फॉलोअर

ट्रेंडस् – लाख मोलाची गोष्ट

 

टेलिव्हिजन पाहताना टी. आर.पी. ला महत्व असतं आणि त्याची पूर्ण काळजी इलेक्ट्रॉनिक मीडिया मधील मंडळी घेत असतात, तो कसा वाढेल याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन असतात. आजकाल विविध न्यूज / करमणूक वाहिन्यांचा टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट (टी.आर.पी.) वर सगळा खेळ सुरु आहे. यात जो जास्त पॉईंट घेतो तो टेलिव्हिजनचा बादशाह ! अर्थात न्यूज टेलिव्हिजनच्या जगात, पण हे साध्य करण्यासाठी नैतिकता नावाचा प्रकार (त्यांच्या लेखीकुठे आहे हा अभ्यासाचा विषय होवून बसला आहे. मला तरी वाटतं याविषयावर कुणी शोध निबंध देखील लिहू शकेल, असो आजचा हा विषय नाही, तसाच काहीतरी “ट्रेन्डीग” हा प्रकार इंटरनेट वर सापडतो, आज काय ट्रेन्डीग आहे अथवा काय होऊ शकेल याकडे काही मंडळी जाणीवपूर्वक कामात असतात, “ट्रोल” करणं हा सोशल मीडिया मधील एक भाग, पण “ट्रेंडस्” तुम्हाला विविध सर्च इंजिनवर काय हुडकलं गेल आहे ते दाखवितं.

          जसे की “गुगल” या सर्वात जास्त वापरले जाणाऱ्या सर्च इंजिनवर (इतरही सर्च इंजिन आहेत जसे की, बिंग, अल्टा विस्टा (आता याहू),  askjeeves.com इ.) काय सर्वात जास्त हुडकलं गेल आहे याचा लेखाजोखा तुम्हाला देतं. हा एक प्रकरचा “डेटा” आहे जो जगात काय सुरू आहे याची माहिती पुरवितो, जी माहिती तज्ञ मंडळींना विविध बाबीं साठी गरजेची असते. युवक वर्ग इंटरनेट

वर काय सर्च करतो याची माहिती एका क्लिकवर मिळते, ही माहिती पाहताना मला थोडं आश्चर्य वाटतं कारण इंटरनेट वापरणारा एक मोठा युवक वर्ग काय सर्च करतो तर क्रिकेट, बॉलीवूड कलाकार, प्रासंगिक (जसे की निकाल, सण समारंभ या विषयी माहिती), मी तुमच्यासमोर जो डेटा मांडत आहे तो २४ ऑगस्ट २०२१  ते २५ ऑगस्ट २०२१ या एका दिवसांत सर्च केलेला आहे. पहिल्या २० सर्च पाहिल्या तर एकही सर्च हा करिअर उपयोगी दिसत नाही. खरतर कौशल्य विषयक भरपूर वाचनीय माहिती या सर्व सर्च इंजिनवर उपलब्ध असते पण युवक वर्गाचं  वाचन कमी होत आहे असे चित्र सध्यातरी पहायला मिळतं आहे.

          आभासी वाचनालय म्हणून या इंटरनेट वरील सर्च इंजिन कडे पहावं म्हणजे कळेल की केवढ्या मोठ्या प्रमाणात माहितीचा साठा आपल्या बोटांवर उपलब्ध आहे. आपलं फक्त लक्ष नसतं म्हणून हा लेख प्रपंच म्हणा हवं तर, सर्च करण्यासारखे विषय तुम्हा सर्वां सोबत शेअर करतो आहे पहा पटतय का , विविध कौशल्य, करियर विषयक मार्गदर्शन, स्टार्ट अप कल्पना, फंडस, सक्सेसफुल स्टार्ट अप स्टोरी, अटल टिकरींग लॅब्स, या लॅब्स मध्ये काय साध्य करता येऊ शकतं? आयडिया थॉन, हॅके थॉन काय असतं ? कुठे भरतात ?, विविध चॅलेंज जे समाजासाठी आवश्यक आहेत त्यास सोल्यूशन देऊ शकत असल्यास चॅलेंज कुठे मिळतील, प्रोजेक्ट कोण कोणते उपलब्ध आहेत त्याची माहिती, स्टार्ट अप बेसिक्स, प्रेझेंटेशन देण्याचे कौशल्य, इंक्यूबेशन प्रोसेस, गणिती संकल्पना, लॉजिक डेव्हलपमेंट म्हणजे काय? कोडिंग चे शिक्षणातील महत्व, फायदे, कोडिंग का शिकावं ? गेम्स कशा तयार करायच्या ? असे अनेक विषय सांगता येऊ शकतील ज्यावर बरीचं वाचनीय माहिती तुम्हाला इंटरनेट वर मिळेल. मित्रहो, वर नमूद केलेल्या विषयांसारखे विषय सर्च करा आणि करिअर मध्ये अग्रेसर रहा.

          “ट्रेन्डीग” काय व्हावं हे कुण्या एका कंपनीने ठरवून त्यांनी ते करण्यापेक्षा एक जागरूक इंटरनेट युजर म्हणून आपण आपल्याला काय हवं आहे आणि तेच जर आपण सर्च केलं तर खरा “ट्रेंड” तयार करता येऊ शकेल असे मला वाटते. इंटरनेट वापरताना वेळेचे भान रहात नाही, हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे, पण युवक वर्गांनी त्यांच्या करिअर विषयक माहिती सर्च करीत तसा नवा “ट्रेंड” सेट करायला काय हरकत आहे ?

 

अमित बाळकृष्ण कामतकर

सोलापूर


इतर विषयांवरील लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करावं

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ChatGPT कृत्रिम बुद्धिमत्तेचा अविष्कार- तारक की मारक ?

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?