ओव्हर द टॉप (OTT)- जरा सांभाळून
साधारण ऑगस्ट १९९५ मध्ये पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी पहिला मोबाईल कॉल तत्कालीन केंद्रीय दूरसंचार मंत्री सुखराम यांना केला आणि तेथून मोबाईल क्रांती म्हणू आपण फारतर, ती सुरू झाली. मोबाईल पूर्वी पेजर सारखी सुविधा काही शहरात सुरू होती पण मोबाईल वापर करणारी मंडळी व्यावसायिक होती, ज्यात इनकमिंग कॉलला देखील चार्जेस होते. त्यानंतर जवळपास सतरा वर्षा नंतर २०१२ मध्ये कोलकाता येथे 4 G तंत्रज्ञानाचा श्रीगणेशा झाला. २६ वर्षांचा कालावधी झाला आहे आणि या कालावधीत “भारत” स्मार्ट फोन मार्केट साठी जगात दुसऱ्या स्थानी आहे. खूप गोष्टी बदलल्या, खूप गोष्टी सोप्या झाल्या, फक्त कॉल करण्यासाठी फोन अशी त्याची व्याख्या न राहता इंटरनेटच्या सहाय्याने करमणूक, बँकिंग, गप्पा-टप्पा, ई-कॉमर्स, गेमिंग, ई-लर्निंग या कारणांसाठी वापरला जाऊ लागला. यात सगळ्यात जास्त “करमणूक” या प्रकारात स्मार्ट फोनचा वापर होत आहे आणि तो होत राहील. ओव्हर द टॉप ( OTT ) प्लॅटफॉर्म ने इंटरनेट सहाय्याने स्मार्ट फोन वर टेलिव्हिजन आणि चित्रपट सेवा देण्याचे सुरू केले आणि त्यास प्रचंड प्रसिद्धी मिळू लागली, मिळत आहे आणि रा