फेसबुक अकाऊंट हॅकर्स पासून सावधान
---फेसबुक मेसेंजरवरील संवाद----
संजना : हाय सुमित, कैसे हो?
सुमित : मै एकदम मस्त, तुम कहो ? (सुमितला प्रश्न पडतो कि संजना अचानक हिंदी मध्ये का
बोलते आहे? पण तो तिला उत्तर देतो)
संजना: यार, थोडे पैसे कि जरुरत है, लॉक डाऊन कि वजह से हाल बेहाल है ....
तुम मदत करोगे इसलिये तुमसे बात कर रही हुं.....
9******20** इस नंबर पर १०,०००/- भिजवा दो, प्लीज
वरील संवाद ओळखीचा /
कुठेतरी वाचण्यात / ऐकण्यात आलेला असावा तुमच्या, या महामारीच्या काळात असे अनेक
मेसेजेस फेसबुक मेसेंजर वर अथवा whatsapp वर आलेले आणि फसगत झालेले मित्र /
परिचयातील व्यक्ती तुम्ही पाहिले असतील. हॅकर्स तुमच्या फेसबुक अकाऊंटला लॉग इन
करतात आणि मित्र परिवारा कडून पैशाची मागणी करतात. आपला मित्र / मैत्रीण अडचणीत
आहे समजून मदत केली जाते आणि इथेच फसगत होते. तुमच्या फेसबुक अकाऊंट ची काळजी
तुम्हीच घेणे अपेक्षित आहे, आज काही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्ही
अमलात आणल्यास यास प्रतिबंध करणे शक्य होऊ शकेल. साधारण लॉक डाऊन सुरु
होण्यापूर्वी भारतीय मंडळी दिवसभरातील १५० मिनिटं सोशल मीडिया साठी देत होती ती लॉक
डाऊन काळात जवळपास २८० मिनिटं एवढी वाढली, साहजिकच फेसबुक अकाऊंटचा वापर करताना
काही त्रुटी राहिल्या असणार आणि याचा वापर हॅकर्सने केला असणार, मग फेसबुक अकाऊंट
वापरताना काय काळजी घ्यावी ?
१.
उत्तम पासवर्ड (संकेतशब्द): पासवर्ड तयार करताना काही गोष्टींची काळजी घेणे अपरिहार्य आहे आणि ती घ्यावी
त्यामुळे वरील प्रकारचा प्रसंग तुमच्यावर येणार नाही. पासवर्ड कमीत कमी सहा ते दहा अक्षरी असावा त्यात स्पेशल
चिन्हांचा वापर करावा, जसे कॅपिटल अक्षरे व लहान अक्षरे यांचा एकत्रित वापर,
पर्सेंट चिन्ह, अॅट चिन्हांचा वापर आदी ज्यामुळे तो
सहजरीत्या ओळखता येणार नाही. पासवर्ड कसा असावा याविषयी माझा लेख उपलब्ध आहे तो अधिक माहितीसाठी वाचावा
त्याची लिंक देत आहे.
https://amitkamatkar.blogspot.com/2017/08/blog-post_28.html
२.
तुमचा मोबाईल क्रमांक अपडेट ठेवा: फेसबुक वर मोबाईल क्रमांक अपडेट ठेवावा, याचे फायदे अनेक आहेत, जसे पासवर्ड
विसरला तर कोड मागविण्यासाठी याचा वापर करता येतो.
३.
प्रायव्हेट ब्राउझिंग: हि एक उत्तम सुविधा आहे. गुगल क्रोम, मोझीला या ब्राउझर मध्ये प्रायव्हेट ब्राउझिंग
हा पर्याय उपलब्ध आहे त्याचा वापर करावा. (शक्यतो जेंव्हा तुम्ही तुमच्या
कॉम्प्युटर व्यतिरिक्त कॉम्प्युटरचा वापर करता तेंव्हा हि सुविधा वापरावी.
महत्वाचं - पर्सनल डेटा गोळा करणाऱ्या साईट्स पासून तुमचं रक्षण होते)
४.
टू-फॅक्टर ऑथरायझेशन: फेसबुक अकाऊंट सेटिंग्ज मध्ये हि सुविधा देण्यात आलेली आहे, या सुविधेचा वापर
करावा. तुमच्या वापरात नसलेल्या डिव्हाईस (मग तो संगणक असेल अथवा स्मार्ट फोन असेल)
वरून लॉग इन करण्यात येत असेल तर फेसबुक तुम्हाला अलर्ट मेसेज पाठवतं आणि तुम्ही
खात्री केल्यानंतर लॉग इन होतं. हि सुविधा ON ठेवावी.
५.
लॉग इन तपासा: तुम्ही
कोणत्या डिव्हाईसेस वरून लॉग इन केलेलं आहे त्याचा गोषवारा पहावा. तुमच्या फेसबुक
अकाऊंट मध्ये सेक्युरिटी अँड लॉगइन या पर्यायात तुम्हाला मिळतो. ते तपासा.
तुम्हाला एखाद्या डिव्हाईस ची शंका आली तर लागलीच “लॉग आउट ऑल सेशन्स” हा पर्याय
निवडा.
६. गेट अलर्टस् : हा पर्याय देखील सेक्युरिटी अँड लॉगइन या ठिकाणी उपलब्ध आहे त्याचा वापर जरूर करावा. फेसबुक साठी अनोळखी लॉग इन होत असल्यास तुम्हाला तसा अलर्ट फेसबुक द्वारे दिला जातो.
७.
मित्रांची मदत : हि
सुविधा तुम्ही फेसबुकला लॉग इन होऊ शकत नसाल तर तुमच्या जवळच्या मित्रांची नावे
यादीत देऊन ठेवावीत जर कधी आवश्यकता पडली तर या सुविधेचा वापर करता येऊ शकतो.
८.
स्पॅम लिंक वर क्लिक करणे टाळा: फेसबुक वर विविध जाहिराती येतात, कधी अनोळखी व्यक्ती कडून फ्रेंड रिक्वेस्ट
येते ती स्वीकारू नका, कधी अनोळखी व्यक्ती कडून लिंक (तुम्ही ***** रक्कम जिंकली
आहे अशा प्रकारचे) शेअर केली जाते त्यावर क्लिक करण्याचा मोह टाळा. (लिंक मध्ये
https:// आहे का पहा, ज्या व्यक्तीने शेअर केली आहे तो तुमच्या परिचयातील असावा.)
९. युजरनेम पासवर्ड: शेअर करणे टाळा, www.facebook.com याच लिंक द्वारे तुम्ही लॉग इन करत आहात का हे तपासा.
१०. अपडेट रहा: तुमचा ब्राउझर आणि स्मार्ट फोन वरील अॅप अपडेट ठेवा. सेक्युरिटी पॉलीसी विषयी फेसबुक द्वारे वेळोवेळी येणाऱ्या सूचनांचे वाचन आणि अनुसरण करा.
वरील सर्व सूचना अंमलात
आणता आल्या तर तुमची फसगत होण्यापासून बचाव शक्य आहे, पण सतर्क राहणं आवश्यक आहे.
तुम्हाला काही अडचण असल्यास / शिकायचे असल्यास अथवा
या विषयी अधिक माहिती / मार्गदर्शन हवे असल्यास खालील वेब साईट (विद्या
कॉम्प्युटर्स या लिंक वर) ला भेट द्यावी आणि तेथील "गेट कोट" या बटणावर
क्लिक करून फॉर्म भरावा विद्या कॉम्प्युटर्स तुम्हाला मदत करेल. (निशुल्क सेवा)
सोलापूर
इतर विषयावरील लेख वाचण्यासाठी क्लिक करावं.
thankx .... u care about us
उत्तर द्याहटवाsrikant sir