पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फॉलोअर

फेसबुकचे मेटावर्स – रिब्रॅंडिंग

इमेज
  मार्क झुकरबर्ग याने गुरुवारी फेसबुकचे नाव बदलण्याविषयी जाहिर माहिती दिली. ज्या प्रमाणे कंपनी विविध क्षेत्रात काम करीत आहे त्याप्रमाणे फेसबुक हे नाव पुरेसं नाही, अस त्यास वाटते, त्यानुसार इंटरनेटचा वाढता वापर आणि त्या अनुषंगाने वापरण्यात येणाऱ्या विविध सेवा कंपनी देऊ करते आहे तर मग त्यास साजेस असं नाव हवं, मार्क आता कंपनीचे नाव “मेटा” असे ठेवणार आहे, डिसेंबर महिन्यापासून व्यापार एम्. व्ही. आर. एस.   या नावाने सुरू होईल.           फेसबुकच्या माध्यमातून लोक आभासी एकत्रित येतात, मैत्री करतात, गप्पा आणखी भरूपूर काही करता येऊ शकतं पण हे सगळं ज्या प्लॅटफॉर्मवर होतं त्याचं नाव साजेस नाही असे मार्कला वाटल्याने त्याने कंपनीचे नाव बदलण्याचा निर्णय जाहिर केला, पण आता काय होईल तर याच आभासी प्लॅटफॉर्म वर लोक एकत्र तर येतीलच पण सोबत व्हर्च्युअल रिअॅलिटी, ऑगमेंटेड रिअॅलिटी ग्लासेस (संवर्धित वास्तविकता चश्मा), ऑनलाइन गेम्स याचा वापर शक्य होईल. मेटावर्स काय आहे?                         मेटावर्स हे संगणकावर तयार करण्यात आलेली आभासी जागा आहे जिथे लोक एकत्रित येतील आणि विविध हार्डवेअर [( oculus , h

रिअर व्हीव मिरर – व्हेरी रेअर

इमेज
  केंद्रीय मोटार वाहन कायदा, १९८८ मधील सेक्शन ५ आणि ७ प्रमाणे प्रत्येक दुचाकी वाहनास दोन रिअर व्हीव मिरर (साईड मिरर (आरसे)) आवश्यक आहेत. नसल्यास रुपये २०० इतका दंड घेण्याचा नियम हा कायदा सांगतो. फॅशनच्या नावाखाली हे आरसे काढून टाकले जातात आणि वाहन चालक स्वत:हून आपघातास आमंत्रण देतं आहेत. मनुष्यास दोन डोळे आणि दोन कान, पाहणे आणि ऐकणे यासाठी दिले आहेत, मला वाटतं काळजी हे कारण असाव त्यामागे कारण ऐकू न आल्यास किमान डोळ्यास जे दिसतं आहे त्याचा उपयोग व्हावा आणि अडचणी दूर व्हाव्यात असे त्या परमेश्वरास वाटलं असावं पण दुचाकी वाहन चालक मागील वाहनांचा कानोसा घेतात   आणि त्याप्रमाणे अचानक वळण घेण्याचे अनेक प्रकार तुम्हीही पाहिले, अनुभवले असतील. तज्ञ मंडळी म्हणतात नियमांची पायमल्ली होणं   अथवा जाणीवपूर्वक करणं यात मानवी वर्तनाचे स्वरूप तपासण्याची गरज वाटते, रस्ता सुरक्षा जागरूकता मोहीम शालेय स्तरापासून राबविली पाहिजे. दुचाकी वाहनास असणारे आरसे हे वाहन चालकाची रस्त्याची दृश्यमानता आणि वाहनचालकांचा निर्णयात सुधारणा करण्यास मदतगार ठरतात. आरशांचा योग्य कोन राखणं देखील आवश्यक असतं. लेनची शिस्त पाळण्यात

शतकातील महानायक – अमिताभ बच्चन

इमेज
  शतकातील महानायक – अमिताभ बच्चन शतकातील महानायक , शहेनशहा , अँग्री यंग मॅन अशी अनेक बिरूद श्री अमिताभ बच्चन यांना बॉलीवूड ने दिली. त्यांची लोकप्रियता एवढी आहे कि ते प्रत्येक भारतीयाच्या मनावर आजही (वय वर्ष ८४ ) राज्य करतात. एक अभिनेता म्हणून, एक माणूस म्हणून आणि एक कर्तृत्ववान मुलगा म्हणून त्यांच जीवन हे एक प्रेरणास्त्रोतच वाटत मला. २०१५ साली भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा समजला जाणारा पद्मविभूषण हा सर्वोच्च नागरी सन्मान त्यांना देण्यात आला. बॉलीवूड मधील त्यांच योगदान अमुल्य आहे. ७० च्या दशकात जेंव्हा राजेश खन्ना हे नाव प्रत्येकाच्या हृदयावर राज्य करीत होत , बॉलीवूड चा सुपरस्टार बिरूद ज्याने कमी काळात मिळवलं अशा काकाजींचा तो काळ , त्याकाळात अमितजी यांची एन्ट्री आणि ती सुद्धा अँग्री यंग मॅन !! आनंद (आनंद मरा नही आनंद मरते नही) आणि नमकहराम (किसने सोनू पे हात उठाया , कौन है जो अपनी माँ का दुध आजमाना चाहता है ?) या दोन चित्रपटात हि जोडी दिसली. यामध्ये अमित जी नी आनंद मध्ये अभिनयाची झलक दाखविली आणि नमकहराम मध्ये तर पूर्ण चित्रपटात फक्त अमितजी आणि अमितजी ! असं ऐकिवात आहे कि हृषीकेश मुखर्जी