फॉलोअर

प्रेरणादायी मुखपृष्ठ कसे तयार करावे ?



नीला आणि निलेश दोघे सच्चे दोस्त, शाळे पासून एकत्र वाढलेले, एकत्र शिकलेले आणि एकत्रच पदवीच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेला. फक्त प्रवेश घेताना निलेश ला उशीर झाल्याने निलेश ची आणि नीला ची प्रात्यक्षिक बॅच वेगळी असायची आणि मागील सुट्टीत निलेश मामाच्या गावाला गेलेला असल्याने त्याचा एम.एस.सी.आय.टी. हा कोर्स करायचा राहिला आहे. कॉलेज मध्ये एव्हाना विविध स्पर्धे संदर्भात सूचना येवू लागल्या आहेत आणि प्राध्यापक मंडळी विद्यार्थ्यांना या स्पर्धामध्ये भाग घेण्यास प्रोत्साहित करत आहेत. नीला एक एम.एस.सी.आय.टी.यन असल्याने संगणकाच्या विविध प्रोग्राम्स चा वापर शैक्षणिक कामात अगदी योग्य प्रकारे करते. आंतर विद्यापीठ एका स्पर्धे मध्ये नीला आणि निलेश ने भाग घेतला आहे, दोघांचे वेग वेगळे ग्रुप्स आहेत. 
         
सेमिनार रिपोर्ट तयार करणे त्यासाठी विविध सर्च टूल्स चा वापर करणे या सर्व बाबी नीला ला माहिती असल्याने त्यानुसार तिने त्यांच्या ग्रुप चा रिपोर्ट चुटकीसरशी तयार देखील केला व त्यास आकर्षक मुखपृष्ठ सुद्धा दिले यामुळे तिच्या मार्गदर्शक प्राध्यापकांनी निलाचे कौतुक केले. त्या दिवशी घरी जाताना निलेश नीलाला म्हणाला, “कॉंग्रॅटस् निलू, आज तुझ खूप कौतुक झाल.” मला तुझा हेवा वाटला,” यावर निलू म्हणाली, अरे त्यात काय? तिला थांबवत निलेश म्हणाला, “ए निलू, मला शिकवशील, इम्प्रेसिव रिपोर्ट कसा तयार करायचा?”, हो अवश्य शिकवेन, “का नाही” नीला लागलीच उत्तरली. नीला ने निलेश ची तयारी पाहिली व जे काही काम करायचे शिल्लक होते त्याची यादी केली, ती का आणि कशी तयार करायची या बद्दल निलेश ला सांगितले. या बाबी तिला कोर्स दरम्यान तेथील शिक्षकांनी करण्यास शिकविल्या असल्याने त्याचा फायदा तिला इथे झाला.
          नीला ने मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये सर्व माहिती तयार केली, “निलेश ला शिकविले ती फॉरमेट कशी करायची? व्यवस्थित फॉरमेट करीत असताना विद्यापीठाच्या मार्गदर्शक तत्वांचा आधार देखील नीला ने निलेश ला घ्यायला शिकविला.या दरम्यान निलेश नीलाचा रिपोर्ट न्याहळत होता त्यात त्यास मुखपृष्ठ खूपच भावलं आणि तो नीला ला म्हणाला, “निलू मलाही असच मुखपृष्ठ तयार करून देशील?” ए प्लीज, निलू, एवढ तर करशीलच ना माझ्यासाठी?” नीला म्हणाली, “यस यार, तुझ्यासाठी काहीपण!!” दोघे हि एकदम हसले पण त्वरित रिपोर्ट च्या कामात गुंतले. नीला म्हणाली, “निलेश, एम.एस.वर्ड मध्ये “कव्हर पेज”  नावाचा एक पर्याय उपलब्ध आहे. या पर्यायाचा वापर केल्यास विविध डिझाईन चे पेजेस सहज उपलब्ध होतात, त्यातील आपल्या रिपोर्ट शी संबंधित एखादे कव्हर पेज निवडायचे आणि आपल्या रिपोर्ट मध्ये इन्सर्ट करायचे, हि एक पद्धत झाली. दुसऱ्या पद्धती मध्ये आपल्याला हवे तशी पेज बॉर्डर, फॉन्ट, फॉन्ट कलर, वर्ड आर्ट चा वापर करून देखील एक सुंदर मुखपृष्ठ बनवता येते.
          निलेश चा रिपोर्ट तयार झाला, “निलू, थँक्स यार, तू होतीस म्हणून माझा रिपोर्ट तयार झाला. नीला म्हणाली, “थँक्स टू एम.एस.सी.आय.टी.” या कोर्स ने मला हि टूल्स शिकविली जी आज मला माझ्या कॉलेज आयुष्यात जॉब स्किल्स सारखी वापरता आली. “हो निलू, मी आता ठरवलय कि मी हि एम.एस.सी.आय.टी. करणार आणि विविध स्किल्स आत्मसात करणार.”

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करावं. आणि नंतर "गेट कोट" वर क्लिक करून फॉर्म भरून द्यावा. तुम्हास संपर्क केला जाईल व माहिती दिली जाईल.  (मोफत सेवा) 

अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ChatGPT कृत्रिम बुद्धिमत्तेचा अविष्कार- तारक की मारक ?

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?