फॉलोअर

फेसबुकचे मेटावर्स – रिब्रॅंडिंग

 

मार्क झुकरबर्ग याने गुरुवारी फेसबुकचे नाव बदलण्याविषयी जाहिर माहिती दिली. ज्या प्रमाणे कंपनी विविध क्षेत्रात काम करीत आहे त्याप्रमाणे फेसबुक हे नाव पुरेसं नाही, अस त्यास वाटते, त्यानुसार इंटरनेटचा वाढता वापर आणि त्या अनुषंगाने वापरण्यात येणाऱ्या विविध सेवा कंपनी देऊ करते आहे तर मग त्यास साजेस असं नाव हवं, मार्क आता कंपनीचे नाव “मेटा” असे ठेवणार आहे, डिसेंबर महिन्यापासून व्यापार एम्. व्ही. आर. एस.  या नावाने सुरू होईल.

          फेसबुकच्या माध्यमातून लोक आभासी एकत्रित येतात, मैत्री करतात, गप्पा आणखी भरूपूर काही करता येऊ शकतं पण हे सगळं ज्या प्लॅटफॉर्मवर होतं त्याचं नाव साजेस नाही असे मार्कला वाटल्याने त्याने कंपनीचे नाव बदलण्याचा निर्णय जाहिर केला, पण आता काय होईल तर याच आभासी प्लॅटफॉर्म वर लोक एकत्र तर येतीलच पण सोबत व्हर्च्युअल रिअॅलिटी, ऑगमेंटेड रिअॅलिटी ग्लासेस (संवर्धित वास्तविकता चश्मा), ऑनलाइन गेम्स याचा वापर शक्य होईल.

मेटावर्स काय आहे?        

          मेटावर्स हे संगणकावर तयार करण्यात आलेली आभासी जागा आहे जिथे लोक एकत्रित येतील आणि विविध हार्डवेअर [(oculus, horizon worlds, क्वेस्ट - virtual reality digital entertainment headsets), जे आता बिटा व्हर्जन मध्ये आहेत त्याचा वापर सुरू करू शकतील. ऑगमेंटेड रिअॅलिटीचा वापर करून तुमच्या फोटोजना अधिक आकर्षक करता येणार आहे. स्पार्क ए.आर. सारखे टुल युजर्सना देण्यात येणार आहे ज्यामुळे युजर्स याचा वापर व्यक्त होण्यास करू शकतील सोबतच क्रिएटर्स नव्या क्षितिजांचा शोध घेतील आणि नवे नवे इफेक्टस देऊ करू शकतील जे इनस्टाग्राम वरील लाखो युजर्स वापर करतील. 

          स्मार्ट ग्लासेस: जे एका टच वर ऑडिओ व व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास मदत करतील, यामध्ये कंपनी फर्स्ट जनरेशन मध्ये रे-बॅन स्टोरीज याचा वापर करेल.

२००४ मध्ये फेसबुकची सुरुवात त्यानंतर २०१२ मध्ये इनस्टाग्राम, २०१३ च्या अखेरीस WhatsApp, मधील काळात वर नमूद केलेले oculus, फेसबुक वर्कप्लेस (२०१६च्या अखेरीस) , इंटरनॅशनल पेमेंट साठी Novi (२०२०) आणि त्यानंतर WhatsApp च्या मध्यमातून पेमेंट सुविधा आणि २८ ऑक्टोबर २०२१ मेटा !! या प्रवासात तंत्रज्ञान ज्याप्रकारे बदलत गेलं त्याप्रमाणे कंपनीने त्यांच्या वर्किंग कल्चर मध्ये बदल केले आहेत ही गोष्ट शिकण्यासारखी आहे. जिथे शक्य आहे तिथे गुंतवणूक करून ते तंत्रज्ञान स्वमालकीचे करून प्रवास सुरू ठेवणे आणि त्यात कल्पनांचा नवोन्मेष करणे हे महत्वाचे !!!     

एकूण काय तर एक फार मोठा महत्वकांक्षी प्रकल्प मार्कने सुरू केला आहे जो आजच्या युगाच्या गरजा जाणतो आणि त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहण्यास त्यास आणि त्याच्या कंपनीस प्रवृत्त करतो आहे. खूप काही प्रेरणादायी, आनंददायी आणि कुतुहलाने भरलेल्या जगात घेऊन जाण्यास मार्कची टीम कार्यरत आहे ज्यास मेटा- मेटावर्स असे संबोधण्यात आले आहे. त्याचे बोधचिन्ह देखील “इन्फीनिटी” असे दाखविण्यात आले आहे याचा अर्थ अमर्याद संधी, मी म्हणेन दोन्ही बाजूस या उपलब्ध होणार आहेत, युजर आणि क्रिएटर दोघांनाही !!!   

 

वेलकम टू मेटावर्स !!!

 

अमित बाळकृष्ण कामतकर

सोलापूर

Amit Kamatkar- YouTube

इतर विषयांवरील लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करावं

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ChatGPT कृत्रिम बुद्धिमत्तेचा अविष्कार- तारक की मारक ?

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?