फॉलोअर

मिटिंग चे मिनिट्स काढणे- एक कौशल्य



          “अभय, उद्या होणाऱ्या आपल्या कंपनी मिटिंग चे मिनिट्स तुला काढायचे आहेत, तयारीत रहा !” अभय च्या बॉस ने अभयला फर्मावले. त्यावर अभय थोडा घाबरला कारण त्याने या अगोदर कधीही मिटिंग चे मिनिट्स काढले नव्हते. त्याने बॉस ला होकारार्थी मान हलवली आणि केबिनच्या बाहेर येताच टीम लीड ची भेट घेतली व मिनिट्स बद्दल त्याच्याकडे विचारणा केली पण टीम लीड कडे अगोदरच बॉस ने इतर कामे दिली होती त्यामुळे त्याला अभय शी बोलायला देखील वेळ नव्हता. आता मात्र अभयच्या डोळ्यासमोर तारे चमकू लागले, त्याला काय करावे कळेना, तो त्याच्या डेस्कवर विचारात बसलेला असताना त्याचा कंपनी मधील मित्र सत्यजित तिथे आला आणि त्याने अभयला विचारले, का रे अभय, काय झाल ? कशाचा विचार करतो आहेस?, अभय लागलीच म्हणाला, बॉस ने मिटिंग मिनिट्स काढायला सांगितले आहेत उद्या !! यावर सत्यजित म्हणाला , “मग त्यात काय एवढा विचार करण्यासारख?”, “अरे खुप सोप आहे हे काम !”, चल मी तुला शिकवितो. यावर अभय म्हणाला, “थँक्स यार !!” , सत्यजित म्हणाला तुला एम.एस.ऑफिस माहिती आहे का?”, अभय म्हणाला, “थोड फार येत पण पूर्ण माहिती नाही,” सत्यजित पुढे म्हणाला, एम.एस.ऑफिस म्हणजे मायक्रोसॉफ्ट ऑफिस, याच कुठलही व्हर्जन (आवृत्ती) घे, जसे कि ऑफिस २००७, ऑफिस २०१३ यामध्ये तुला डॉक्युमेंटेशन, कॅलक्युलेशन आणि प्रेझेन्टेशन उत्तमरीत्या करता येते. तुला बॉस ने डॉक्युमेंटेशन च करायला सांगितले आहे. सुरुवातीला हे समजून घे.

          एम.एस.ऑफिस मध्ये वर्ड २०१३ मध्ये तुला मिटिंग मिनिट्स अगदी सोप्या पद्धतीने काढता येतील. अभय म्हणाला, “कसे यार, बोल ना !!” वर्ड २०१३ मध्ये आपण जेंव्हा डॉक्युमेंट फाईल नवीन तयार करतो तेंव्हा न्यू फाईल निवडताना आपण ब्लँक डॉक्युमेंट निवडतो तिथेच आपल्याला “टेम्प्लेट” निवडण्याची सुविधा वर्ड देते,टेम्प्लेट म्हणजे “एक मार्गदर्शक डॉक्युमेंट” ज्याचा आधार घेवून आपण आपल्याला हवे तसे डॉक्युमेंट तयार करू शकतो, मग या मध्ये तुझा बायोडेटा, ब्लॉग पोस्ट, कव्हर लेटर फॉरमॅट, न्यूज लेटर, एखादा इवेंट मेन्यू तयार करता येतो. जर एखादा पर्याय उपलब्ध नसेल तर इंटरनेट च्या सहाय्याने ऑनलाईन देखील सर्च करण्याची सुविधा इथे देण्यात आलेली आहे. सर्च केल्यावर टेम्प्लेट च्या वर्गीकरणासह माहिती उपलब्ध होते. तुला जी टेम्प्लेट सहज आणि सोपी वाटते ती डाऊनलोड करून पहा आणि तिचा वापर कर !! आहे ना सोप काम !! अभय म्हणाला, “हो यार, खुप सोप आहे, पण मला याची माहितीच नव्हती, थँक्स, सत्यजित !!

अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर 

या विषयी अधिक माहिती / मार्गदर्शन हवे असल्यास खालील वेब साईट (विद्या कॉम्प्युटर्स या लिंक वर) ला भेट द्यावी आणि तेथील "गेट कोट" या बटणावर क्लिक करून फॉर्म भरावा विद्या कॉम्प्युटर्स तुम्हाला मदत करेल. (निशुल्क सेवा)


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ChatGPT कृत्रिम बुद्धिमत्तेचा अविष्कार- तारक की मारक ?

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?