फॉलोअर

आज वाचा

मनातलं

 


          एखादा विषय विचारात रुंजी घालू लागला की जो पर्यन्त तो कागदावर उतरवित नाही तो पर्यन्त चैन पडत नाही. कधी कधी अगदी नवा विषय , नवं तंत्रज्ञान, नवी कल्पना डोक्यात येते तर कधी चालू घडा मोडींवर भाष्य करावं , आपल्याकडील ज्ञान शेअर असा विचार येतो. अशा वेळी पूर्वी अगदी वही पेन घेऊन ते सारे विचार समर्पक , योग्य, सोप्या भाषेत मांडले की आनंद मिळायचा, तोच आनंद आता संगणकावर हे सारं सेव्ह केलं की मिळतो ही गोष्ट स्वाभाविक आहे. इतरां प्रमाणेच सुरुवात फक्त स्वत:च्या आनंदासाठी लिहिणे येथूनच झाली पण जस जसे नवे तंत्रज्ञान शिकू लागलो तस तसे याचे ज्ञान सर्व सामान्यां पर्यन्त पोहोचू शकेल का ? तेही मराठीत त्यांना समजेल अशा भाषेत यावर विचार केला आणि तसे लिहिण्यास सुरुवात केली.

कधी एखाद्या तंत्रज्ञानाच्या माहिती साठी विशेष मागणी यायची तर कधी मीच नव्या तंत्रज्ञानाच्या सागरातून निवडक मोती शोधायचो आणि त्याची विशेषत: विषद करायचो. संगणकावर युनिकोड सुरू झाल्यानंतर स्वत:चा ब्लॉग असावा असे विचार येऊ लागले, तसे पाहिले तर युनिकोड मध्ये भारताचा सहभाग हा २००० साली झाला, पण त्याचा प्रसार होई पर्यन्त २००५ उजाडले. तेंव्हा काही प्रमाणातच लेख मराठीत असायचे, यात क्रांती म्हणाल तर फोनेटिक टायपिंग ! ज्यामुळे टायपिंग खूप सहज शक्य होऊ लागलं आणि मराठी संगणकावर बारसं धरू लागली. या दरम्यान इतर मराठी की-बोर्ड लेआउट च्या माध्यमातून संगणकावर लेखन सुरू ठेवलं पण सर्व सामान्यांपर्यन्त युनिकोडचा वापर करून लेख पोहोचविण्यासाठी मला २०१३ साल उजाडले. या सालात स्वत:चा ब्लॉग सुरू झाला, जिथे सारं माझ्या विचारांच, असं होतं. कुणाच्या परवानगीची आवश्यकता नाही, अशी ऑनलाइन जागा !  लेख ब्लॉगवर प्रकाशित करणे, सहज साध्य झालं पण वाचक मिळविणे खूप कठीण ! सध्याच्या जमान्यात तर खूपच कठीण ! आजही तो एक चॅलेंज आहे. आज घडीला माझ्या ब्लॉगवर १७० पेक्षा जास्त वाचनीय लेख आहेत आणि  वाचक संख्या ४५००० एवढी आहे.

    लेख लिहिणं जोमाने सुरू होतं, असे अनेक दिवस गेले माझ्याकडील पोतडीत एका-पेक्षा एक विषय असणारे लेख जमा झालेले, या लेखांचे पुस्तक करावे असे मित्र-परिवातून डिमांड , सजेशन येऊ लागलं आणि मग एके दिवशी प्रथम पुस्तक प्रकाशन करण्याचे ठरलं. विषय खूपच रोमांचकारी होता, माहिती तंत्रज्ञान – मराठीतून , नवं कोरं तंत्रज्ञान ज्या विषयी ऑनलाइन स्वरूपात माहिती इंग्लिश मध्ये सहज उपलब्ध होत होती, पण मराठीतून उपलब्ध नव्हती. यावर उपाय म्हणून हे पुस्तक ! एकूण ५१ नवीन तंत्रज्ञाना विषयी माहिती देणारे लेख या पुस्तकात एकत्रित देण्यात आले. पुस्तकास छान प्रतिसाद मिळाला. पुस्तक प्रकाशन करणं या पूर्ण प्रोसेस विषयी चांगलं ज्ञान मिळालं अर्थात त्या अनुभवाने देखील मला समृद्धच केलं.

क्रमश:

अमित बाळकृष्ण कामतकर 


इमेज सोर्स: Gemini 

    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छावा

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

एआय शिक्षकांची जागा घेईल ?