ads

फॉलोअर

आज वाचा

प्रगल्भतेचे वरदान- समाधानाची लेखणी

इमेज
  मानवी मनाचे अंतरंग हे अनाकलनीय आणि अथांग सागराप्रमाणे असते. या सागरात सतत विचारांचे , भावनांचे तरंग उमटत असतात. कधी आनंदाची भरती , तर कधी दुःखाची ओहोटी. या तरल , गुंतागुंतीच्या भाव-भावनांना मुक्त वावर देताना स्वतःला पाहण्याची , अनुभवण्याची आणि त्यातून एक प्रकारची आत्मिक शांतता मिळवण्याची किमया केवळ पुस्तकेच साधू शकतात. पुस्तके म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नसतात , तर ते लेखकाच्या अंतरीचा प्रवास असतो. लेखक आपल्या लेखणीतून विविध सफरींचे दर्शन घडवतो. हे दाखले , हे अनुभव केवळ कथा किंवा वर्णन नसतात , तर ते थेट आपल्या जगण्याशी , आपल्या अस्तित्वाच्या धाग्यांशी जोडणारे आरसे असतात. लेखकाने प्रामाणिकपणे मांडलेले सुख-दुःख , त्याचे यश-अपयश , त्याचे चिंतन आणि त्याचे अनुभव वाचकाच्या हृदयाला स्पर्शून जातात. अशावेळी , वाचक एका अद्भुत समाधानाचा अनुभव घेतो. त्याला हे जाणवते की , ज्या तीव्र भावनांचा अनुभव तो घेत आहे – मग ते उत्कट प्रेम असो , पराकोटीचे दुःख असो , जीवनातील संघर्ष असो किंवा अगदी साधा आनंद असो – त्या अनुभवात तो एकटा नाही. ' माझ्यासारखं अजूनही कुणी सुखी , दुखी या जगतात आहे ,' या जाणि...

अर्थ करी समर्थ – समर्थ सहकारी बँक

 समर्थांनी आत्मज्ञानास प्रगट करण्याचा सर्वोत्तम मार्ग निवडून ज्ञान भांडार सर्व सामान्यास उपलब्ध करून दिले आहे. मानवात ज्ञान आणि कर्तृत्व या दोन अंगांचा विलास स्पष्ट होतो. यातील ज्ञानांगाला मंगलमूर्ती म्हणतात व कर्तुत्व अंगाला शारदा म्हणतात. दिसायला दोन वाटणारी अंगे मुळात एकच असतात. म्हणूनच ज्ञान व कर्म, सिद्धांत व व्यवहार, विचार आणि आचार यांचा अविरोध असणारे हे उत्तम लक्षण समजले जाते. समर्थ म्हणतात , “कुबेरापासूनी अर्थ | वेदांपासूनी परमार्थ | लक्ष्मीपासून  समर्थ | भाग्यासी आले ||” अर्थात कुबेर संपत्तीचे, वेद परमार्थाचे, लक्ष्मी ही भाग्य आणि सामर्थ्याचे मूळ होय. हेच ब्रीद आणि आचरण घेऊन समर्थ सहकारी बँकेची 3000 कोटी पेक्षा जास्त मिश्र व्यवसाय साध्य करीत वाटचाल सुरू आहे. 

            "अर्थ करी समर्थ" हे ब्रीद घेवून सोलापुरच्या जड़ण-घडणीत मोलाचे योगदान देणारी बैंक म्हणजे "समर्थ सहकारी बैंक". समर्थांची शिस्तच जणू प्रत्येक कर्मचाऱ्यात पहायला मिळते. दासबोधात सांगितल्याप्रमाणे , "आधी कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे सांग, या समर्थानी केलेल्या उपदेश निरूपणाचा प्रत्यय बैंक अधिकारी व कर्मचाऱ्यां कडून मिळतो असा अनुभव  आहे. अधिकारी वर्गापासून शिपाया पर्यन्त सर्वानीच "तत्पर ग्राहकसेवा" देण्यात कुठेही कुसूर राखली जात नाही. सोलापूर, पुणे, मुंबई येथे बँकिंग सेवा देण्यात अग्रगण्य अशी समर्थ सहकारी बँक, खूप “अर्थ” पूर्ण ब्रीद वाटतं मला हे, सहकारातून समृद्धी कडे नेणारी आपलीशी वाटणारी हक्काची बँक म्हणजे समर्थ बँक. प्रत्येक सोलापूरकर जो बँकेशी जोडला गेला आहे त्यास नक्कीच याची अनुभूती आली असावी.

    स्पर्धेचे युग आहे, सरकारी आणि खाजगी बँका सोबत स्पर्धेत उतरायचं  तर  नव-नवीन तंत्रज्ञान अंगिकारून त्याचा वापर बँकेच्या सेवां मध्ये अंतर्भूत करून विविध सेवा सहज उपलब्ध करून देता यायला हव्यात हे संचालक मंडळींनी पक्क जाणलं आहे, म्हणूनच विविध डिजिटल सेवा देणारी बँक म्हणून समर्थ बँकेचा नाव लौकिक आहे. मोबाइल बँकिंग असेल अथवा यूपीआय सेवा असेल सगळ्या गोष्टी सहकार क्षेत्रात सोलापुरात प्रथम उपलब्ध करून देणारी बँक म्हणून समर्थ बँके कडे पाहिले जाते. कर्जदार, गुंतवणूकदार, सभासद यांच्या विश्वासास पात्र असणाऱ्या बँकेने विविध स्तरावर पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. कोविड काळात आणि त्यानंतर आलेल्या परिस्थितीतून व्यावसायिक मंडळींना मदतीचा हात पुढे करणारी समर्थ बँक, बँकेने “आत्मनिर्भर कर्ज योजना” सारखी योजना उपलब्ध करून देऊन सामाजिक समतोल राखण्यासाठी पुढाकार घेतला आहे असे म्हणाल्यास वावगे ठरणार नाही.

          आपल्या कार्यक्षेत्रास खऱ्या “अर्थाने” लौकिक प्राप्त व्हावा असा चोख व्यवहार, जपलेली विश्वासार्हता या बळावर बँकेच्या सोलापूर, पुणे, मुंबई , ठाणे, कल्याण, वाशी, सांगली, कोल्हापूर अशा एकूण 32 शाखा कार्यरत आहेत. “सोलापूर पताका” विविध शहरात अभिमानाने मिरविणारी, अर्था सोबत नाते जपणारी, आपली बँक “समर्थ सहकारी बँक”.

          बँकेचे यंदाचे “रौप्य महोत्सवी वर्ष”, कार्य करितां सर्व सिद्धी – या समर्थ रामदास स्वामी यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे समाज उपयोगी कार्य करीत मार्गक्रमण करीत असताना समाजातील सर्व घटकांना “अर्थरूपी” सहाय्य देत बँक वाटचाल करीत आहे, बँकेस माझ्या कडून आणि तमाम सोलापूरकरां कडून पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा !!

 

अमित बाळकृष्ण कामतकर

ब्लॉगर, लेखक, व्याख्याता, सॉफ्ट स्किल ट्रेनर

सोलापूर 


इतर विषयांवरील लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करावं               

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छावा

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

एआय शिक्षकांची जागा घेईल ?