शतकातील महानायक – अमिताभ बच्चन
शतकातील
महानायक – अमिताभ बच्चन
शतकातील महानायक, शहेनशहा, अँग्री यंग मॅन अशी अनेक बिरूद श्री अमिताभ बच्चन यांना बॉलीवूड ने दिली. त्यांची लोकप्रियता एवढी आहे कि ते प्रत्येक भारतीयाच्या मनावर आजही (वय वर्ष ८४ ) राज्य करतात.
एक अभिनेता म्हणून, एक माणूस म्हणून आणि एक कर्तृत्ववान मुलगा म्हणून त्यांच जीवन हे एक प्रेरणास्त्रोतच वाटत मला. २०१५ साली भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा समजला जाणारा पद्मविभूषण हा सर्वोच्च नागरी सन्मान त्यांना देण्यात आला. बॉलीवूड मधील त्यांच योगदान अमुल्य आहे. ७० च्या दशकात जेंव्हा राजेश खन्ना हे नाव प्रत्येकाच्या हृदयावर राज्य करीत होत, बॉलीवूड चा सुपरस्टार बिरूद ज्याने कमी काळात मिळवलं अशा काकाजींचा तो काळ, त्याकाळात अमितजी यांची एन्ट्री आणि ती सुद्धा अँग्री यंग मॅन !! आनंद (आनंद मरा नही आनंद मरते नही) आणि नमकहराम (किसने सोनू पे हात उठाया, कौन है जो अपनी माँ का दुध आजमाना चाहता है ?) या दोन चित्रपटात हि जोडी दिसली. यामध्ये अमित जी नी आनंद मध्ये अभिनयाची झलक दाखविली आणि नमकहराम मध्ये तर पूर्ण चित्रपटात फक्त अमितजी आणि अमितजी ! असं ऐकिवात आहे कि हृषीकेश मुखर्जींना अमितजीं च्या काही सीनवर कात्री लावण्याची विनंती केली गेली होती. हे सर्वश्रुत आहे कि सात हिंदुस्थानी मध्ये एका हिंदुस्थानीच्या भूमिकेत अमितजी दिसले आणि तिथून पुढे इतिहास रचला गेला. तत्पूर्वी १९६९ अमितजींना मृणाल सेन यांनी त्यांच्या “भुवन शोम” या चित्रपटात कथावाचक म्हणून संधी दिली. ९० मिनिटांचा तो चित्रपट ज्यामध्ये उत्पल दत्त यांची मुख्य भूमिका होती. १९७१ साली “जंजीर” प्रदर्शित झाला आणि हिंदी चित्रपट सृष्टीत एक नव्या
अँग्री यंग मॅनचा जन्म झाला. अमितजी नी साकारलेला पोलीस अधिकारी हि भूमिका
त्याकाळच्या इतर सुपरस्टारना देवू करण्याचा विचार चित्रपटाचे निर्माता आणि
दिग्दर्शक प्रकाश मेहरा (नंतर प्रकाश मेहरा यांनी अमितजी बरोबर एकापेक्षा एक सरस
चित्रपटांची निर्मिती केली) करीत होते. ज्यामध्ये देव आनंद यांच नाव अग्रणी होतं
पण देव आनंद यांनी हा चित्रपट नाकारला त्यानंतर सलीम-जावेद जे चित्रपटाचे लेखक
होते त्यांनी प्रकाश मेहरा यांना अमितजीं च नाव सुचवले अमितजी नी तात्काळ होकार
दर्शविला आणि तयार झाला “जंजीर”, “ये पुलिस स्टेशन है,
तुम्हारे बाप का घर नही”, चित्रपटाचे पोस्टर्स
जेंव्हा चित्रपट गृहात लागले तेंव्हा लीड पोस्टर हे अभिनेता “प्राण” यांच होत,
कारण “प्राण” त्याकाळच मोठं नाव, लोक देखील
यांच्या साठी चित्रपट गृहात जायची पण जेंव्हा चित्रपट गृहातून बाहेर पडायची
तेंव्हा
एकच नाव प्रत्येकाच्या ओठावर असायचं अर्थातच “अमित जी” यांचच. त्याच काळात
अभिनेता प्रेम धवन अभिनित “प्यार कि कहानी” या चित्रपटात अमित जी नी काम केले
होते. जंजीर प्रदर्शित व्हायच्या अगोदर हा चित्रपट प्रदर्शित झाला त्यामध्ये प्रेम
धवन यांचे पोस्टरवर मोठे चित्र होते आणि जंजीर नंतर जेव्हा पुन्हा प्यार कि कहानी
प्रदर्शित झाला तेंव्हा पोस्टर मध्ये बदल करण्यात आला होता, हेच
एक द्योतक होतं “महानायकाचा जन्म झाल्याचं”. या नंतर दिवार, शोले,
डॉन, आहा !! सगळे अप्रतिम अभिनयाने नटलेले.
शोले मधील “जय” ची क्रेझ आजही आहे, आजच्या युवा
पिढीला देखील तो भुरळ घालतो. शत्रुघ्न सिन्हा यांना “जय” च्या भूमिकेसाठी विचारलं
होत पण तिथे अमितजी परफेक्ट होते आणि नियतीला हि तसचं मान्य असावं, आजही “तुम्हारा नाम क्या है बसंती?”, “घडी घडी
ड्रामा करता है”, मित्राचं स्थळ घेवून गेलेला जय, “अपनी कहानी सुनाएगा ना बच्चो को, भूल तो नही जाएगा ?” सगळं एकमेवाद्वितीय ! लहान पणा पासून अमितजी
ची क्रेझ, आवडता अभिनेता (घरात सगळ्यांचाच), अनेक चित्रपटांची आवर्तनं केली आहेत, चित्रपट संवादा
सह तोंडपाठ पण तरी देखील अमिताभ नावाचं गारुड काही कमी होत नाही. डॉन हा हि एक
असाच चित्रपट, “मुझे इसके जुते अच्छे नही लगे”, तेंव्हा डोळ्यात दिसणारी जरब, “डॉन पान नही खाता?”
अस निरागस पणे विचारणारा “विजय” हि तेवढाच भावतो आणि लक्षात राहतो.
“तुम्हारी अंटी बहोत सारे अंकल को लेके नीचे तुम्हारा इंतजार कर रही है”, “डॉन को पकडना मुश्कील हि नही नामुमकीन है” या मध्ये लाजवाब मुद्रा अभिनय
अमितजीं नी केला आहे. शांत, संयमी,चलाख
डॉन च्या भूमिकेत अमितजीच चपखल बसू शकतात दुसरा कुणीही नाही. माझ्या या मताशी
तुम्हीही सहमत असाल. “दिवार”-
“अनदर फिदर इन कॅप” असच म्हणावं लागेल ,
“जाओ पहले उस आदमी का साईन लेके आओ” , “और मै
तुम्हारे यहाँ इंतजार कर रहा हु”,
चित्रपट कारकीर्द सदैव सगळे हिट चित्रपट देते असे नाही, एक बॅड पॅच येतो आणि करिअर ला ग्रहण लावतो, तसच काहीस अमित जी सोबत हि झाल.त्याच दरम्यान त्यांनी ए.बी.सी.एल. (ABCL) या कंपनीची सुरुवात केली आणि १९९६ साली तेरे मेरे सपने हा चित्रपट प्रदर्शित केला. चित्रपटाने चांगला व्यवसाय केला पण काही कारणांनी कंपनी बंद करावी लागली. यात अमितजीं ना नुकसान सोसावे लागले, पण फिनिक्स भरारी म्हणतात ना त्याप्रमाणे २००० साली अमितजी नी छोट्या पडद्याला आपलसं केलं आणि सुरु झाला कौन बनेगा करोडपती नावाचा नवीन अध्याय ! या शो ने अनेक विक्रम मोडीत काढीत नवीनच विक्रम प्रस्थापित केला जी आजही छोट्या पडद्यावर दिमाखात सुरु आहे. अमित जी चा जीवन प्रवास पाहिला तर वाटत कि प्रामाणिक प्रयत्न करीत राहिल्यास यश नक्की मिळतं, म्हणूनच अमित जी एक प्रेरणास्त्रोत आहेत. वयाच्या ७९ व्या वर्षी देखील त्यांचा उत्साह तरुण पिढीला लाजवणारा आहे. व्यक्त होण्याचं कसब, शब्द संचय, संवाद कौशल्य, कृती तून व्यक्त होणारी नम्रता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आई-वडिलांवर असणारी श्रद्धा, परिवारावर असणारे त्यांचे प्रेम या सर्व बाबी शिकण्यासारख्या आहेत. सामाजिक जबाबदारीचं भान ठेवून स्वच्छ भारत अभियानात त्यांचा सहभाग देखील अनेक स्वयंसेवकाना प्रेरणा देणारा आहे. अमितजी वर लिहीण्यासारखं खूप आहे, माझ्या सारख्या त्यांच्या निसिम्म चाहत्यांनी लिहिलं देखील आहे, पण आज त्यांचा वाढदिवस म्हणून हा लेख प्रपंच करण्याचा प्रयत्न मी केला आहे. खर तर शुभेच्छा या वैयक्तिक भेटून देण्यात एक वेगळाच आनंद असतो पण तो योग कधी आहे माहिती नाही म्हणून याच लेखात शुभेच्छा व्यक्त करतोय.
अमितजी तुम्हाला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा !!
अमित बाळकृष्ण
कामतकर
सोलापूर
Nicely written Sir!
उत्तर द्याहटवासुंदर अति सुंदर।
उत्तर द्याहटवाbadhiya 👌👌
उत्तर द्याहटवा👌
उत्तर द्याहटवा