गुरुपौर्णिमा
अज्ञान तिमिरान्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया । चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः ॥ ज्ञानरूपी किरणाने जे अज्ञानरूपी अंधकाराने आंधळे झालेल्यांचे डोळे उघडतात त्या गुरूंना नमस्कार | आज गुरुपौर्णिमा, गुरुप्रति आदर व्यक्त करण्याचा आणि आभार मानायचा दिवस , गुरुपौर्णिमेस एक आध्यात्मिक परंपरा आहे , गुरु - ज्यामुळे जीवनाकडे पाहण्याची दृष्टी मिळते , आई व वडील हे आपले प्रथम गुरु , ज्यांनी आपल्याला घडवलं , आपल्या पायावर ताठ मानेने उभं कसं रहावे हे शिकवलं. प्रत्येकाच्या आयुष्यात हे दोन्ही गुरु असतात. आई हि सदैव मुलांची लाडकी असते , काही झाल तरी मुलांना आई लागते , त्या माऊलीच हि सर्वस्व असतात तिची मुलं. आई चं मुलां शिवाय विश्वच नाही अस म्हणालो तरी वावगं होणार नाही , अर्थात मुलांसाठी सुद्धा आईच विश्व आहे. या गुरूचे मार्गदर्शन माझ्या नशिबाने मला आजही मिळते आहे आणि मिळत राहो हि ईश्वर चरणी प्रार्थना ! पण माझे बाबा आज या जगात नाहीत. ते फक्त आठवणींच्या रुपात माझ्या सोबत आहेत. बाबांनी कृतीतून बऱ्याच गोष्टी शिकविल्या , त्या जेंव्हा पाहिल्या तेंव्हा त्याचे महत्व समजून घेता आलं नाही पण आज जेंव्हा ते नाह