जय श्रीराम
मी २०१९ मध्ये लिहिलेला हा लेख आज पुन्हा शेअर करीत आहे कारण नुकतीच “वंदे भारत लोकार्पण कार्यक्रमावेळी मा. मुख्यमंत्री यांना "श्रीराम" जयघोष खटकला !! अशीच घटना मागे २०१९ मध्ये तिथेच घडली आणि २०१५ ची आठवण झाली. त्यावेळी म्हणे भारतात असहिष्णुता वाढली होती , म्हणून पुरस्कार वापसी ची लाट आली होती. निमित्त होते मोदी सरकार च्या पहिल्या इनिंग ची सुरुवात आणि कमजोर विरोधी पक्ष ! सुरुवात झाली ती कन्नड़़ लेखक एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्येने आणि मग एकाच वेळी ४० साहित्यिकांनी पुरस्कार परत केले मग बॉलीवूड मधील काही मंडळी पुढे आली आणि म्हणाली “भारत सुरक्षित देश नाही” , आणि बरचं काही यावर विविध न्यूज चॅनल्सवर चर्चा , वादाच्या अनेक फेऱ्या पार पडल्या , संसदेत देखील यावर चर्चा झाली आणि बराच धुराळा उडाला !! हा विषय एवढा वाढला होता कि पंतप्रधान मोदी ब्रिटन दौऱ्यावर असताना ब्रिटन च्या पंतप्रधानानी या विषयी मोदिंसोबत असहिष्णुते बद्दल चर्चा करावी या विषयी या मान्यवर लेखकांनी पत्र व्यवहार देखील केला होता. साहित्य अकादमी चे माजी अध्यक्ष श्री विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या ११ ऑगस्ट २०१८ च्या लेखाच