फॉलोअर

शोले



          काही चित्रपट अप्रतिम असतात काळाच्या पुढे असणारे आणि आजही मनाला भुरळ घालणारे असतात असाच एक चित्रपट ज्याने इतिहास रचला आणि आजही तो कोणत्याही वाहिनीवर लागला तर आपण पाहतोच पाहतो... असा “शोले” रमेश सिप्पिंचा अदभूत, एकमेवाद्वितीया अविष्कार !! आजही नव्या पिढीला शोले चे गारुड आहे, हि पिढी देखील प्रत्येक भूमिका तेवढ्याच आनंदाने पाहते जेवढा आनंद आपण घेवून पहात होतो. ४५ वर्षे झाली या चित्रपटास प्रदर्शित होऊन मग तो जेलर चा सीन असेल, कालिया चा “कितने आदमी थे?”, अथवा गब्बर च्या क्रूर पणाचा कळस दाखविण्यासाठी हात तोडलेला पण तितकाच स्वत:च्या निर्णयावर ठाम असलेला निडर ठाकूर असेल, प्रेमात वेडा असलेला पण गोष्टी ऐकायला मित्रा कडे पाठविणारा विरू असेल वा संयमी जय असेल, प्रत्येक भूमिका प्रत्येक कलाकाराने जिवंत केली आहे. मग बसंती, विधवा राधा, ठाकूरचा प्रामाणिक सेवक- रामलाल, रहीम चाचा, त्याचा मुलगा अहमद वा खूपच सुरेख संगम रमेश सिप्पी यांनी केला . चित्रपट शुटींग सुरु करायच्या वेळी अख्ख गाव वसविण्यात आले होते असा प्रोजेक्ट करणारे सिप्पी बहुधा पहिलेच असावेत. वडिलांनी (चित्रपटाचे निर्माते) मुलावर टाकलेला विश्वास आणि मुलाने तो सार्थ ठरविला असेच म्हणावे लागेल. 
            चित्रपटाचे संगीत आर डी च आहे ते हि तितकच लाजवाब, मग ती जय आणि राधा साठी वाजविण्यात आलेली माऊथ ऑर्गन असेल वा विविध फाईट शूट मध्ये दिलेला बॅकग्राउंड स्कोअर असेल सर्व काही लाजवाब, बेमिसाल !!

          असा हा चित्रपट माझा मुलगा आदित्य ने पाहिला आणि चक्क ठाकूर चे डायलॉग आज लागलीच बोलून दाखविले, म्हणुनच या नव्या पिढीच्या मनावर देखील हा चित्रपट राज्य करतोय अस म्हणाव वाटल, “तुम्हे मारने के लिये मेरे दो पैर हि काफी है गब्बर,” हे म्हणणारा ठाकूर आदित्यला भावला नसेल तर नवलच ! आणि मग तो फाईट सिक्वेन्स अगदी फाईट टू फाईट आदित्यला स्मरणात रहावी म्हणजे कौतुकच नाही का?, विरू बसंती ला सुखरूप पोहोचविण्यासाठी केलेला टॉस नंतर गब्बर च्या लोकांना अडविण्यासाठी बॉम्ब ने उडविलेला पूल व त्या चकमकीत धारातीर्थी पडलेला जय, हे सगळ रचण्यात दिग्दर्शकाला यश आले आहे आणि शेवटी कानून के हात लंबे होते है म्हणत गब्बरला पोलिसांच्या हवाली केल जात आणि जय-विरू ने गब्बरला पकडण्याची घेतलेली सुपारी (काम) विरू पूर्ण करतो. हा शेवट !!
          शोले या चित्रपटात प्रत्येक पात्र जिवंत करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला सलाम !! 

तुमची  शोले चित्रपटा संबंधी एखादी आठवण असल्यास जरूर शेअर (कमेन्ट) करावी. 

अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ChatGPT कृत्रिम बुद्धिमत्तेचा अविष्कार- तारक की मारक ?

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?