फॉलोअर

स्पर्श

शब्द उच्चारताच अनुभूती होते, नाही का ? काहींच्या गोड आठवणी जाग्या झाल्या असतील. मला तर हा शब्द च चमत्कारिक आहे अस वाटतं कारण आपण आपसूकच विचारून जातो ,”कुणाचा ?” पण “स्पर्श” ची व्याख्या करायची ठरवल तर कुणा एका पुरती ती करता येणार नाही, कारण प्रत्येकास ती वेगळी असेल, परिभाषा वेगळी असेल, अनुभूती वेगळी असेल, भाव- भावना वेगळ्या असतील... नाही का ?

 आता हेच पहा ना, छोट्या बाळाचा स्पर्श अनुभविण्यासाठी आसुसलेली आई, बाळ हातात घेण्यासाठी वाट पाहणारे ताई, दादा, यांची स्पर्शाची व्याख्या शब्दात व्यक्त होवू शकेल? मला नाही वाटत शक्य आहे, पण हा स्पर्श च एक अजब रसायन आहे प्रेम विरांसाठी स्पर्श म्हणजे एक “दिव्य” अनुभूती, ज्याची वाट प्रत्येक जण आयुष्यात बघत असतो, हे एक गोड गुपित असतं पण तुमचं आमचं सेम असतं !! 


 दोन एक दिवसा पूर्वी सकाळी फिरताना (morning walk) एक आजी- आजोबा दिसले, आजोबांच बहुधा मोती-बिंदू च ऑपरेशन झाल असाव, कारण त्यांनी काळा चष्मा घातला होता. आजी-आजोबांच्या छान गप्पा रंगल्या होत्या त्यांना आजू-बाजूच्या लोकांशी काहीच घेण-देण नव्हतं, माझ त्या दोघांकडे लक्ष गेलं आजीनी आजोबांचा हात घट्ट पकडून धरला होता, रस्त्याच्या कडेने चालत असताना देखील काळजी पोटी, प्रेमा पोटी त्या माऊलीने हात धरला होता. आजी चा चालण्याचा वेग थोडा जास्त पण आजोबाना लगबग चालणे जमत नव्हते, बहुधा ऑपरेशन मुळे असावे. पण आजी कानोसा घेवून चालत होती.

त्याच वेळी माझे लक्ष एका नव-दाम्पत्याकडे गेले तिथे मात्र नवऱ्याने बायकोचा हात घट्ट (अर्थात प्रेमाने) पकडला होता. दोन्ही ठिकाणी नवरा-बायको हेच नात, फरक फक्त वयाचा ! प्रेम हि (कदाचित) तेवढच पण स्पर्शाची व्याख्या वेग-वेगळी !! आयुष्याच्या विविध वळणावर स्पर्शाची व्याख्या बदलते हेच खरं.....


अमित बाळकृष्ण कामतकर 

सोलापूर

#amitkamatkar

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?

मेल मर्ज काय आहे ?