फॉलोअर

मैं शायर बदनाम


१९७३ साली नमक हराम हा हृषीकेश मुखर्जी दिग्दर्शित चित्रपट अनेक कारणांनी हिट नव्हे सुपरहिट झाला होता. या चित्रपटातील अमिताभ यांच्या अँग्री यंग मॅन च्या छबीने प्रेक्षकांच्या हृदयातील स्थान अधिक भक्कम केले होते. लीड रोल ला काकाजी होते पण बच्चन साहेब भाव खाऊन गेले, अनेक दृश्यांमध्ये हे प्रकर्षाने पहायला मिळते, हा संवाद, “कौन है वो माय का लाल जो अपनी मां का दुध आजमाना चाहता है ?” म्हणणारा अमिताभ (चित्रपटातील विकी) कुणी विसरला असेल तर नवलचं ! या चित्रपटाची अजून एक जमेची बाजू म्हणजे त्याचं गीत आणि संगीत, हि जबाबदारी आनंद बक्षी आणि पंचम दा नी अगदी उत्तमप्रकारे सांभाळली आहे. नदिया से दरिया, दिये जलते है आणि मै शायर बदनाम हि काही गाणी आजही अगदी एव्हरग्रीन वाटतात, अर्थात या मध्ये किशोर यांचा जादुई आवाज मोलाची भूमिका पार पाडतो यात शंकाच नाही.

सर्व गीतांमध्ये गीतकाराचे अनन्य साधारण असे योगदान आहे कारण जे जादुई अर्थपूर्ण शब्द आनंद बक्षी यांनी लिहिले आहेत त्यास तोडच नाही, गीताच्या शब्दांमध्ये दडलेला अर्थ उलगडायचा प्रयत्न केला तर नव-नवीन अर्थांची क्षितिजं पादाक्रांत केल्याचा आनंद मिळतो. आता हेच पहा ना, “इस रंग रूप पे देखो, हरगीज नाज ना करना, जान भी मांगे यार तो दे देना, नाराज ना करना, रंग उड जाते है, धूप ढलते है,” यामध्ये गर्भित अर्थ दडलेला आपल्याला दिसतो आणि तितकाच तो भावतो देखील !! अगदी तसेच या कडव्या च्या अगोदरच्या ओळी सुद्धा तेवढ्याच अर्थपूर्ण आहेत, “जब जिस वक्त किसीका यार जुदा होता है, कुछ ना पुछो यारों दिल का हाल बुरा होता है ||, प्रत्येकाच्या जीवनात मित्रां पासून दूर होण्याचा प्रसंग हा येतोच त्यावेळी प्रत्येक मित्राची स्थितीच बक्षी यांनी व्यक्त केली आहे, अस मला वाटतं. शेवटच्या कडव्यात तर सत्य वचन च म्हणावे लागेल, “उम्रभर दोस्त लेकीन साथ चलते है ||” सगळं कसं अगदी टचिंग !! हृदयाचा ठाव घेतात !! 

चित्रपटातील बक्षी साहेबांचे बोल अगदी साधे सोपे पण तितकेच अर्थपूर्ण आहेत, एखादी मोठी गोष्ट सुद्धा अगदी सहज सांगितली आहे. याच चित्रपटात एखाद्या कवी बद्दल व्यक्त होताना त्याच्या

जीवनातील चढ उतार आणि त्यास सोबत करणारी मदिरा याबाबत व्यक्त होणारा कवी निराळाचं आणि विरळचं म्हणावा लागेल. आयुष्याच्या शेवटी व्यक्त होणारी व्यथा त्या कवीची कथाच सांगते. आयुष्यात आपण काहीच करू शकलो नाही याचं शल्य किती मोठं असतं हेच जणू बक्षी साहेबांना सांगायचं असावं. अर्थात अशा काव्याची मागणी करणारे चित्रपटाचे दिग्दर्शक -हृषिदा ! हि तितकेच ग्रेट !
 या गाण्यात व्यक्त होणारे भाव हे तुमचे माझे आहेत अस वाटतं. प्रत्येक मनुष्यास आयुष्यात विविध अडचणीना सामोरे जावे लागते, आणि कोणतीच गोष्ट मनासारखी झाली नाही मग ती का मनासारखी झाली नाही यात दोष कुणाचा, किंबहुना दोष कुणालाच देता येत नाही म्हणून तो नशिबास द्यायचा हि मनुष्य प्रवृत्ती ! यास हा कवी देखील अपवाद नाही. शेवटी जीव शरीरास का सोडत नाहीये तर काहीतरी आशा, अपेक्षा अजूनही शिल्लक आहेत पण त्या काही आता पूर्ण होवू शकत नाहीत म्हणून अखेरचा सलाम घ्यावा अशी आर्जव हा कवी करतो. किती अर्थपूर्ण काव्य आहे आणि तितकचं सोप्या शब्दात !

अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर


हा लेख तुम्हाला कसा वाटला, मला जरूर सांगा, तुमचा अभिप्राय कमेंट करावा. 

हे गाणं जसं माझ फेव्हरीट आहे तसचं तुमचंही असणारचं, आज या लेखाच्या निमित्ताने एक सुंदर आठवण नक्कीच झाली असेल, या गाण्याचे बोल खास तुमच्यासाठी ......
मैं शायर बदनाम, मैं चला, मैं चला
महफ़िल से नाकाम, मैं चला, मैं चला
मेरे घर से तुमको, कुछ सामान मिलेगा
दीवाने शायर का, एक दीवान मिलेगा
और इक चीज़ मिलेगी, टूटा खाली जाम
शोलों पे चलना था, काँटों पे सोना था
और अभी जी भरके, किस्मत पे रोना था
जाने ऐसे कितने, बाकी छोड़के काम
रस्ता रोक रही है, थोड़ी जान है बाकी
जाने टूटे दिल में, क्या अरमान है बाकी
जाने भी दे ऐ दिल, सबको मेरा सलाम

          गायक : किशोर कुमार                               गीतकार : आनंद बक्षी
          संगीत : राहुल देव बर्मन


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ब्रॅंडींग लीडरशिप

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?