पोस्ट्स

जून, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फॉलोअर

स्पर्श

इमेज
शब्द उच्चारताच अनुभूती होते, नाही का ? काहींच्या गोड आठवणी जाग्या झाल्या असतील. मला तर हा शब्द च चमत्कारिक आहे अस वाटतं कारण आपण आपसूकच विचारून जातो ,”कुणाचा ?” पण “स्पर्श” ची व्याख्या करायची ठरवल तर कुणा एका पुरती ती करता येणार नाही, कारण प्रत्येकास ती वेगळी असेल, परिभाषा वेगळी असेल, अनुभूती वेगळी असेल, भाव- भावना वेगळ्या असतील... नाही का ?  आता हेच पहा ना, छोट्या बाळाचा स्पर्श अनुभविण्यासाठी आसुसलेली आई, बाळ हातात घेण्यासाठी वाट पाहणारे ताई, दादा, यांची स्पर्शाची व्याख्या शब्दात व्यक्त होवू शकेल? मला नाही वाटत शक्य आहे, पण हा स्पर्श च एक अजब रसायन आहे प्रेम विरांसाठी स्पर्श म्हणजे एक “दिव्य” अनुभूती, ज्याची वाट प्रत्येक जण आयुष्यात बघत असतो, हे एक गोड गुपित असतं पण तुमचं आमचं सेम असतं !!   दोन एक दिवसा पूर्वी सकाळी फिरताना (morning walk) एक आजी- आजोबा दिसले, आजोबांच बहुधा मोती-बिंदू च ऑपरेशन झाल असाव, कारण त्यांनी काळा चष्मा घातला होता. आजी-आजोबांच्या छान गप्पा रंगल्या होत्या त्यांना आजू-बाजूच्या लोकांशी काहीच घेण-देण नव्हतं, माझ त्या दोघांकडे लक्ष गेलं आजीनी आजोबांचा हात घट्ट पकडून

स्टार्टअप सक्सेस मंत्र

इमेज
  आपल्या स्वप्नातील स्टार्टअप सत्यात उतरवणं म्हणजे कौशल्याची पराकाष्ठा करावी लागते.   एखादा स्टार्टअप यशस्वी करणं म्हणजे केवळ योगायोग नव्हे !! तर अनेक यातना, विविध समस्या त्यातून निर्माण होणाऱ्या परीक्षां मध्ये उत्तीर्ण व्हावं लागतं, हे करीत असताना अस्वस्थता, निराशा, अपमान यांचा सामना करीत यशाच्या लाटेवर स्वार व्हावं लागतं. हे साध्य करताना “मन ठेवारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण”, हा मंत्र लक्षात ठेवावा लागतो. प्रत्येक स्टार्टअपची सुरुवात आणि प्रवास हा भिन्न असतो, पण त्यातून मिळणारी मूलभूत मूल्यं सारखी असतात. ज्यास आपण बेसिक्स म्हणतो, अर्थातच व्यवसाय चालविणे , तो प्रोफेशनली चालवायला शिकणे आणि एक यशस्वी उद्योजक बनणे या प्रवासात बरचं काही शिकायला मिळतं. आपण ते शिकावं आणि पुढे जात रहावं. यालाच यशस्वी उद्योजक होण्याचा प्रवास म्हणता येईल. १. धीर धरी धीरापोटी : धीर धरी धीरापोटी असती मोठी फळे गोमटी , हे एक निर्विवादीत सत्य आहे. सगळं एकाच रात्रीत जादूची कांडी फिरविल्यासारख काहीही नाही मिळणार. ओव्हर नाईट सक्सेस मिळण शक्य नाही अशा क्षेत्रात आपण आहोत हे विसरता कामा नये. जिद्द आणि चिकाटीच तुम्हाल

स्टार्टअप बेसिक्स – फंडामेंटल्स

इमेज
  प्रथमत: आपण याचा स्विकार करूया कि आपल्याकडे स्वत:चा व्यवसाय, उद्योग सुरु करण्याची संस्कृती नाही, विद्यार्थ्यांकडे शिक्षण घेत असताना एकच ध्येय डोळ्यासमोर असतं ते म्हणजे उत्तम नोकरीसाठी जे करावं लागेल ते करू आणि त्या प्रमाणेच स्वत:ला तयार करू. मग तो महाविद्यालयीन विद्यार्थी असेल अथवा एखादा पदवीधर , दोघांची स्वप्नं सारखीच !! मग हि स्वप्नं साकार करण्यासाठी धडपड सुरु असते काही मंडळी यात यशस्वी होतात आणि त्यांना त्यांचा ड्रीम जॉब मिळतो आणि काही मंडळी मिळालेल्या गोष्टीत समाधान मानतात..... पण स्व-उद्योग हि संस्कृती अंगिकारायची असल्यास काय करावं लागेल? याविषयी शैक्षणिक धोरणात ठोस अभ्यास, निर्णय नसल्यानं असावं बहुधा, पण या विषयी विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणापासून प्रेरणा देणे गरजेचे आहे. कल्पना आणि निर्मिती हे शिक्षणाचे मुलभूत भाग आहेत तसेच नव्या उद्योगासाठी देखील ते तितकेच महत्वाचे आहेत. आजची पिढी प्रगत आहे, या पिढीस सुरुवातीपासूनच टेक्नोलॉजीचा वापर करण्याची सवय आहे, हा वापर फक्त योग्य दिशेने केला कि त्याची फळ मिळू शकतात हे समजून सांगणे आवश्यक वाटते. आजूबाजूस घडणाऱ्या गोष्टींवर नजर ठेवली आणि

विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सॉफ्ट स्किल्स्

इमेज
  मागील शैक्षणिक वर्ष हे कोविड मुळे ऑनलाइनच्या माध्यमातून शिक्षण घेत विद्यार्थ्यांनी पूर्ण केलं. ऑनलाइन शिक्षण, म्हंटल तर नवीन , प्रथमच पाहतोय असे, म्हंटलतर आठवड्यातील जो एक ई-लर्निंग चा तास पूर्ण करणाऱ्या शाळांसाठी आणि तेथील विद्यार्थ्यांसाठी जुनाच चम्मतग चा तास !! जो कोविड मुळे वर्षभर पहायचा होता. शिक्षक आणि पालकांसाठी खरी परीक्षा म्हणावी असा हा कालावधी, पण या परीक्षेत शिक्षक यशस्वी झाले (काही अपवाद वगळता) असे मी म्हणेन, काही ठिकाणी शिक्षक एकटेच ऑनलाइन क्लासला उपस्थित राहिले. काही केस स्टडीज उत्कृष्ट आहेत, काही शिक्षकांनी अभिनव असे प्रयोग देखील या दरम्यान केले आहेत. मग तो गुगल फॉर्म, क्लासचा उपयोग, ऑनलाइन टेस्ट, व्हिडियो शेअरिंग, शिक्षकांनी स्वत:कडील विविध शैक्षणिक साहित्याचा वापर करून नवीन पद्धतीने सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना आकलन होणे हेतू केलेले अनेक प्रयोग या ऑनलाइन शिक्षणाचे साक्षीदार आहेत आणि यापुढेही राहतील. कोविडपूर्वी मुलांचा स्क्रीन टाईम कसा कमी करता येईल यावर चर्चा व्हायच्या पण जे विद्यार्थी मित्र दहावीत होते, त्यांना हा स्क्रीन टाईम कमी करणं म्हणजे तारेवरची कसरतच !! पण