पोस्ट्स

सप्टेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फॉलोअर

आपलं फक्त लक्ष नसतं...

इमेज
  “यु लर्न समथिंग एव्रीडे ईफ यू पे अटेन्शन”, खूप छान कोट आहे, कुण्या थोर विचारवंताचे विचार असावेत. वाचनात आले , मला आवडले. तसे पाहिले तर , खरे ही आहेत हे विचार, तुम्ही लक्ष दिलं तर नक्कीच तुम्ही काही ना काही शिकताच. नियमच म्हणा फार तर यास. नियमच का? तर नियम हे फार कुणास आवडत नाही, ते कायम नकोशेच वाटतात. म्हणून “नियम”, म्हणतात ना, आपलं फक्त लक्ष नसतं !.  ह्या धाव-पळीच्या जगात कुणास वेळ आहे ओ ! लक्ष द्यायला ? जो तो फक्त पळतो आहे. कुठे? कोणालाच माहिती नाही. मोठ्या शहरात साधारण हे पहायला मिळतं असा माझा गैरसमज होता पण तसे काहीच नाही. आमच्या शहरात देखील हे पाहायला मिळालं. त्यामुळे फारच आश्चर्य वाटू लागलं. तसं पाहिला तर सोलापुरात कुणासही विचारा , काय म्हणता ? कसे आहात? समोरून उत्तर ठरलेलं “काही नाही निवांत”. मग एवढी निवांत असणाऱ्या मंडळीना लक्ष देण्यास काय हरकत आहे? पण तसे होत नाहीच. ही सारी मंडळी देखील बहुधा नाकासमोर चालत असावीत. तसे पाहिलं तर विषय खूप साधा-सरळ आहे, आपल्या अवती भवती घडणाऱ्या गोष्टी कडे थोडसं लक्ष द्यायचं. म्हणजे नक्की काय करायचं ?असा प्रश्न देखील काही मंडळीना नक्की...