प्रगल्भतेचे वरदान- समाधानाची लेखणी
“यु लर्न समथिंग एव्रीडे
ईफ यू पे अटेन्शन”, खूप छान कोट आहे, कुण्या थोर विचारवंताचे विचार असावेत. वाचनात
आले , मला आवडले. तसे पाहिले तर, खरे ही आहेत हे
विचार, तुम्ही लक्ष दिलं तर नक्कीच तुम्ही काही ना काही शिकताच. नियमच म्हणा फार
तर यास. नियमच का? तर नियम हे फार कुणास आवडत नाही, ते कायम नकोशेच वाटतात. म्हणून
“नियम”, म्हणतात ना, आपलं फक्त लक्ष नसतं !.
ह्या धाव-पळीच्या जगात कुणास वेळ आहे ओ ! लक्ष द्यायला ? जो तो फक्त पळतो
आहे. कुठे? कोणालाच माहिती नाही. मोठ्या शहरात साधारण हे पहायला मिळतं असा माझा
गैरसमज होता पण तसे काहीच नाही. आमच्या शहरात देखील हे पाहायला मिळालं. त्यामुळे
फारच आश्चर्य वाटू लागलं. तसं पाहिला तर सोलापुरात कुणासही विचारा , काय म्हणता ?
कसे आहात? समोरून उत्तर ठरलेलं “काही नाही निवांत”. मग एवढी निवांत असणाऱ्या
मंडळीना लक्ष देण्यास काय हरकत आहे? पण तसे होत नाहीच. ही सारी मंडळी देखील बहुधा
नाकासमोर चालत असावीत. तसे पाहिलं तर विषय खूप साधा-सरळ आहे, आपल्या अवती भवती
घडणाऱ्या गोष्टी कडे थोडसं लक्ष द्यायचं. म्हणजे नक्की काय करायचं ?असा प्रश्न
देखील काही मंडळीना नक्की पडेल.
माझ्या इंस्टीट्यूट
मध्ये विविध जाहिराती / माहिती फलक आम्ही लावतो, काळानुरूप ते बदलतो देखील, कधी विद्यार्थ्याने
तयार केलेलं डिझाईन ती जागा घेतं तर कधी ड्राफ्ट केलेलं एखादं सिविल ड्रॉइंग उद्देश
एकच, इंस्टीट्यूट मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यानी ते पहाव , माहिती घ्यावी एवढीच
इच्छा असते. पण अवघ्या दोन अथवा तीन महिन्याच्या कालावधीत ही मंडळी त्या जाहिराती/
माहिती कडे डुंकून सुद्धा पहात नाहीत. कधी
कधी मला आठवण करावी लागते की तुम्ही हे पाहिलं का? असे का होत असावं? याचं ठोस
उत्तर माझ्याकडे नाही पण फारसं महत्व दिलं जात नाही हेच खर असावं ! त्याने मला काय
फायदा होणार आहे? असा साधा सोप्पा प्रश्न या साऱ्या मंडळींना पडत असावा. याचे काही
उत्तर तुमच्याकडे असेल तर नक्कीच कमेन्टावं आपण ! सध्या एक जाहिराती ने ही डिस्प्लेची
जागा घेतली आहे, या बाबतीत देखील तसाच अनुभव येतो आहे. कोणालाच याच सोयर-सूतक नाही
!!
बरं असे लक्ष देऊन जर पाहिलं
तर फायदा नक्कीच होईल, याची खात्री तर आहेच पण ही खात्री या साऱ्या मंडळीना कशी द्यावी?
ज्या जागेत असे डिस्प्ले केले जातात त्या जागेस जाणीवपूर्वक खास याच कारणांसाठी राखीव
जागा म्हणून घोषित केल्याप्रमाणे तिथेच असे नवे नवे फलक/ प्रिंट्स लावले जातात मग वेगळे
असे काय प्रयत्न करावेत म्हणजे ह्या मंडळींचे लक्ष जाईल? असा प्रश्न मला पडतो.
हा लेख आपण वाचत असाल तर
प्रथम आपले धन्यवाद ! कारण माझी कैफियत कुणीतरी वाचतं आहे या सारखं दुसरं समाधान नाही
ओ ! तुम्ही ऐकलं असाव एखाद्या कार्यक्रमास श्रोते गोळा करणं अवघड तसेच आजच्या या डिजिटल
युगात "वाचक" मिळणंही दुर्मिळ होत चाललं आहे. असो, जर माझ्या या प्रश्नावर आपल्याकडे
उत्तर असेल तर नक्कीच कमेन्ट करावं.
अमित बाळकृष्ण कामतकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा