा