साथीया, ये तूने क्या किया- एस.पी.बी.
एस. पी. बालासुब्रमण्यम अर्थात एस.पी.बी. या नावाने परिचित असलेले प्रसिद्ध गायक कलाकार आज अनंताच्या प्रवासास निघून गेले. एक दुजे के लिए मधील “आप्पडिया”, “मेरे जीवन साथी, प्यार किये जा”, “सच मेरे यार है बस वही प्यार है”, म्हणून कमल हसन यांचा स्वर आपल्या सर्वांच्या परिचयाचा, अगदी त्याच प्रमाणे सलमान खान याचा स्क्रीन वरील आवाज म्हणून देखील आपण एस.पी.बी. ना ओळखतो, “आजा शाम होने आयी”, “साथीया ये तूने क्या किया”, अशी एक ना अनेक गाणी आपल्या सर्वांच्या हृदयाच्या अगदी जवळ आहेत, एस.पी.बी यांनी जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजीकल विद्यापीठ, अनंतपुर येथे इंजीनीअरिंग पदवी साठी प्रवेश घेतला होता पण संगीताची आवड आणि त्यातील रुची यामुळे इंजीनीअरिंग “ड्रॉप आउट” हा शिक्का भाळी घेऊन त्यांनी पुढील वाटचाल सुरू ठेवली. याच काळात एस.पी.बी. यांनी चेन्नई इन्स्टिटयूशन ऑफ इंजीनियर येथे प्रवेश घेतला. तिथे विविध संगीत स्पर्धांमध्ये एस.पी.बी. भाग घेत, त्यांच्या गायकीचे सर्वच फॅन होते, क्षणास थांबविण्याचं कसब त्यांच्या कडे होतं, अशाच विविध स्पर्धांमध्ये प्रख्यात तेलुगू चित्रपट संगीतकार एस. पी. कोडानाडपानी (एस.पी.बी. यांचे मार्गदर्शक आणि गुरु) यांनी एस.पी.बी. ना ऐकलं आणि तेथून त्यांचा रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करायचं प्रवास सुरू झाला तो आज पर्यन्त अखंड सुरू होता.
एस.पी.बी.
यांनी चित्रपट सृष्टि मध्ये अतुलनीय योगदान दिले आहे, कन्नड, तामीळ, तेलुगू,
हिन्दी अशा विविध भाषांमध्ये 40,000
गाणी त्यांच्या नावे आहेत, एक गायक,अभिनेता, संगीतकार अशी अनेक बिरुदं त्यांनी
मिरविली आहेत आणि प्रत्येक ठिकाणी स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. एक
हरहुन्नरी कलाकार आणि तितकाच देव माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. एस.पी.बी. यांचा
सिनेमा प्रवास १९६६ साली सुरू झाला, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस मध्ये एस.पी.बी.
यांची नोंद करण्यात आली आहे. एकाच दिवशी सर्वात जास्त गाणी म्हणण्याचे हे रेकॉर्ड
आहे. कन्नड संगीतकार उपेंद्रकुमार यांच्या साठी २१ गाणी अवघ्या १२ तासात, १९ गाणी
तामीळ मध्ये, १६ गाणी हिन्दी मध्ये , हे सगळं अतुलनीय आहे, त्यांनी एका मुलाखतीत
सांगितले होते की, संगीतकार आनंद-मिलिंद यांच्या साठी त्यांनी एकाच दिवसात १५
विविध गाणी गायली आणि त्याच रात्री विमानाने चेन्नई ला परतले. सरासरी ९३० गाणी
वर्षात म्हणजे दिवसाला २.५ गाणी हे अद्याप जगात कोणालाही शक्य झालेलं नाही. विविध
२०० चित्रपटात गायक म्हणून एस. पी यांनी योगदान दिले आहे. सहा वेळा राष्ट्रीय
पुरस्कार (तीन वेळा तेलुगू, एका हिन्दी (चित्रपट: एक दुजे के लिए), एक तामीळ आणि
एक कन्नड गीतासाठी), ४६ चित्रपटात (विविध भाषा मधील)
संगीतकार आणि ७२ चित्रपटात सहकलाकार म्हणून उत्तम भूमिका बजावणारे एस.पी.बी. एकमेवाद्वितीया
वाटतात. “रोजा” चित्रपटातील सगळीच गाणी लोकप्रिय आहेत, यात एस.पी.बी. यांनी
गायलेल्या गीतांचा एक वेगळाच आनंद आहे, विशेष बाब म्हणजे एस.पी.बी. यांनी ए. आर.
रेहमान यांच्या संगीत निर्देशनातच एस.पी.बी. यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कार तामीळ गीता साठी
मिळाला.
संगीतातील
देव माणूस, हे उगाच कुणी म्हणत नाही, ज्या ज्या वेळी सामाजिक बांधिलकी, एखाद्या
विशेष कारणांसाठी चॅरिटी शो होत असत तेंव्हा एस.पी.बी. अग्रेसर असायचे, असे हजारो
शोज एस.पी.बी. यांनी त्यांच्या आवाजाने मंत्रमुग्ध केलेले आहेत. असे हे मंत्रमुग्ध
करणारे, जाणाऱ्या क्षणासही थांबविणारे अतुलनीय गायक आज आपल्यात नाहीत, पण एक नक्की
त्यांचा आवाज आपली सोबत अखंड करीत राहील. आज थोडावेळ काढूयात आणि त्यांना धन्यवाद देऊया….. सागर चित्रपटातील जावेद अख्तर यांनी लिहिलेलं
“सच मेरे यार है,” या गीतातील या ओळी ..म्हणजेच आपल्या एस.पी.बी. विषयीच्या
भावना आहेत,
सुनते
थे हम, ये ज़िंदगी
ग़म
और खुशी का मेल है
हमको
मगर आया नज़र
ये
ज़िंदगी वो खेल है
कोई
सब जीते सब कोई हार दे
अपनी
तो हार है, यार मेरे..
एस. पी. बी यांना शब्द सुमनांजली ..
अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर
तुम्हाला आवडणारं एस. पी.
बी. यांच गीत कमेन्ट करावं.
इतर विषयावरील लेख वाचण्यासाठी क्लिक करावं.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा