जय श्रीराम
मी २०१९ मध्ये लिहिलेला हा लेख आज पुन्हा शेअर करीत आहे कारण नुकतीच “वंदे
भारत लोकार्पण कार्यक्रमावेळी मा. मुख्यमंत्री यांना "श्रीराम" जयघोष
खटकला !! अशीच घटना मागे २०१९ मध्ये तिथेच घडली आणि २०१५ ची आठवण झाली. त्यावेळी
म्हणे भारतात असहिष्णुता वाढली होती, म्हणून पुरस्कार वापसी ची लाट आली होती. निमित्त होते मोदी
सरकार च्या पहिल्या इनिंग ची सुरुवात आणि कमजोर विरोधी पक्ष ! सुरुवात झाली ती कन्नड़़ लेखक एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्येने आणि मग एकाच वेळी ४० साहित्यिकांनी पुरस्कार परत केले मग
बॉलीवूड मधील काही मंडळी पुढे आली आणि म्हणाली “भारत सुरक्षित देश नाही”, आणि बरचं काही यावर विविध न्यूज चॅनल्सवर चर्चा, वादाच्या
अनेक फेऱ्या पार पडल्या, संसदेत देखील यावर चर्चा झाली आणि
बराच धुराळा उडाला !! हा विषय एवढा वाढला होता कि पंतप्रधान मोदी ब्रिटन दौऱ्यावर
असताना ब्रिटन च्या पंतप्रधानानी या विषयी मोदिंसोबत असहिष्णुते बद्दल चर्चा करावी
या विषयी या मान्यवर लेखकांनी पत्र व्यवहार देखील केला होता.
साहित्य अकादमी चे माजी अध्यक्ष श्री विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या ११ ऑगस्ट
२०१८ च्या लेखाचा आधार घ्यायचा म्हंटल तर यामध्ये असहिष्णुतेच मुद्दा १ पैसा होता
आणि राजकारण ९९ पैसे होते कारण स्वयंस्फूर्तीने हे आंदोलन सुरु झाले नव्हते तर
काही लेखकांनी संपूर्ण देशात नेटवर्किंगच्या (संगनमताने) आधाराने हे घडवायचा
प्रयत्न केला होता. हे सगळं मांडायचे कारण असे कि नुकतेच पश्चिम बंगाल मध्ये माननीय
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ‘परगना’ या गावातून जात असताना तेथील समुदायाने “जय
श्रीराम” चा जयघोष केला, न्यूजचा
आधार घेतल्यास तो समूह भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांचा होता आणि
मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार तो समूह तेथील रहिवासीच नव्हता ! मग असे किती
रहिवासी पश्चिम बंगाल मध्ये आहेत? हे तरी मा.मुख्यमंत्री
महोदया यांनी देशास सांगून टाकावे. अडचण कशाची आहे?, “जय
श्रीराम” म्हणण्याची कि समूह तेथील रहिवासी नाही याची. जर तो समूह तेथील गावातील
नाही तर तो एवढे सुरक्षा रक्षक असताना त्या ताफ्यात तिथे काय करत होता? असा प्रश्न माझ्या सारख्या सामान्य माणसास सहजच पडतो.
महोदया गाडीतून खाली उतरल्या आणि अर्वाच्य भाषेत “जय श्रीराम” चा जयघोष केला तर पाठ सोलून काढण्याची भाषा बोलू लागल्या एवढे काय झाले माननीय मुख्यमंत्र्यांना ? त्यांच्या सुरक्षा रक्षकांना आदेश देवून घोषणा देणाऱ्यांची नावे गोळा करायला सांगण्या इतपत कोणती अडचण? यास काय म्हणावे ? असा प्रश्न पडला. जय श्रीराम म्हणाल्यामुळे यांना नक्की काय त्रास झाला? यावर कोणीही चर्चा तर दूर, साधा निषेध हि नोंदविला नाही. स्वतंत्र भारतातील पश्चिम बंगाल मध्ये आता जय श्रीराम म्हणणे म्हणजे गंभीर गुन्हाच म्हणावा लागेल. (कारण त्यावेळी दहा जणांवर गुन्हा दाखल झाला होता) यास म्हणता येईल का असहिष्णुता ? मला बापड्याला कळतं नाही म्हणून म्हंटल तुम्हाला विचारावं ,
तुम्हास काय वाटतं ते कमेंट मध्ये
व्यक्त व्हा, आणि हो निषेध नोंदवा !
जय श्रीराम !
अमित बाळकृष्ण
कामतकर
सोलापूर
Nishedh
उत्तर द्याहटवा