“छावा” च्या निमित्ताने .....
इतिहासातील विविध विषय
समजून घेणे , अधिक माहिती घेण्याचा, मिळविण्याचा प्रयत्न करणे ही आवडच, याच
आवडीतून इतिहास समजून घेऊन त्याची माहिती इतरांना देणे, हा पण एक छंदच. नुकताच
“छावा” चित्रपट प्रदर्शित झाला, आणि जी त्रोटक माहिती छत्रपती संभाजी महाराज
यांच्या विषयी वाचली होती, ती अधिक समजून घेण्या विषयी प्रयत्न करण्यास सुरुवात
केली. मग कादंबरी वाचन असेल, अथवा ऑनलाइन संकलन असेल. ऑनलाइन
! म्हंटल की भुवया उंचावल्या जाऊ शकतात, कारण तेथील उपलब्ध माहितीच्या
सत्यतेवर शंका घेतली जाऊ शकते. विकिपीडिया
सारखे माध्यम ज्यात कुणीही बदल करू शकतं. ते किती सत्य
माहिती देऊ करतं हा अभ्यासाचा विषय, म्हणून स्पष्ट पणे नमूद केलं
की सत्यतेवर सिद्ध होऊ शकेल अशीच माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यात थोड्याफार
प्रमाणात यशस्वी झालो खरा पण अद्याप “ज्ञानाची (छत्रपती संभाजी महाराज समजून घेण्याची ) भूक” काही शमली नाही.
“संभाजी” या कादंबरीचे लेखक विश्वास पाटील यांची एक नवी विडिओ बाइट पाहिली त्यात
इतिहासातील कोणत्या लेखनाची विश्वासार्हता अधिक या विषयी माहिती दिली आहे. शुद्ध
ऐतिहासिक लेखन महत्वाचं. कुणा विषयीही अभिनिवेश न करता केलेलं लिखाण महत्वाचं.
शुद्ध ऐतिहासिक म्हणजे काय तर , पूर्व कालीन घटीतांच्या विश्वसनीय आणि प्रमाणभूत
अशा साधनांच्या आधारे लिहिलेला इतिहास.
“महाराष्ट्राला इतिहास आहे, बाकी राज्यांना भूगोल आहे”, असे आचार्य अत्रे म्हणाले होते (याचा संदर्भ काय? त्याविषयी नाही लिहीत पण हे वाक्य मला महत्वाचं वाटलं म्हणून येथे दिलं आहे) ते तंतोतंत खरं आहे. हा इतिहास , खरा इतिहास प्रत्येकाला समजणं, माहिती करून घेणं खरं तर आद्य कर्तव्य वाटतं मला. हा इतिहास शाळेतून शिकवला गेला पाहिजे. स्वराज्याचे दुसरे छत्रपती कसे होते यावर भरपूर संशोधन झालं आहे त्याचे अभ्यासक्रमात रूपांतर करून विद्यार्थ्यां पर्यन्त पोहोचणे अनिवार्य वाटतं मला.
त्यांना फक्त जाती-पातीत अडकविणे थांबवाव. प्रजेप्रती दक्ष असणाऱ्या राजास कुण्या एका जातीचा म्हणणं चुकीचं होईल. आर्थिक धोरण, प्रजादक्षता, वतनवृत्ती , न्याय व कायदा, सैनिकी व्यवस्था या साऱ्यात निपुण छत्रपतींचा समृद्ध वारसा सर्वाना समजायला हवा. छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळात परदेशात (१६८१ च्या ऑक्टोबर मध्ये मलाक्का- सध्याच्या मलायाच्या(मलेशिया) संघ राज्यात) व्यापार वाहतूक चालत असे. हे किती वैशिष्ट्यपूर्ण आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या कारकीर्दीतील विशेष दोन घटना (इतरही घटना आहेत पण खास करून) नमूद कराव्या वाटतात, शत्रू चालून आला हे समजताच “बेभान”, होऊन त्याच्यावर क्षत्रिय बाण्याने छत्रपती संभाजी महाराज चालून गेले असे इतिहासात दिसते. चालून येणाऱ्या शत्रूवर बेभान होऊन तुटून पडणे हा संभाजी महाराजांच्या लष्करी व्यक्तिमत्वाचा स्थायी भाव होता की काय माहिती नाही. पण गोवा मोहिमेत जुवे बेटावर पोर्तुगीज व्हाईसरॉयचा पाठलाग करीत भरती आलेल्या खाडीत दौडता घोडा घातला होता आणि त्यास पळवून लावले होते. त्यावेळी खंडो बल्लाळ राजें सोबत होते. दुसरी घटना साधारण जुलै १६८२ मध्ये औरंग ने स्वराज्याच्या सर्व सीमातून त्याच्या फौजा आत घुसवल्या व प्रखर हल्ले चढविले, पण संभाजी महाराजांनी तितकाच प्रखर प्रतिकार करून सर्व हल्ले परतून लावले.
शुद्ध ऐतिहासिक लेखनातून
इतिहास समजून घ्या आणि शक्य असल्यास इतरां पर्यन्त पोहोचवा, कारण सत्यमेव जयते !
अमित बाळकृष्ण कामतकर
ब्लॉगर, लेखक,सल्लागार, व्याख्याता, सॉफ्ट स्किल ट्रेनर
सोलापूर
संदर्भ: शिवपुत्र संभाजी
– डॉ. सौ. कमल गोखले, छत्रपती संभाजी एक चिकित्सा- डॉ जयसिंगराव पवार.
इमेज सोर्स: गुगल
छावा निमित्ताने इतिहास मनामनात ढवळून निघालाय. ह्याबाबत सातत्याने वाचन, श्रवण, वारंवार गप्पा, सामूहिक सादरीकरण ह्यांच्या माध्यमातून ह्याचे संक्रमन सुरु राहिले तर येणारी पिढी इतिहास माहिती होऊन इतिहासच निर्माण करणारी होइल.
उत्तर द्याहटवाHo khare ahe itihasat dusare chatrapati mhanun sambhaji raje abhyaskramat asayla havet
उत्तर द्याहटवा