साथीया, ये तूने क्या किया- एस.पी.बी.
एस. पी. बालासुब्रमण्यम अर्थात एस.पी.बी. या नावाने परिचित असलेले प्रसिद्ध गायक कलाकार आज अनंताच्या प्रवासास निघून गेले. एक दुजे के लिए मधील “आप्पडिया”, “मेरे जीवन साथी, प्यार किये जा”, “सच मेरे यार है बस वही प्यार है”, म्हणून कमल हसन यांचा स्वर आपल्या सर्वांच्या परिचयाचा, अगदी त्याच प्रमाणे सलमान खान याचा स्क्रीन वरील आवाज म्हणून देखील आपण एस.पी.बी. ना ओळखतो , “ आजा शाम होने आयी”, “साथीया ये तूने क्या किया”, अशी एक ना अनेक गाणी आपल्या सर्वांच्या हृदयाच्या अगदी जवळ आहेत, एस.पी.बी यांनी जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजीकल विद्यापीठ, अनंतपुर येथे इंजीनीअरिंग पदवी साठी प्रवेश घेतला होता पण संगीताची आवड आणि त्यातील रुची यामुळे इंजीनीअरिंग “ड्रॉप आउट” हा शिक्का भाळी घेऊन त्यांनी पुढील वाटचाल सुरू ठेवली. याच काळात एस.पी.बी. यांनी चेन्नई इन्स्टिटयूशन ऑफ इंजीनियर येथे प्रवेश घेतला. तिथे विविध संगीत स्पर्धांमध्ये एस.पी.बी. भाग घेत, त्यांच्या गायकीचे सर्वच फॅन होते, क्षणास थांबविण्याचं कसब त्यांच्या कडे होतं, अशाच विविध स्पर्धांमध्ये प्रख्यात तेलुगू चित्रपट संगीतकार एस. पी. कोडानाडपानी (एस.पी.बी. यांच