छावा
![इमेज](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhiMSox90IZ4URA-CaHVB7JfQA_OrPF-DvX2cRc0Mr38QJmucLW-6UHlL2dGMwrEKyV88P-iqRjmP2p96xLeevd0mxyrHhgr6nzJJsx1rckvsQB3XJDR5w4aAsdiZTkM2eBUjzz0Qhb4FymvapT51a_NWcpQ7Mqus0teSfH_MgyAP1Bw18Z33mkaWtvmi6o/w300-h400/Chhaava_film_poster.jpg.jpg)
आईचं प्रेम हे महत्वाचं असतच, ज्यास ते मिळतं नाही त्यास त्याची किंमत जास्त समजते, असचं असतं. बालपणात तर सर्वात जास्त जवळचं कुणी असेल ज्यास आपण प्रथम ओळखतो ती आईचं असते. आणि अशा वयात काळाने जर कुणाची आई हिरावून नेली तर, हा विचार देखील करवत नाही. ज्यांना ह्या दू:खातून जावं लागलं ती मंडळी नेहमी आईच्या प्रेमासाठी व्याकूळ राहिलेली दिसतात. जीवनात घडणाऱ्या छोट्या – मोठ्या प्रसंगात आईची उणीव जाणवत राहते. अगदी हेच आपल्याला लक्ष्मण उतेकर यांच्या “छावा” मध्ये पहायला मिळेल. जन्मापासूनच ज्याच्या वाट्याला सोस आला असा हा सिंहाचा छावा आयुष्यात प्रत्येक आघाडीवर झुंझत राहिला, पण त्याने कधीही हार मानली नाही. खरं तर तीन तासांच्या चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांना जाणून घेणं केवळ अशक्य पण उतेकर यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला आहे. स्व. शिवाजी सावंत यांनी ८८६ पृष्ठ संख्या असलेल्या कादंबरीतून छत्रपती संभाजी महाराज मांडण्याचा , समजावून सांगण्याचा, रणधुरंधराची कथा आजही इतिहासाची साक्ष देते आहे. अवघं बत्तीस वर्षाचं आयुष्य लाभलेला राजा पण एकाचवेळी अनेक आघाड्यांवर लढाई करणारा लढवय्या सेनानी म्हणून ज्य...